Share/Bookmark

४ ऑक्टो, २०१०

चढत्या बाजारात आपले शेअर मात्र वाढत नाहीत ....?

या आधीच्या पोस्टमध्ये मी कन्सोलिडेशनचा उल्लेख केला होता, आणि या कन्सोलिडेशन नंतर बाजार आणखी पुढे झेपाव्ण्याची शक्यता वर्तवली होती, मात्र इतक्या लवकर हे कन्सोलिडेशन पूर्ण होवून ओक्टोबरच्या पहिल्या तारखेलाच आणि शुक्रवारी बाजाराने वाढून सर्वांनाच चकित केले. बाजाराने आता ६००० ते ६५०० अशा झोन मध्ये प्रवेश केल्याचे दिसत आहे. (निफ्टी पी/ई च्या आकडेमोडीनुसार काही दिवसापूर्वी व्यक्त केलेला आपला अंदाजही ६६५० च्या जवळपास होता.)
परकिय गुंतवणूकदारांची आक्रमक खरेदी हे मुख्य कारण असले तरी
अयोध्या निकालामुळे नव्हे, तर निकालानंतरच्या देशभर दिसून आलेल्या सामंजस्याच्या वातावरणामुळे आपल्या देशाविषयी जगभर एक प्रकारचा सकारात्मक संदेश गेला आहे, आणि त्यामुळे बाजाराचे सेंटीमेंटवर परिणाम झाला आहे असे मला वाटते. केंद्रीय मंत्री चिदंबरम यांच्या वक्तव्यानुसार भारताची प्रगतीची गाडी खरोखरच रुळावरून न घसरता पुढे चालली आहे असेच चित्र जगाला बघायला मिळत आहे. बाजाराच्या दृष्टीने ही फार चांगली गोष्ट आहे.
असे असले तरी बाजार आता रोज अधिकाधिक महाग होत चालला आहे यात संशय नाही. सर्व जागतिक बाजारांनी ओक्टोबरची सुरुवात चांगलीच केली आहे, मात्र आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ओक्टोबर हा बाजारासाठी वाईट महिना ठरलेला आहे. तेव्हा आपले धोरण असे असावे लागेल कि कधीही बाजार पडला तरी कमीतकमी नुकसान व्हावे, मात्र चढत्या बाजाराचा फायदाही मिळावा.
चढत्या बाजारात नेमके आपलेकडील शेअरच वाढत नाहीत असा अनुभव काहींना येत असेल. बाजाराच्या अशा परिस्थितीत यावर अगदी सोपा उपाय म्हणजे मल्टीबेंगर, किंवा लोन्गटर्म वगैरे शब्दांच्या भुलभुलैयात न अडकता सेन्सेक्स किंवा निफ्टी यामध्ये जे शेअर निर्देशांकाला वाढवण्य़ास मोठा हातभार लावत आहेत, त्यात अगदी अल्पावधीसाठी किंवा इन्ट्रा-डे सुद्धा खरेदी करून थोडा फायदा मिळताच मोहात न सापडता विक्री करावी, आणि बाजाराचा अंदाज घेत पुन्हा खरेदी करावी.-अशा प्रकारचे व्यवहार करताना, कोणताही फंडामेंटल वा टेक्निकल आधार घेतला तरी बाजार पडताना ते आधार कुचकामी ठरतील तेव्हा आपला खरा मित्र "STOP-LOSS" हाच असतो, असे समजून जे व्यवहार करतील तेच यशस्वी होतील. अशा बाजारात थोड्याशा "डीप" मध्ये खरेदी करायची संधी असते, मात्र अशी छोटी डीप हीच अचानक मोठ्या करेक्शनमध्ये बदलू शकण्याचा धोका असतोच.
मर्यादीत धोका पत्करून बाजाराच्या अभूतपूर्व तेजीचा फायदा उठवणे आवश्यक आहे.
ज्यांना असे करणे जमत नाही, किंवा STOP-LOSS लावणे पटत नाही त्यांनी बाजारात काही न करणे हे ही सध्याच्या परिस्थितीत शहाणपणाचे ठरू शकते. मात्र लोन्गटर्मसाठी खरेदीची ही वेळ नाही हे मात्र अगदी खरे.
 सध्या निर्देशांकाला वर नेणारे शेअर खूप महागले आहेत, तरीही तेच काही काळ बाजाराला आणखी वर नेणार आहेत, तेव्हा बेंका, ओटॊ, पेट्रो आणि केपिटल गूड्स मधले शेअर्सवर नजर ठेवा आणि फायदा कमवा.

2 comments:

  • अनामित says:
    ०४ ऑक्टोबर, २०१०

    p/e रेशोबद्दल forword p/e अशी एक शब्दयोजना वापरली जाते. याला आपण संभाव्य p/e रेशो असे म्हणू शकू. त्यानुसार निफ्टी ६१४३ ला २०१०-११ चा हा संभाव्य रेशो फक्त १९ च्या आसपास आहे. शिवाय १ ऑक्टोबर २०१० पासून एबीबी, आयडिया व युनिटेक निफ्टीतून वगळून बजाज ऑटो, डॉ.रेड्डी व सेसागोवा सामील झाले आहेत. त्यामुळे निफ्टी eps आणखी १०-१२ रुपयांनी वाढायला हरकत नसावी. त्यामुळेच FII ची गुंतवणूक जोरात सुरू असावी.
    अधिक माहीतीसाठी एक link देत आहे.
    http://www.moneycontrol.com/news/udayans-comments/mkts-to-touch-new-highs4-5-days_488501-1.html

  • संदीप says:
    ०५ ऑक्टोबर, २०१०

    Thanks for good and timely information.
    Pl. keep it up!
    The co.s paid a big advance tax, so we can say that results may be better for Q2. It will definitely help NIfty EPS to grow.