मुंबई शेअरबाजार-ताजी स्थिती

Loading...
Gadget by The Blog Doctor.
Share/Bookmark

13 मार्च 2011

मूव्हींग एवरेजेसचा ट्रेडींगमध्ये कसा वापर कराल..?

मित्रहो, 
वेळेच्या कमतरतेमुळे बर्याच दिवसांनी येथे लिखाण करत असलो तरी सर्वांना उपयोगी पडेल असे काहीतरी मराठीतून व सोप्या भाषेत उपलब्ध करताना नेहमीइतकेच समाधान होत आहे. हा माझा प्रयत्न वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
आजची ही पोस्ट , "तांत्रिक विश्लेषणाची ओळख" या लेखमालेचा पूढचा भाग म्हणूनही लिहीत आहे.
तांत्रिक विश्लेषणाची ओळख :भाग १३
मूव्हींग एवरेजेसचा ट्रेडींगमध्ये वापर-
टेक्निकल चार्ट पहाताना मूव्हींग एवरेजची किंमत कशी काढतात ते आपण यापूर्वी पाहिले आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचे त्याचा प्रत्यक्ष ट्रेडींगमध्ये कसा वापर करतात हे जाणून घेणे आहे.
मूव्हींग एवरेजचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे एखाद्या शेअरची वा कमोडिटीची एखाद्या ठराविक काळापूरती सरासरी किंमत होय. हा ठराविक काळ किती असावा हे अर्थातच आपण ठरवायचे आहे.
गूगल वा याहू फायनान्स या साईटवर गेल्यास असे इन्टरएक्टीव्ह चार्ट्स उपलब्ध असतात.त्यामध्ये आपण इन्ट्राडे, ५ दिवस, महिना, ३महिने, ६ महिने, वर्ष, ५ वर्षे इ. विविध कालावधी निवडू शकतो.एकदा का आपला कालावधी नक्की झाला कि मग त्या चार्ट मध्ये किती पिरीअडची मूव्हींग एवरेजची रेषा काढायची हे ठरवावे लागते.
खालील आकृती पहा-

