Share/Bookmark

२० एप्रि, २०१०

WISH YOU ALL .HAPPY TRADING !

य़ा ब्लोगला मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद पाहून मी लिखाण थांबविण्याचा निर्णय घेत आहे.असे वाटले होते कि टीका झाली तरी चालेल, पण दखल घेतली जावी.मात्र ही अपेक्षा फोल ठरत आहे. चूका दाखवाव्यात एवढेही माझे लिखाण अपीलींग नसेल तर ते थांबविणे बरे. ज्या कोणी अपवादाने दखल घेतली आहे त्यांचे आभार.
WISH YOU ALL .HAPPY TRADING !
            

9 comments:

 • sarika says:
  २० एप्रिल, २०१०

  संदिपजी,

  शेअरबाजारात इतकं नुकसान झेलल आहे कि कोणी वरुन पाच दहा लाख देउ केले तरी मी त्या मार्गावर जाणार नाहि. ज्यांनी नुकसान सहन केले आहे ते हि स्थिती समजु शकतील. पण जे ट्रेडिंग करतात ते नक्की फ़ॉलो करत असतील. तेव्हा निर्णयाचा फेरविचार व्हावा.

 • Vikram says:
  २० एप्रिल, २०१०

  asa nahie - kasa ahe lokkana ha vishay thoda complicated wattato tya mule sahaj pane koni hya var comment takat nahi ! barich mahiti milat hoti - thambi naye hi vinanti

 • हेरंब says:
  २१ एप्रिल, २०१०

  संदीप, कृपया लेखन थांबवू नका. अनेक वाचक प्रतिक्रिया देत नाहीत पण नियमितपणे ब्लॉग्स वाचत असतात. आणि प्रतिक्रिया का देत नाहीत तर काय प्रतीक्रींय द्यावी हे कळत नाही म्हणून. पण याचा अर्थ ब्लॉग चांगला नाही असा मुळीच होत नाही. cheer up !!

 • संदीप says:
  २१ एप्रिल, २०१०

  Thanks.

 • Pradyumna says:
  २१ एप्रिल, २०१०

  मला तरी ही साईट आवडली. मी ती फेवरिट लिस्ट मधे टाकली होती. रोज पाहात असे. पण दोन पोस्टमधे बरेच दिवसांचे अंतर असे. पण मी ही साईट रोज उघडायचे बंद केले नाही.

  आज नेहमीप्रमाणे साईट उघडली. २०१० सालासाठी २७ पोस्ट झालेल्या पाहिल्या. म्हणजे आज नवीन काहीतरी वाचायला मिळणार असे वाटून...

  पण निराशा झाली. तुम्ही ही साईट बंद करण्याचे ठरविले आहे हे कळल्याबरोबर दोन पोस्टमधे बर्‍याच दिवसांच अंतर का पडत होते ते लक्षात आले. अत्यंत धावपळीच्या दिनक्रमामुळे तुम्हाला वेळ मिळत नसावा असे मला वाटत होते पण तुम्हाला आलेली निराशा हे त्यामागचे कारण होते अस आता कुठे लक्षात येतेय.

  मी प्रथम हे स्पष्ट करतो की, मी शेअर बाजारात पैसे गुंतवत असलो( मी मार्जीन/फ्युचर/ऑप्शनच्या माध्यमातून गुंतवणूक करत नाही तसेच मी डे टेड्ररही नाही.) तरी तुम्ही सुचविलेल्या कोणत्याच शेअरमधे मी गुंतवणूक केलेली नाही. तरीही मी ही साईट वाचत असे कारण त्यात मांडलेले मुद्दे वास्तव वाटायचे व केलेले तर्क बरोबरही असायचे/यायचे. असो.

  तुम्हाला सल्ला देण्याचा मला काही अधिकार नाही हे मान्य करूनही असे सुचवावेसे वाटते की, नियमीतपणे दररोज लिहित जावे. बाजारात विशेष काही घडले नसले किंवा घडण्यासारखे नसले तरीही हा मुद्दा लिहिण्यासाठी तरी लिहित जावे.त्यानिमित्ताने रोज साईट अपडेट होत जाईल.

