माझ्या सर्व वाचक आणि गुन्तवणूकदार मित्राना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
नोटाबन्दी, जीएसटी, उत्तरप्रदेश व गुजरात निवडणूका अशा घटनानी व्यापून गेलेले जुने वर्ष सम्पून बघता बघता नवे वर्ष येवून ठेपले देखील !
सरत्या वर्षाच्या शेवटी बाजाराने सर्व अनुकुल प्रतिकूल घटनाना पचवत नवी उन्ची गाठलेली आहे हे सर्व भारतीय गुन्तवणूकदारान्चे भाग्यच आहे.
मात्र साहजिकच आता पूढील वर्षीही बाजार असे भरभरून यश देणार का हा नेहमीचाच प्रश्न सर्वान्च्या...