यामध्ये १० पिरीअड SMA आणि ३० पिरीअड EMA अशा दोन मूव्हींग एवरेजेस काढल्या आहेत.अर्थातच यातील १०SMA ही वेगात हालचाल करणारी आहे आणि ३०EMA  ही त्यामानाने कमी हालचाल दाखवते किंवा फारसे चढ-उतार दाखवत नाही. अशा प्रकारे दोन वेगळ्या प्रकारे वागणार्या लाईन्स घेतल्याने नक्की ट्रेन्ड काय आहे, तसेच तो रिव्हर्स होतो आहे का हे ओळखता येते.
सातत्याने वरखाली होणार्या शेअरच्या भावातील तात्पुरत्या चढ-उतारामुळे होणार्या दिशाभूलीवर उपाय म्हणून मूव्हींग एवरेज या कल्पनेचा जन्म झाला. थोडक्यात मूळ किंमतीच्या ग्राफमधील विचित्र वळणे टाळून त्याचेच एका गुळगुळीत (Smooth) रेषेमध्ये रुपांतर करण्यात आले.
आता अशा दोन वेगवेगळ्या मूव्हींग एवरेजेस पैकी वेगवान असलेली म्हणजेच १०SMA ही जेव्हा ३०EMA या रेषेला छेद देते तेव्हा ट्रेन्ड रिव्हर्स झाला असे ढोबळमानाने समजले जाते.
आकृतीत दाखवल्याप्रमाणे जेव्हा १०SMA ने ३०EMA ला खालून वरच्या दिशेस छेद दिला तेव्हा डाऊनट्रेन्ड संपून अपट्रेन्ड सुरू झाला असे समजतात.त्यानंतर मात्र जोपर्यंत पुन्हा वरून खालच्या दिशेस छेदले जात नाही तोपर्यंत अपट्रेन्ड कायम आहे असे समजण्यात येते.
म्हणजेच अपट्रेन्ड सुरू झाल्यावर खरेदी करून पुन्हा ट्रेन्ड रिव्हर्सल होईपर्यंत होणारा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो.
जोपर्यंत १०SMA ही ३०EMA च्यावर राहिली आहे, तोपर्यंत Long position (खरेदी) चा विचार करावा आणि जर १०SMA ही ३०EMA च्या खाली असेल तर Short positions (विक्री अथवा शोर्टसेलींग) चा विचार करावा.
या पद्धतीने आपले निर्णय योग्य ठरण्याची शक्यता वाढते.
यापेक्षा अधिक सोपे काही असेल का ?
मात्र म्हणूनच कोणतीही पद्धत शेअरबाजारात १०० टक्के कधीच बरोबर नसते याचीही जाणीव ठेवायला हवी. मात्र अधिक अचूक निदान करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पिरीअडच्या SMA व EMA चा वापर करून बघा. कुठले कोम्बिनेशन अधिक अचूक परिणाम देते तसेच आपल्या स्वत:च्या ट्रेडींग-स्टाईल ला चपखल बसते ते प्रत्येकाने पडताळून पहाणे गरजेचे आहे. तसेच डे-ट्रेड साठी इन्ट्राडे चार्ट वापरावा आणि शोर्ट टर्म साठी ५ दिवस,१ महिना, ३ महिने तसेच ६ महिने कालावधीचे चार्ट निवडून त्यावर विविध पिरीअडच्या मूव्हींग एवरेजेस कशा काम करतात हे पहायला हवे. कुठल्या पद्धतीने कमीतकमी चूकीचे सिग्नल (WHIPSAW) निर्माण होतात ते पडताळून ती पद्धत सातत्याने स्टोपलोस सहीत वापरल्याने फायद्याचे प्रमाण नक्कीच वाढेल.
१० व २६SMA , ८ व ३४EMA तसेच, २० व ५०SMA अशी विविध कोम्बिनेशन्स ट्रेडर्समध्ये लोकप्रिय आहेत.
यात खालील गोष्टी नियम म्हणून पाळाव्यात-
१) छोट्या पिरीअडची लाईन ही मोठ्या पिरीअडच्या लाईनपेक्षा वर असेल तरच खरेदीचा विचार.
२) दोन्ही एवरेजेस एकमेकांच्या फार जवळ नसाव्यात.
३) दोन्ही एवरेजेस या वरचे बाजूस जाणार्या म्हणजे चढत जाणार्या असाव्यात.

याव्यतिरिक्त आणखी एक सोपी व परिणामकारक पद्धत म्हणजे २१ किंवा ३४ या पिरीअडची एकच EMA लाईन काढून जेव्हा शेअरची किंमत ही EMA लाईनला खालून वरच्या दिशेस छेद देइल तेव्हा खरेदी व याउलट वरून खालच्या दिशेस छेद देइल तेव्हा शोर्टसेल करतात.
अशा प्रकारच्या ट्रेडींग मध्ये निर्णयाला अधिक बळकटी यावी म्हणून २०० SMA चा खालील प्रमाणे प्रभावी वापर करता येतो.-
२०० SMA ही लाईन काढून बुलीश विभाग आणि बेअरीश विभाग असे दोन भागांची कल्पना केली जाते. २००SMA ही मोठ्या पिरीअडची असल्याने ही फार चढ-उतार दाखवत नाही, या लाईनच्या खाली बेअरीश विभाग समजून जोपर्यंत शेअरची किंमत या विभागात आहे, तोपर्यंत वरील मूव्हींग एवरेजेस च्या कोम्बिनेशनने दिलेले विक्रीचे सिग्नल फक्त विचारात घेतले जातात.
याउलट २००SMA च्या वरच्या बाजूस म्हणजे बुलीश विभागात जर शेअरची किंमत असेल तर फक्त खरेदी सिग्नलच विचारात घेतले जातात.
२०० SMA रेषा ही कोणत्याही चार्टचे अविभाज्य अंग असावी असे महत्व तीला आहे.सातत्याने निरीक्षण कराल तर असे दिसून येइल कि शेअरची किंमत ही अनेक वेळेला या महत्वाच्या रेषेला स्पर्श करून परत फिरते.
 सर्व वाचकांना ही माहिती सोप्या भाषेत देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तरीही काही शंका असेल तर जरूर COMMENT द्यावी.
WISH YOU ALL HAPPY TRADING....!