  लोक वाचत आहेत किंवा नाही इकडे लक्ष देऊ नका. तुम्ही ज्या हेतूने हा ब्लॉग सुरू केला तो हेतू स्तुत्य आहे. तुम्हाला तो पटला आहे. तो हेतू साध्य होण्यासाठी आवश्यक ते साधनही तुमच्या हातात आहे. बर्‍याच जणांना असे काहीतरी चांगले करावेसे वाटते पण संधीच मिळत नाही. मला वाटते तुम्हाला ही संधी मिळालीय आणि सध्यातरी लिखाण चालू ठेवायला हे कारण पुरेसे आहे. तुम्ही इतरांसाठी नव्हे तर तुमच्यासाठी हा ब्लॉग चालू ठेवावा असे वाटते. त्यातून तुम्हाला समाधानही मिळेल व त्यातून ब्लॉगचा दर्जाही उत्तरोत्तर उंचावत जाईल. ज्याप्रमाणात तुमची लोकांकडूनची अपेक्षा कमी कमी होत जाईल त्याप्रमाणात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता मला जास्त जाणवते आहे.

  प्रथम कोणा एकाला फायदा होईल व नंतर वाचक संख्या वाढत जाईल. पण त्यासाठी निदान पहिली २-३ वर्ष ही तुमची तपश्चर्येची असणार आहेत. कोणतीच अपेक्षा न ठेवता दुसर्‍याच्या भल्यासाठी केलेल्या कोणत्याही गोष्टीला मी तपश्चर्या मानतो. यातून लोकांचे भले जेव्हा होईल तेव्हा होईल पण या तपश्चर्येतून कोणत्या ना कोणत्या रुपात प्रथम तुमचेच भले होईल हे नक्की. "१.जे पेरावे ते उगवते" "२.करावे तसे भरावे" "३.जशी क्रिया तशी प्रतिक्रिया" ही संतवचने खोटी कशी बरे ठरतील?

  टिपण्णी देण्यासाठी गुगलचे खाते असणे आवश्यक असते. त्यामुळेही बरेच जण आपली टिपण्णी देत नाहीत. तर प्रत्येक वेळेस पासवर्ड,युजरआयडी भरून टिप्पणी द्यायला नको वाटते म्हणूनही बरेच जण टिप्पणी देत नसतात. (बर्‍याच वेळेस यापध्दतीने टिप्पणी दिल्यावर आपल्याला येणार्‍या अनाहूत इ-मेलची संख्या वाढत असते. निदान मला तरी हा अनुभव आला आहे.) मीही याच कारणाने टिप्पणी देण्याचे टाळत असे. पण आज मात्र टिप्पणी देण्याचे कर्तव्य पूर्ण करत आहे.

  आपल्याला पटलेल्या हेतूसाठी काहीतरी करणे शक्य असेल तर ते करत राहावे हे सर्वोत्तम असते. यश आपोआपच मागोमाग येते. अन्यथा एक खंत आपल्या नकळत आपल्या मनात घर करते व शेवटी आपल्याच त्रास देते. असो.

  शेअर बाजारातही झटपट श्रीमंत होण्याची इच्छा बाळ्गणार्‍यांपैकी ९९.९९ टक्के लोकांना नुकसान सोसावे लागते. एखादाच वॉरन बफे असतो जो शेअर मधे गुंतवणूक केल्यावर पाच वर्षे बाजार बंद आहे असे समजतो व पाच वर्षांनी श्रीमंत होतो / यशस्वी होतो. पण त्यासाठी तो माणूस प्रथम पाच वर्षे देत असतो हे विसरून कसे बरे चालेल.

  तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याला शुभेच्छा.

 • अनामित says:
  २२ एप्रिल, २०१०

  sandipji,,
  lihina thambavu naka ho...

 • संदीप says:
  २२ एप्रिल, २०१०

  आपल्या सर्वांचे आभार.मात्र हा ब्लोग किती प्रमाणात उपयुक्त ठरतो आहे, याबाबत मला विशेष प्रतिक्रिया न आल्याने मूळ हेतूलाच अर्थ न उरल्याची शंका येते.तरिही अधिक तयारीनिशी पुन्हा लिखाण सुरू करायला थोडी मुदत हवी वाटते.असेच प्रेम असू द्यावे ही विनंती.

 • Dinesh. says:
  ०८ मे, २०१०

  प्रिय संदीप,
  मी अधुन मधून आपल्या ब्लोग्वर यायचो पण मी सुध्धा कधि प्रतिक्रिया दिली नाही.
  व्यावसायीक ब्लॉगर या अनुभवाने सांगतो आपल्या ब्लॉगवर लोकांनी यायला प्रचंड वेळ लागतो. त्यात बरेच जण प्रतिक्रीया का द्यावी या मताचेच असतात.
  तरिही आपण निराश न होता आपले कार्य चालू द्यावे ही विनंती.
  दिनेश.
  http://sarvottam-marathi-vinod.blogspot.com

 • संदीप says:
  ०८ मे, २०१०

  Dear Dineshji,
  -Thats it! I was expecting true opinions, and thanks a lot!
  I immidiately visited your blog for clues to improve my blog.Thanks again!