सुरुवातीस वाढ दाखवणारा आपला बाजार दोन तासानंतर खाली येवू लागला, आणि शेवटी थोडा सुधारून ६३०० जवळ बंद झाला. आपल्या अंदाजाप्रमाणेच ६२५० वर निफ्टी आधार घेत आहे ही समाधानाची बाब आहे. काल येथे म्हटल्याप्रमाणे स्टेट बेंक आणखी खाली आला आहे, आणि ३२०० ही पातळी थोडीशी खरेदी करण्याची आहे, मात्र
बाजार जर पडत असेल तर मात्र घाई करू नये.आज रिअल्टी, मेटल्स आणि एफ़ेमसीजी कंपन्या वाढ दाखवत होत्या.हिंदाल्कोचे रिजल्ट चांगले आल्याने तसेच पावसाळा संपून बांधकामे परत सुरू होणार असल्याने रिअल्टी,धातु व सिमेंट क्षेत्र आता वाढ दाखवत आहे.
ओबामा दौरा बराच गाजावाजा करत संपला, मात्र ठोस असे काही करार अजून तरी झाल्याचे दिसत नाही. भारतीय उद्योग व शेअरबाजारासाठी अजूनपर्यंत तरी ही भेट "सदिच्छा भेट" असावी अशाच प्रकारची ठरली आहे. आगामी काळात काही महत्वाचे "डील" घडले तरच या भेटीला अर्थ प्राप्त होइल.
तिमाही निकालांचा सीझन संपत आला आहे. आणि बर्याच अंशी चांगल्या निकालांचा परिणाम बाजारावर आधीच झाला आहे, आणि म्हणूनच बाजार या उंचीवर आहेत.रोजची बाजारातील हालचाल ही जागतिक बाजारानुसार थोडीफार उलटसुलट दिशेने झाली तरी आता अधिक उंची गाठायला महत्वाचे कारण (TRIGGER) लागेल असे वाटते. रिलायन्स अजूनही ब्रेक-आऊटच्या उंबरठ्यावर आहे. तेव्हा या आठवड्यात बाजार ६१०० ते ६३५० याच रेंजमध्ये फिरण्याची शक्यता दिसत आहे.
. ज्या कंपन्यांचे अर्निन्गचे आकडे चांगले आलेत त्या कंपन्यांचा पुढील तिमाहीसाठीचा "गाईडन्स" वा "आऊटलूक" प्रसिद्ध झालेला असतो, त्यावर नजर ठेवावी, आणि आपले होल्डींग त्यानुसार ठरवत जावे, कारण बाजार प्रत्यक्ष रिजल्ट येइपर्यंत थांबत नाही.
या ब्लोगतर्फे फ़ेसबूकवर प्रसिद्ध केलेले "दिवाळी मुहुर्ताच्या" तीन शेअर्सपैकी एल.आय.सी. हाऊसिंग फायनान्स आणि टाटा स्टील हे वाढताना दिसत आहेत, तर बीजीआर एनर्जी सिस्टीम्स हा शेअर प्रोफिट बूकिंगमुळे खाली जात आहे. त्याला ७८० व ७६० च्या पातळीवर चांगला सपोर्ट आहे. त्यावर नजर ठेवावी व बाजाराचा कल बघून खरेदी करावी.
आपण खरेदी करताना ती सपोर्ट लेवलच्या च्या थोडी वरील बाजूस करावी, उदा. बीजीआर एनर्जी च्या बाबतीत ७६० ला सपोर्ट आहे, म्हणून ७६५ च्या आसपास खरेदी केल्यास आणि (बाजाराच्या अनिश्चिततेमुळे) ७५५ च्या आसपास स्टोप-लोस लावला तर जास्तीतजास्त नुकसान शेअरमागे फक्त १० रु. होते आणि हा शेअर ८२० पर्यंत वाढ शोर्ट टर्म मध्ये सुद्धा देवू शकतो.अशा प्रकारे ज्यांचे तिमाही निकाल चांगले आले आहेत अशा शेअर्सवर नजर ठेवून ते खाली आल्यावर त्यात संधी शोधावी.
एका बाबतीत आपल्या वाचकांचे मत जाणून घेणे मला आवडेल.
मी जे दररोज लिहितो, त्यात रोजच्या बाजाराविषयी आणि घडामोडीविषयी मजकूर असतो. मात्र असे दररोज करण्यापेक्षा वाचकांना, आठवड्याला २-३ वेळा निरनिराळ्या ट्रेडींग आयडीयाज, उपयुक्त माहिती देणार्या वेबसाईट्स, किंवा थेट गुंतवणूक वा शोर्ट टर्म ट्रेडींग सल्ला / टिप्स दिलेल्या जास्त आवडतील का हे मला जाणून घ्यायचे आहे. कृपया या बाबतीत आपल्या सविस्तर कोमेन्ट्स आल्या तर मला आपल्या पसंतीप्रमाणे बदल करायला आवडेल. तेव्हा वेळात वेळ काढून आपली मते अवश्य कळवावीत ही विनंती.

0 comments:
टिप्पणी पोस्ट करा