कोल इंडीयाचे उत्तम लिस्टींग, ऐन दिवाळीत ALL TIME HIGH असणारा बाजार, ओबामांचा भारत दौरा अशा भरगच्च घडामोडींचा आठवडा संपून आता पुढील आठवड्याचा अंदाज घेवूया.
उच्च पातळीवर आलेले लंडन व अमेरिकेचे बाजार
गेले दोन दिवस तेथे कन्सोलिडेट होत आहेत. हेन्गसेन्ग मजबूत आहेच पण जपानच्या निक्केइ ने गेल्या महिनाभरात गमावलेले फक्त दोन दिवसात भरून काढलेले दिसत आहे.
आपल्याकडे कोल इंडीया आणि दिवाळी मुहुर्त या दोन्ही घटना स्थानिक महत्वाच्या असल्या तरी ओबामा दौरा हा त्याहून जास्त महत्वाचा आहे, कारण त्यांनी आल्याआल्याच हे स्पष्ट केले आहे की त्यांच्याकडील नोकर्या वाढवण्यासाठी ते येथे आले आहेत.त्यांच्या भाषणात "भारत आणि अमेरिका समान महत्वाचे वा बरोबरीचे देश आहेत" आणि "भारत आता विकसनशील नसून विकसीत देश बनला आहे" अशा अर्थाचे उल्लेख आले असले तरी अमेरिकेचे व आपले नुसते जीडीपीचे आकडे बघितले तर अशा भाषणांना किती अर्थ आहे ते लक्षांत येते. मग पूर्वीपेक्षा नेमके काय बदलले आहे?
फरक इतकाच झाला आहे, कि ते आता त्यांच्या इकोनोमीपुढील प्रश्न सोडवत आहेत, आणि भारत हा त्यांच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ असून त्यात अधिकाधिक प्रवेश करण्यासाठी त्यांना दोन्ही बाजूंनी होणार्या ट्रेड्स ची आठवण झाली आहे.
मात्र एकंदर परिस्थितीचा लाभ घेण्याइतपत भारतातील इंडस्ट्री आता सक्षम बनली आहे हे मात्र नक्की, आणि त्याचा बाजारावर चांगलाच परिणाम होइल. मात्र नेमक्या कुठल्या सेक्टरसाठी अनुकूल वा प्रतिकूल करार/ घोषणा होतील हे मात्र बघावे लागेल. येत्या एकदोन दिवसात दिल्लीत काय घोषणा होतात त्यावर लक्ष असू द्या.
आपल्या बाजारात होणारी FII ची गुंतवणूक अशीच पुढे होत राहील का यावर बरेच काही अवलंबून आहे. येत्या ख्रिसमस मध्ये युरोप व अमेरिकेतील व्यवसाय/विक्री चे आकडे वाढण्याची शक्यता आहे, त्यावरून तेथील इन्वेस्टर कोन्फिडन्स दिसून येत असतो. चीन सरकारने महागाई रोखण्यासाठी पावले उचलली आहेत, मात्र आपल्याकडे व्याजदर वाढवूनही महागाईवर नियंत्रण आल्याचे दिसत नाही. याचे एक कारण परकीय गुंतवणूकीमुळे वाढणारी लिक्वीडीटी असून परकीय गुंतवणूकीवर नियंत्रण आणणारी पावले अजूनही टाकली गेलेली नाहीत.
इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स (IIP) ,सेल्स आणि एक्सपोर्टचे सेक्टरनुसार येणारे आकडे यावर नजर ठेवली असता बाजाराच्या पुढील चालीचा काही अंदाज येवू शकतो.
मात्र सामान्य माणूस एकाच वेळी असा सर्व बाजूनी अभ्यास करू शकत नाही. तेव्हा बाजार आता खूप वाढलेला आहे हे ध्यानात ठेवून मर्यादीत धोका पत्करण्याला पर्याय नाही.
यापूढे तांत्रिकदृष्ट्या बाजार पूर्णपणे नवीन झोनमध्ये असून रोज नव्या पातळी तयार होण्याची शक्यता दिसत आहे. एकंदर वातावरण चांगलेच दिसत असले तरी मोहावर विजय मिळवून थोडाथोडा फायदा बाजूला काढत रहा.
पुन्हा एकदा आठवण करून देतो कि तेजीच्या अशा वातावरणात कोणीही कितीही आत्मविश्वासाने "टीप" दिली तरी ज्या कंपनीची उत्पादने आपण बाजारात पहात नाही, जिचे रिजल्ट चांगले नाहीत, कारखाना नेमका कुठे आहे ते माहीत नाही, इपीएस व डिव्हीडंडचे रेकोर्ड नाही, अशा कंपनीमध्ये आपला कष्टाचा पैसा टाकू नका. मोठ्या तेजीमध्ये अशा कंपन्यांचे भावही वेगाने वाढताना दिसतात मात्र ते अळवावरचे पाणी असते हे विसरू नका.
Loading...
Gadget by The Blog Doctor.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकप्रिय पोस्ट
-
मित्रहो, खूप दिवसांनी येथे लिहिताना मला आनंद होत आहे. आज ही पोस्ट लिहिताना, गेल्या वर्षभरात शेअरबाजारात झालेल्या तीव्र घसरणीचा संदर्...
-
शेअरबाजारात १०० टक्के नफा कमवायचाय? - १०० टक्के अचूक (Sure-Shot) टिप्स- "आमच्या वर्षानुवर्षाच्या निरीक्षण आणि अभ्यासानंतर आणि अतिशय मेहन...
-
मित्रहो, वेळेच्या कमतरतेमुळे बर्याच दिवसांनी येथे लिखाण करत असलो तरी सर्वांना उपयोगी पडेल असे काहीतरी मराठीतून व सोप्या भाषेत उपलब्ध करताना...
-
काल निफ्टी ६००० तर सेन्सेक्स २०००० या जादुई आकड्यांच्या अगदी जवळ जावून ठेपले आहेत. आता बाजारात रोजच वाढीची शक्यता गृहित धरून इण्ट्रा-डे किंव...
-
मित्रांनो, गेले बरेच दिवस वेळेच्या कमतरतेमुळे लिखाण करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व ! मात्र याअगोदर ठरविल्याप्रमाणे आतापर्यंत फक्त या ब्...
-
दिवाळी मुहुर्ताच्या दिवशी दिसलेल्या तेजीनंतर गेले दोन आठवडे बाजार सातत्याने पडत आहे. याला ग्लोबल घटना कारणीभूत होत्या, तसेच देशांतर्गत घोटा...
-
काल येथे लिहिताना आशियाई बाजार वाढतील असे वाटले होते पण ते इतके मजबूत उघडतील अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळेच निफ्टी तब्बल ५० अंश वरच उघडला -आ...
-
सेन्सेक्स १७००० ! आपल्या कालच्या कयासाप्रमाणेच कालचीच स्थिर गती कायम ठेवत बाजाराने आपली दौड आजही चालू ठेवली आहे असे दिसते मात्र जागतिक बाजा...
-
नव्या आठवड्याची सुरुवात बाजार कशी करतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.गेल्या आठवड्यातला डाऊनट्रेन्ड, आणि आयर्लंडच्या कर्जबाजारी होण्याची नव्यान...
-
तांत्रिक विश्लेषणाची ओळख : भाग १४ इंडिकेटर्स आणि ओसिलेटर्स - रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स (RSI) यामागील भागात आपण मूव्हींग एवरेजेसविषयी...
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा