Share/Bookmark

२६ नोव्हें, २०१०

सेन्सेक्स परत १५००० होणार कि १०००० ?

२००९ मध्ये मार्केट चढायला लागल्यावर मला बरेच जण विचारायचे- सेन्सेक्स परत २१००० वर केव्हा जाईल ? त्या प्रश्नाचे मला हसू येत असे, आणि आता काही जण विचारतात -
सेन्सेक्स परत १५००० होणार कि १०००० ?
मित्रांनो, या प्रश्नाची उत्तरे कुणाला माहित असती तर -?
अशा प्रश्नांचा विचार करत बसण्यापेक्षा आणि परफेक्ट बोटम गाठण्याचा प्रयत्न करत बसण्यापेक्षा, प्रत्येक पायरीवर- आता ही "पायरी" ही सेन्सेक्सच्या हजार पोइन्टची असावी, कि निफ्टीच्या ५ % असावी कि सपोर्ट-रझिस्टन्स लेवलनुसार असावी हे आपापल्या अंदाजाने ठरवले तरी चालेल. महत्व या गोष्टीला आहे कि खालील बाजूस खरेदी व अधिक खालील बाजूस अधिक खरेदी असायला हवी.- हे अमलात आणणे सायकोलोजीकली कठीण आहे याची मला जाणीव आहे, पण अशा करेक्शन मध्ये हीच बेस्ट स्ट्रेटेजी ठरते- काही लोक इन्सायडर न्युज असल्यासारखे काही भविष्यवाणी करत असतात, पण त्याची योग्य कारणमिमांसा ते करू शकत नाहीत. काही लोकांना नेहमी अशी लोटरी लागते- अशामध्ये आपण असाल तर हा ब्लोग वाचण्याचे काहीच कारण नाही.
 दोन तीन दिवसापूर्वीच मी इन्फोसिस व ओएनजीसीबद्दल लिहिले होते,आणि इन्फोसिस आज बराच वाढलेला आपण बघितलाच असेल.
उद्या शुक्रवार असल्याने बाजाराने ट्रेन्ड काहीही दाखवला तरी सोमवारपर्यंत जागतिक बाजारांचा आढावा घेण्यासाठी थांबणे बरे.