19 comments:

..राहुल टकले म्हणाले...

mast aahe lekh

सुदीप मिर्ज़ा म्हणाले...

excellent!
simple and to-the-point...


keep it up.

भूपेश औरंगाबादकर, पुणे म्हणाले...

संदीप सर, आपले खुप-खुप आभार, आपण खुप मेहनत घेत आहात. धन्यवाद.
भूपेश, पूणे

amo patil 9462 म्हणाले...

good one

amo patil 9462 म्हणाले...

good one

mynac म्हणाले...

श्री. संदीप साहेब,
सप्रेम नमस्कार,
मराठी वाचकांना शेयर बाजाराची जास्तीत जास्त ओळख होण्यासाठी आपण घेत असलेल्या काळजीचे खरोखरच खूप कौतुक वाटते.आपल्या प्रयत्नास मना पासून सलाम.मुळात हा विषयच असा आहे कि त्यात तुम्ही जितके शिकायचा प्रयत्न कराल /करता तितके आपल्या लक्षात येते कि "अरे बापरे! अजून बरंच शिकायचं राहिलंय कि! हं... आता ठीके.... निदान एवढे तर आता कळलं ! असं वाटायला लागतं ना लागतं तोच मार्केट मध्ये पुन्हा काहीतरी ऊल्ट सुल्ट होत.पण आपण करीत असलेल्या मार्गदर्शना मुळे आम्हा वाचकांची एवढी सोय,फायदा मात्र नक्की झाला आहे कि एखादा जर समजा चुकून माकून चुकलाच तर,आपण नक्की कुठे चुकतोय हे त्याच्या लक्षात यायला मदत होईल. आपणास मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.

संदीप म्हणाले...

Thank you all !

अनामित म्हणाले...

are parat kadhi lihayla chalu karnar,
lavkar kar na gadya?

अनामित म्हणाले...

lavkar lihayla chalu kar

संदीप म्हणाले...

आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.
बरेच दिवस झाले येथे लिहून पण आजच नवी पोस्ट लिहिली आहे, आपल्याला ती उपयुक्त वाटून नेहमीप्रमाणेच प्रतिसाद द्याल अशी आशा आहे.
-संदीप

smita म्हणाले...

हेलो
संदीप
मला तुम्ही दिलेली माहिती खूप उपयुक्त वाटली मी जेव्हा चार्ट विषयी वाचत आहे त्या वेळेस काही

शॉर्ट फॉर्म चा अर्थ समज्त नाही,तरी तुम्ही ते सांगाल का? EMA N SMA

स्मिता काणे

smita म्हणाले...

हेलो
संदीप
मला तुम्ही दिलेली माहिती खूप उपयुक्त वाटली मी जेव्हा चार्ट विषयी वाचत आहे त्या वेळेस काही

शॉर्ट फॉर्म चा अर्थ समज्त नाही,तरी तुम्ही ते सांगाल का? EMA N SMA

स्मिता काणे

संदीप म्हणाले...

@Smitaji,
SMA means simple moving average, and EMA means exponential moving average.For more information pl. go to this link-

http://marathishare.blogspot.com/p/blog-page_03.html

Regards.

अनामित म्हणाले...

thanx sar.

arun म्हणाले...

sandeepji

Kharokhar chhan mahiti dilit.
kase abhar manayche te samjat nahi.
tumchya ya upkramala khup sarya
SHUBHECHHA !!!!

ya upkramasathi kontihi madat laglyas
mhanje bhashanter, likhan karne,kanhi mahiti shodhun kadhne kinva iter kontyahi prakarchi madat karnyas vinasankoch sangave.
maza e-mail id arun.pjadhav@gmail.com asa aahe

संदीप म्हणाले...

Thanx Arunji.
Tumha sarvanche prem mala adhik changale likhan karayla prerana deil.
-sandip

अनामित म्हणाले...

nice blog.

http://www.niftylaxmi.blogspot.com/

ganesh म्हणाले...

sir please, japanes candalestek baddal mahiti havi ahe.

ganesh म्हणाले...

sir please, japanes candalestek baddal mahiti havi ahe.

लोकप्रिय पोस्ट

अलिकडील प्रतिक्रिया...