माझ्या नियमित वाचकांना आठवतच असेल कि या वर्षाच्या सुरुवातीलाच मी लिहिले होते कि निफ्टी पी/ई रेशो हा 27 पेक्षा जास्त झालेला आहे आणि आता मार्केट खूपच महागले आहे तेव्हा याहून फार जास्त वाढेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा अधिकांश शेअर्स विकून आपला पैसा बँक एफ डी सारख्या सुरक्षित. ठिकाणी वा इतरत्र गुंतवावा आणि मार्केट खाली येण्याची वाट बघावी.मी हे लिहील्यानंतरही सहा महिने मार्केट थोडे कन्सॉलिडेट होत होते व थोडे वाढलेही. शेवटी...