बाजार गेल्या काही महिन्यांतील उच्च पातळीवर आहे, तेव्हा येथे तो थबकणे अपेक्षितच आहे. आता येथे विक्री जोरात झाली तर तो खाली येइल मात्र काही काळ येथेच consolidate झाल्यास वरच्या दिशेस Breakout होण्याचीही शक्यता आहे. या दोन्ही शक्यता ध्यानात घेऊन आपण जे शेअर खुप वाढले आहेत वा ज्यात आपण नफा कमावू शकतो ते थोडे तरी विकून रोख रक्कम तयार ठेवायला हवी. मात्र जे शेअर आपल्या उच्च पातळीपासून काहीसे खाली आले आहेत त्यावर थोडी खरेदी करायला हरकत नाही , मात्र ते आघाडीचे आणि phundamentals चांगले असलेले असावेत. उदा. जयप्रकाश असोसिएट्स व रिलायन्स इंडस्ट्रीज.याव्यतिरिक्त सेसागोवा, स्टेट बेंक ,इन्फोसीस वाढत आहेत त्यावर नजर हवी.
विशेष सुचना - अबान ओफ़शोअर आपली १२०० पासूनची gap भरण्याची शक्यता आहे, तेव्हा खरेदी जपूनच. तसेच बजाज हिंद वर नजर ठेवावी-साखर महाग होत चालली आहे. सत्यम मध्ये अजूनही संधी शोधावी.



2 comments:
dear sandeep tu je kay sangtos te changle aahe
pan aaple lok fakt guju satodiyawar vishvas thevtil tyache kay?
सुनीलजी,
तसे न व्हावे म्हणुनच तर आपण प्रयत्न करत आहोत.दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.
टिप्पणी पोस्ट करा