Share/Bookmark

२ ऑक्टो, २००९

मंदीचे अस्वल!


वाचकहो, काल बाजार FLAT राहिला, त्याची दोन कारणे होती.गेले दोन दिवसाची तेजी ही भारतीय बाजारातच होती, त्यामानाने इतर बाजार वाढले नव्हते, त्यामुळे विक्री करून फायदा कमावण्यात आला. त्याच बरोबर चीनच्या बाजाराला काल सुटी असल्याने तिकडून काही संकेत नव्हता.
१७००० ची पातळी ओलांडल्याचा Psycological Effect सामान्य गुंतवणूकदारावर होत असला तरी, बाजारातले बडे खिलाडी अशाच वेळी विक्री करून छोट्यांना खिंडीत पकडण्याची शक्यता नेहमीच असते.
तुम्ही म्हणाल कि बाजार वर जात असताना मी असा नकारात्मक सूर का लावत आहे? याचे कारण असे कि बाजार पुन्हा फार मोठ्या प्रमाणावर पडेल असे मलाही वाटत नसले तरी, तो आता सर्वकालीन उच्च पातळीच्या जवळ जात चालला आहे, आणि तेथे विक्री होणार हे मला दुर्लक्षिता येत नाही, आणि आज ना उद्या तो थोडाफार घसरणार असेल तर आपण अगदीच बेसावध असायला नको. हे लक्षांत घ्या कि बाजार जेव्हा २१००० च्या पातळीवर होता तेव्हा कोणीही आपल्याला सावध केले नव्हते, त्याचबरोबर जेव्हा सेन्सेक्स ८००० जवळ होता तेव्हाही जोरात खरेदी करायचा सल्ला आपल्याला कोणी दिला होता काय? तेजीचा बैल उधळताना मोठयाने आवाज करत असला तरी मंदीचे अस्वल मात्र आवाज न करता कधी जवळ येते ते कळत नाही.
तेव्हा आपले निर्णय स्वत:च्या निरीक्षणावर स्वतंत्रपणे घेणे आणि नेहमी stoploss चा वापर करणे श्रेयस्कर ठरेल.
काल रिलायन्स कम्युनिकेशन मधील वाढ लक्षांत आली का? बाजार पडला नाही तर तो ३३० पर्यंत वाढू शकतो.