Share/Bookmark

१९ जून, २०१०

"तांत्रिक विश्लेषण" विषयक माहितीपत्र ...

सर्व वाचकांना माहीतच असेल कि "शेअरबाजार-साधा सोपा" कडून सर्व सदस्य किंवा अनुयायांना पाठविले जाणारे "तांत्रिक विश्लेषण" विषयक माहितीपत्र हे गूगल फ्रेंड कनेक्ट या गूगल सेवेतर्फे पाठविले जाते. या माहितीपत्रामध्ये अर्थातच आलेखाकृतींचा समावेश आहे. काही कारणाने गूगलच्या या सेवेमध्ये इमेज अपलोड सध्या शक्य होत नसल्याने, सदस्यांची गैरसोय टाळण्यासाठी , सदर माहितीपत्र (भाग-३)  फ्रेंड कनेक्ट तर्फे न पाठविता ते यावेळी येथेच प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. सदर अडचण दूर झाल्यावर सर्व सदस्यांना ते पूर्वीप्रमाणेच पाठविले जाईल.

मात्र यामुळे सदस्यता न घेतलेल्यांना येथे त्याचा अनायासेच लाभ होणार आहे, तेव्हा ज्या कुणाला पुढील सर्व भाग हवे असतील त्यांनी या ब्लोगची सदस्यता घेउन दर आठवड्याला मराठीतून प्रसिद्ध होणार्या या माहितीपत्राचा लाभ घ्यावा. ही सेवा अर्थातच पूर्णपणे मोफत आहे.
ज्या सदस्यांना हे माहितीपत्र काही कारणाने मिळाले नसेल त्यांनी येथेच Comment मध्ये आपल्या इमेल पत्त्यासह तसे कळवल्यास त्यांना ते त्वरीत पाठवले जाईल.

   ***************************************************************************

                              तांत्रिक विश्लेषण-भाग ३


                  विविध ट्रेंड्स आणि त्यांची उपयुक्तता-
तांत्रिक विश्लेषणातील सर्वात महत्वाचा गणला जाणारा घटक म्हणजे "ट्रेंड".-म्हणजेच अशी दिशा किंवा साधारण कल ज्यानुसार बाजाराची अथवा एखाद्या शेअरची किंमत बदलत जाते.आता खालील आलेख
किंवा चार्ट पहा.


वरील चार्टमधील चढत जाणारा कल अगदी सहजच लक्षांत येतो, मात्र नेहमीच असा स्पष्ट कल ओळखता येतोच असे नाही.खालील चार्टमध्ये इतके चढ-उतार आहेत कि त्याची नेमकी दिशा ठरवणे कठीण आहे.


आपल्याला हे माहीत असेलच कि एखाद्या शेअरची किंवा निर्देशांकाची किंमत अगदी सरळ रेषेत कधीच वाढत वा कमी होत नाही तर छोट्या छोट्या चढ-उतारांची किंवा TOP & BOTTOMS ची ती एक मालिकाच असते. आणि याच छोट्या चढ-उतारांचा तांत्रिक विश्लेषणामध्ये ट्रेंड ठरवण्यासाठी वापर केला जातो. आता खालील आलेख पहा-



हे अपट्रेंड किंवा चढत्या कलाचे उदाहरण आहे.  क्र.२ हा पहिला TOP किंवा HIGH POINT आहे.यानंतर किंमत कमी झाली असून क्र.३ येथे ती पहिला तळ किंवा BOTTOM बनवत आहे. त्यानंतर आलेला क्र.४ चा TOP हा आधीच्या म्हणजेच क्र.२ च्या TOP पेक्षा उच्च पातळीवर आहे आणि नंतर आलेला क्र.५ चा BOTTOM हा त्याआधीच्या म्हणजेच क्र.३ च्या BOTTOM च्या वरच्या पातळीवर आहे. तसेच क्र.६ हा क्र. ४ पेक्षा उच्च पातळीवर आहे.अशा चढत जाणार्या TOPS & BOTTOMS ना Higher Tops/Higher Bottoms असे संबोधले जाते.आणि याप्रकारे सदर चार्टमधील अपट्रेंड निश्चित केला जातो. याउलट एखाद्या वेळी आधीच्या TOP पेक्षा नंतरचा TOP (किंवा आधीच्या BOTTOM पेक्षा नंतरचा BOTTOM ) हा खाली आला तर ट्रेंड रिवर्सलची म्हणजेच डाउनट्रेंड (उतरता कल) सुरू होण्याची शक्यता असते.
आता ट्रेंडचे दोन प्रकार-अपट्रेंड आणि डाउनट्रेंड हे आपल्या चांगले लक्षांत आले असतील.

