Share/Bookmark

१५ नोव्हें, २०१०

कुठल्या शेअर्समधे बोटम फिशिंग करावे ?

नव्या आठवड्याची सुरुवात बाजार कशी करतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.गेल्या आठवड्यातला डाऊनट्रेन्ड, आणि आयर्लंडच्या कर्जबाजारी होण्याची नव्याने होत असलेली चर्चा या बाबी बाजारासाठी प्रतिकूल आहेत, मात्र जपानमध्ये GDP मध्ये झालेली वाढ
आणि त्यामुळे आज सकाळी तेजी दाखवणारा निक्केइ इन्डेक्स, तसेच निफ्टीला ५९५० येथे असलेला सपोर्ट व त्यामुळे ६००० च्या पातळीपासूनच होणारे संभाव्य शोर्ट-कव्हरींग, या जमेच्या बाजू रहातील.
जर बाजाराने आज ट्रेन्ड रिवर्सल केले,व ते क्लोजिंगपर्यंत टिकले, तर व जागतिक बाजार प्रतिकूल नसल्यास उद्यासाठी खाली दिलेल्या काही शेअर्सचा विचार थोड्या प्रमाणात खरेदीसाठी करावा असे मला वाटते, मात्र हे माझे व्यक्तिगत मत असून वाचकांनी खरेदीपूर्वी स्वत:चा अभ्यास जरूर करावा.
  • एल.आय.सी हाऊसिंग फायनान्स
  • बेंक ओफ बरोडा
  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स
  • टाटा मोटर्स
  • बीजीआर एनर्जी
  • इंडीयाबुल्स रिअल इस्टेट
  • दीवाण हाऊसिंग फायनान्स
  • कोल इंडीया लि.
  • रिलायन्स इंडस्ट्रीज
  • येस बेंक
     वर दिलेल्या शेअर्समधे बाजाराचा कल बघून बोटम फिशिंग केल्यास लवकरात लवकर फायदा मिळेल असे दिसते.मात्र आज सकाळी बाजार पोझिटीव्ह ओपन झाला तरी खरेदीची घाई करू नये.