बरेच दिवसात येथे काही लिहीलेले नाही मात्र २८ ता. ला सादर होणारे बजेट ही लिखाणाची चांगली संधी चालून आलेली आहे. केन्द्रात नवीन सरकार आल्यापासून व खरेतर त्या आधीपासूनच बाजाराने मोठी घोडदौड केली आहे. त्यामध्ये खनिज तेलाच्या घसरलेल्या किंमती पासून ते सरकार कडून उद्योगक्षेत्राला असलेल्या अपेक्षा आणि पंतप्रधान मोदींनी परराष्ट्रातून होणा-या गुंतवणूकीसंबंधात केलेल्या वेगवान हालचालींचा वाटा होता. मात्र दिल्ली निवडणूक निकाल...