         या व्यतिरिक्त कधी कधी बाजार आणखी एका प्रकारे हालचाल करतो- ज्यात बाजार रेंगाळलेला असतो- विशेष चढ-उतारच नसतात, त्याला SADEWAYS TREND म्हणतात. तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टीने हा खरे म्हणजे ट्रेंड नसतोच तर दिशाहीनता असते.


     हॆ झाले ट्रेंडच्या दिशेवरून ठरणारे प्रकार. आता ट्रेंडची लांबी म्हणजेच मुदतीवरून तीन प्रकार पडतात-

* SHORT TERM TREND (अल्पावधीसाठीचा कल)- महिना वा त्यापेक्षा कमी काळ चालणारा.

* INTERMEDIATE  TREND (मध्यम अवधी कल -एक ते तीन महिन्याचा काळ चालणारा.


* LONG TERM TREND (दीर्घ अवधी कल)- एक वर्षापेक्षा मोठा काळ चालणारा.

एका लोंगटर्म ट्रेंडच्या दरम्यान काही इंटरमिजिएट ट्रेंड असू शकतात कि जे मूळ ट्रेंडच्या विरुद्ध दिशेचे असतात. म्हणजेच एका दीर्घ अपट्रेंडमध्ये काही छोटे मध्यावधीचे वा अल्पावधीचे डाउनट्रेंड असू शकतात, त्याचप्रमाणे एका दीर्घ डाउनट्रेंड मध्ये काही मध्यावधीचे वा अल्पावधीचे अपट्रेंड असू शकतात. खालील चार्ट पहा-



येथे मूळच्या लोन्गटर्म अपट्रेंडमध्ये मध्य वा अल्पावधीचे डाउनट्रेंड सामावलेले दिसतात.
ट्रेंड चा अनालिसिस करताना चार्टची निवड योग्य प्रकारे करावी लागते म्हणजेच दीर्घावधीच्या ट्रेंडचा अभ्यास करण्यासाठी पांच वर्षे कालावधीचा डॆली किंवा वीकली डाटा (रोजच्या अथवा आठवड्याच्या किंमतींची नोंद असलेला) चार्ट वापरतात. मात्र मध्यावधी वा अल्पावधीसाठी फक्त डॆली डाटा चार्ट वापरावा लागतो. ट्रेंड जेवढा मोठया अवधीचा तेवढा तो साहजिकच ठळकपणे जाणवणारा असतो.

ट्रेंडलाईन्स-

ट्रेंडलाईन म्हणजे एखादा ट्रेंड दाखविणारी चार्टमध्ये काढलेली एक काल्पनिक सरळ रेषा.या रेषांचा वापर ट्रेंड आणि त्याचा रिवर्सल म्हणजे ट्रेंड बदलण्याची क्रिया दर्शवण्यासाठीही करतात. खालील चार्टमध्ये एक अपट्रेंड दिसत असून प्रत्येक LOW किंवा खालच्या बाजूच्या बिंदूंस जोडणारी एक सरळ रेषा काढलेली आहे.ही ट्रेंडलाईन, त्या विशिष्ट शेअरच्या किंमतीत होणारी घट जेव्हा जेव्हा थांबते त्या सर्व बिंदूंस जोडणारी आहे.म्हणजेच ही ट्रेंडलाईन सपोर्ट (आधार पातळी) दाखविणारी रेषा आहे. दुसर्या शब्दात सांगायचे तर या ट्रेंडलाईनमुळे किंमत घटण्याची प्रक्रिया थांबून ती परत वाढणे नेमके कधी सुरू होइल हे ठरवणे शक्य होते.

