Share/Bookmark

२० नोव्हें, २००९

सोने आणि सेन्सेक्स यात आता चढाओढ !


या आधीच्या आपल्या अंदाजानुसार RIL व SBI यांनी आठवड्याच्या सुरुवातीस पुढाकार घेतल्याने बाजार वाढला होता.त्याप्रमाणेच रिला.केपिटल(८२० पासून ९२५) व अबान ओफ्शोअर(१२२५ ते १३७०), dlf(३७० ते ३९४), तसेच सेसा गोवा INFOSYS यांनी बुधवार गुरुवार पर्यंत बाजारात नरमाई असूनही चांगली घोडदौड केल्याचे आपण पाहिले असेल.
आज मात्र बाजाराने सुरुवातीला नरमाई दाखविताच अनेकांनी घाबरून विक्री केल्याचे दिसते.काही प्रसिद्ध वेबसाईटनी बाजार जोरात कोसळणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र आज दुपारी युरोपियन बाजार खुलताच आपल्याही बाजाराने यु टर्न घेतला व १७००० ची पातळी पुन्हा ओलांडली. टेक्निकल एनालिसीस आणि प्रत्यक्ष बाजाराची दिशा यात हीच तर तफावत राहते.
त्यामुळे बरेच शेअर वधारले मात्र बजाज हिंद सारखे काही शेअर, ज्यांचा सेन्सेक्सशी थेट संबंध नाही ते वाढलेले दिसत नाहीत.अर्थातच ते अजूनही स्वस्त मिळू शकतात असाच त्याचा अर्थ होतो. जागतिक बाजारांनी साथ दिली तर तेजीनेच पुढील आठवड्याची सुरुवात होईल आणि विक्रीच्या संधी नक्कीच उपलब्ध होतील याबद्दल मला शंका वाटत नाही.
सोने आणि सेन्सेक्स यात आता चढाओढ बघायला मिळणार असे दिसत आहे.पण ही दीर्घ पल्ल्याची शर्यत सेन्सेक्सच जिंकणार बरे का !