दुबईच्या दोन बड्य़ा कंपन्यांमधील (दुबई वर्ल्ड आणि नाखील) कर्जबाजारी होण्याच्या घटनेने काल व आज जगभरचे बाजार हादरले. त्यात अमॆरिका व काही आशियाई बाजार काल बंद असल्याने मंदीवाल्यांनी या संधीचा फायदा उठवला असे दिसत आहे.अशा प्रकारच्या घटना होतात तेव्हा १-२ दिवस घबराटीमुळेच बाजार पडतात आणि त्यानंतरच त्या घटनांचा खरा अभ्यास होऊन त्यांचे कोठे, कसे आणि किती काळासाठी परिणाम होतील याचा अंदाज बांधला जातो.आज प्रारंभी आपला बाजार असाच PANIC...