याचप्रकारे डाउनट्रेंड मध्ये अशी सरळ रेषा ही सर्व HIGH POINTS ना जोडणारी काढली जाते आणि ती रेषा, जेथे किंमत वाढणे थांबून कमी व्हायला सुरुवात होते ते सर्व बिंदू जोडणारी असते- म्हणजेच ती असते रेसिस्टन्स लेवल (विरोध पातळी) दाखविणारी रेषा.

CHANNELS ( चाकोरी )-

वरील विवेचनाप्रमाणे जर आधार आणि विरोध अशा दोन पातळी दाखविणार्या दोन समांतर रेषा जर चार्टमध्ये काढल्या तर त्याने बनतो तो चानेल. खालील आकृती पहा-



या चार्ट मध्ये उतरता म्हणजेच डाउनट्रेंड चानेल दाखविला आहे. अशा प्रकारे वरील बाजूस उच्चबिंदू व खालील बाजूस नीचबिंदूंना जोडणार्या दोन सरळ रेषांनी बनलेला हा चानेल अपट्रेंड,  डाउनट्रेंड वा साईडवेज असा कुठलाही कल दाखवू शकतो. कल कोणताही असला तरी मूळ गृहीतक असे कि सदर शेअरची किंमत या दोन पातळ्यांमध्येच बरेच वेळा वरखाली होत रहाते. अशी चाकोरीबद्ध प्रक्रिया काही महिनेसुद्धा चालू शकते. जोपर्यंत किंमत खालील वा वरील बाजूची ट्रेंडलाईन तोडून त्याबाहेर जात नाही तोपर्यंत आहे हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता असते. जर एखाद्या वेळी किंमतीने दोन्हीपैकी कोणतीही पातळी तोडली तर त्या दिशेने किंमत आणखी पूढे जाण्याची शक्यता असते.यालाच ब्रेकआउट (वरील बाजूस तोडण्याची क्रिया) व ब्रेकडाऊन (खालील बाजूस तोडण्याची क्रिया) असे म्हणतात. अशा प्रकारे चानेल्स हे कल दाखविण्याबरोबरच आधार व विरोध अशा महत्वाच्या पातळ्या दर्शविण्याचे काम करतात.


वरील विवेचनातून आपण जर ट्रेंड ओळखणे शिकलो तर त्याविरुद्ध जाऊन आपण चूकीची खरेदी वा विक्री करणार नाही. तांत्रिक विश्लेषणामध्ये "TREND IS YOUR FRIEND" असे म्हटले जाते, एवढे "ट्रेंड" या संकल्पनेला महत्व आहे.या मित्राचा हात धरून ठेवा-तो आपल्याला कधी दगा देणार नाही!

पूढील भागात- आधार व विरोध पातळी विषयी विवेचन.

5 comments:

  • urmila says:
    २० जून, २०१०

    yes but we need it before 8.30 as city like mumbai we have to reach broker's bolt before 9 for preopening trade orders. so request it earlier that 8.30
    urmila

  • avinash says:
    २० जून, २०१०

    मी आपल्या ब्लोगचा सदस्य झालो आहे. कृपया technical analysis चे पहीले दोन भाग आपण मला ketkaravinash@yahoo.com या पत्त्यावर पाठवू शकाल काय?
    धन्यवाद.
    -अविनाश

  • urmila says:
    २० जून, २०१०

    pl add my mail id to get your posts
    uwadwekar@yahoo.com
    urmila wadwekar

  • Unknown says:
    ३० जून, २०१०

    धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.

    sandy

  • dilip bhagat says:
    ०८ डिसेंबर, २०१४

    dilipbhagat333@gmail.com