Share/Bookmark

२१ जून, २०१०

काही झाले तरी फायदाच !

मजबूत जागतिक पार्श्वभूमीवर आपल्या निफ्टीने आज ५३०० च्या पूढे दिमाखात मजल मारली आहे. या आठवड्याची सुरुवात जोरात झाली आहे. गुंतवणूकदारांना फायदा झालेला दिसत आहे.
अशा प्रकारे तेजीच्या वातावरणातही, या आधीच्या लिखाणात मी नवीन गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला होता, तो मात्र मी आजही कायम ठेवत आहे. असे का ?     आजपर्यंतच्या बाजाराच्या घोडदौडीत आपली गुंतवणूक चांगली वाढ दाखवत असलीच पाहिजे- ( आणि तसे नसेल तर आपली शेअरची निवड चूकली आहे असे खुशाल समजा .) नवीन गुंतवणूक करण्यापेक्षा खरी निकड आहे ती आता कागदावर दिसत असलेला हा फायदा थोड्या प्रमाणात तरी खिशात टाकण्याचीच. गुंतवणूक संधी पुन्हा मिळणारच आहेत. पण जवळ रोख असेल तरच त्या घेता येतील नाही का?

  मला असे का वाटते? याची कारणे अशी-

     १) वरचेवर होणारी GAP-UP ओपनिंग - या GAPS नजिकच्या काळात भरल्या जाण्याची शक्यता नेहमीच असते.
     २) एप्रिलमधील निफ्टी ( ५३७४) आणि सेन्सेक्स ( १७९७०) हे उच्चांक आता अनुक्रमे फक्त २२ आणि ९४ अंकांनी दूर ! हे अंतर एका दिवसातही पार होवू शकेल, मात्र अचानक विक्री होण्याची  सर्वाधिक शक्यताही आताच आहे.
     ३) निफ्टी पी/ई २२.४२ झाला आहे आणि  नजिकच्या काळातील २३ या उच्चांकाच्या तो अगदी जवळ पोचला आहे.
     ४) FTSE -लंडनला आपली सुरुवातीची वाढ टिकवता आलेली नाही- तूर्त २० EMA ने १०० व २०० EMA ला वरून खाली छेदले आहे.
     ५) हेन्गसेन्ग निर्देशांक आजच्या प्रचंड तेजीनंतर उद्या CONSOLIDATE होण्याची शक्यता आहे.
   
वरील सर्व कारणांवर मात करून बाजाराने आगेकूच केलीच तरी काही हरकत नाही- आपले मागे पडलेले शेअर विकण्याची संधी आयतीच प्राप्त होइल- तेव्हा काही झाले तरी फायदाच होइल अशा रितीने आपली रणनिती ठरवा.