नव्या आठवड्याची सुरुवात बाजारात प्रोफिट बूकिन्गने झाली आहे. स्टेट बेंकेचे रिजल्ट चांगले नसल्याने त्यात आणखी विक्रीची शक्यता असली तरी तो ३२०० च्या खाली जाणे आता कठीण आहे. ३३०० पर्यंत आला तरी त्यात बाजाराचा कल बघून थोडी खरेदी करावी.
ओबामांच्या दौर्यामधून आतापर्यंत ठोस आणि सविस्तर माहिती बाहेर आली नसली तरी हा दौरा यशस्वी झाला असल्याचे म्हटले जात आहे.
आशियाई बाजार आज मिश्र स्वरूपाचे होते आणि अमेरिकाही अपेक्षेप्रमाणे घट दाखवत आहे.
बाजारात या पातळीवर ५% करेक्शन वा थोडे कन्सोलिडेशन होणे साहजिक आहे.निफ्टीला टेक्निकल सपोर्ट ६२५० वर असल्याचे मी काल म्हटले आहेच.त्याही खाली ६१०० वर मजबूत सपोर्ट असल्याने आणि रिलायन्स इन्ड.आता ब्रेक-आऊट देण्याची चिन्हे दिसत असल्याने बाजार आपला अपट्रेन्ड कायम ठेवेल अशीच चिन्हे आहेत.
ओबामांकडून भारतीय आय.टी बिझिनेससाठी काही चांगली बातमी यावी अशी फक्त अपेक्षा करणे आपल्या हातात आहे..
एका बाबतीत आपल्या वाचकांचे मत जाणून घेणे मला आवडेल.मी जे दररोज लिहितो, त्यात रोजच्या बाजाराविषयी आणि घडामोडीविषयी मजकूर असतो. मात्र असे दररोज करण्यापेक्षा वाचकांना, आठवड्याला २-३ वेळा निरनिराळ्या ट्रेडींग आयडीयाज, उपयुक्त माहिती देणार्या वेबसाईट्स, किंवा थेट गुंतवणूक वा शोर्ट टर्म ट्रेडींग सल्ला / टिप्स दिलेल्या जास्त आवडतील का हे मला जाणून घ्यायचे आहे. कृपया या बाबतीत आपल्या सविस्तर कोमेन्ट्स आल्या तर मला आपल्या पसंतीप्रमाणे बदल करायला आवडेल. तेव्हा वेळात वेळ काढून आपली मते अवश्य कळवावीत ही विनंती.
7 comments:
नमस्कार,
सर्वप्रथम आपल्या ब्लॉग बद्दल व चालवलेल्या उपक्रमाबद्दल मनापासून अभिनंदन.
शेअर बाजारातल्या विविध व्यख्या, काही बेसिक स्ट्रऍटेजिज, पैसे गुंतवायला सुरुवात कशी करावी या विषयांवर माहिती दिलीत तर ती फार मोलाची असेल.
धन्यवाद.
>> आठवड्याला २-३ वेळा निरनिराळ्या ट्रेडींग आयडीयाज, उपयुक्त माहिती देणार्या वेबसाईट्स, किंवा थेट गुंतवणूक वा शोर्ट टर्म ट्रेडींग सल्ला / टिप्स दिलेल्या जास्त आवडतील का
हो. ट्रेडींग आयडीयाज आणि थेट गुंतवणूक वा शोर्ट टर्म ट्रेडींग सल्ला या गोष्टी नक्की आवडतील.
ho! nakkich.
ho! nakkich.
tumachya blog var vachun mi Pratibha Inds madhe 2-3 wela trade kela hota,tumachya tips cha nakkich yeu det :)
Dear saneep,please send me tantrik vishleshan part-1 to-9 on milindgole@gmail.com
i would prefer the current format over the trading-idea-based-format.
There are lot of sites/orgnisations who provide TIP kindda things... but there is scarcity of sites provide concise anaysis like urs!...
keep it up.
Wish You Happy Deewali....
टिप्पणी पोस्ट करा