या ब्लॉगवर फ्री टीप्सविषयी नुकताच मी एक छोटा सर्व्हे केला. त्याद्वारे माझ्या वाचकांना काय वाटते, याबरोबरच ते कशाप्रकारे ट्रेड करू इच्छितात हे ही जाणून घेण्याचा माझा प्रयत्न होता. सर्वच वाचकांनी आपले मत नोंदवले असेल असे नाही, तरीही ब-याच जणांनी आपले मत मांडून उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
या सर्व्हेच्या निकालानुसार ७३% लोकांना टीप्स हव्या आहेत तर ६% लोकांनी स्पष्टपणे 'नको' असल्याचे सांगितलेय. या ६% पैकी अनेकजण स्वतःच अभ्यास करून आपले ट्रेडींग करत असतील तर ती खरंच चांगली बाब असून मी त्यांना सुयश चिंततो. मात्र अनेक लोकांना टीप्सची मदत भासते असेही दिसते. वरील दोन्ही आकड्यांमधील फरक मोठा असल्याने सर्वसाधारण मत 'टीप्स हव्यात' असे दिसत आहे.
याशिवाय इन्ट्राडे टीप्स हव्यात असे ४२% , डिलीव्हरी टीप्स ३३% व फ्युचर्स/ऑप्शन्स टीप्स हव्यात असे ३६% लोकांना वाटते. या तीनही टक्केवारीत मात्र फार फरक दिसत नाही. पण त्यातही 'इन्ट्राडे टीप्स' ला थोडी अधिक मागणी आहे असे म्हणावे लागेल.
वरील बाबींचा विचार करून या ब्लॉगवर 'टीप्स' सुरू करण्याचा माझा विचार असला तरी त्यांचे स्वरूप नक्की करून मगच त्याबाबत कळवेन. दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार !
या सर्व्हेच्या निकालानुसार ७३% लोकांना टीप्स हव्या आहेत तर ६% लोकांनी स्पष्टपणे 'नको' असल्याचे सांगितलेय. या ६% पैकी अनेकजण स्वतःच अभ्यास करून आपले ट्रेडींग करत असतील तर ती खरंच चांगली बाब असून मी त्यांना सुयश चिंततो. मात्र अनेक लोकांना टीप्सची मदत भासते असेही दिसते. वरील दोन्ही आकड्यांमधील फरक मोठा असल्याने सर्वसाधारण मत 'टीप्स हव्यात' असे दिसत आहे.
याशिवाय इन्ट्राडे टीप्स हव्यात असे ४२% , डिलीव्हरी टीप्स ३३% व फ्युचर्स/ऑप्शन्स टीप्स हव्यात असे ३६% लोकांना वाटते. या तीनही टक्केवारीत मात्र फार फरक दिसत नाही. पण त्यातही 'इन्ट्राडे टीप्स' ला थोडी अधिक मागणी आहे असे म्हणावे लागेल.
वरील बाबींचा विचार करून या ब्लॉगवर 'टीप्स' सुरू करण्याचा माझा विचार असला तरी त्यांचे स्वरूप नक्की करून मगच त्याबाबत कळवेन. दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार !
डिलिवरी टिप्स आणि फ्युचर-ऑप्शन टिप्स हव्यात असे म्हणणार्यांची संख्या कमी असण्याचे एक कारण असे वाटते की मुळातच हे व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या इंट्राडे व्यवहार करणाऱ्या लोकांपेक्षा कमी असते. तुमचा ब्लॉग जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला तर शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्या मराठी लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
उदात्त हेतूने हा ब्लॉग लिहिण्याबद्दल मनःपूर्वक आभार!
nifty option baddal kahi tari liha ajun plz
@चंद्रगुप्तजी, मी सहमत आहे. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
@avi,ऑप्शन्स बद्दलची माहिती लवकरच देणारच आहे.प्रतिक्रियेबद्दल आभार.
आभारी आहे संदीप गुरुजी ..... मी OPTION TRADING करताना समजा SEPTEMBER EXPIARY DATE 27 ASEL TAR MI PUDHCHYA MAHINYACHA MEANS OCTOBERCHA CALL ANI PUT BUY KRTO JO 70 RS. STRIKE PRICE ASEL NANTAR TO TASACH THEVATO DONHI MADHIL EKACHI TARI PRICE VADHTEY TYAMDHE MINIMUM PER LOT PATHIMAGE 8000RS. PROFIT HOTO SURE SHOT
Dear avi,
हे 'गुरूजी' वगैरे काय लावलंय ? मी आपल्यासारखाच सामान्य ट्रेडर आहे. असो.
आपली स्ट्रॅटेजी चांगलीच आहे. आपण जी स्ट्रॅटेजी वापरताय तीला Long Straddle (एकाच स्ट्राईक प्राईजचे कॉल व पुट खरेदी करणे) म्ह्णतात. योगायोगाने ती मीही वापरलेली आहे. यामध्ये निफ्टीच्या दिशेला महत्व नसून वोलॅटिलिटीला आहे.बरेचदा ती यशस्वी होते, नक्की फायदा मिळतो-विशेषतः निफ्टीमध्ये ३०० पेक्षा मोठी हालचाल (एका दिशेने) होते-जशी सप्टेंबरमध्ये सरकारच्या मोठ्या घोषणेमुळे झाली. मात्र तशी मोठी हालचाल अनेकदा होत नाही हाच प्रॉब्लेम आहे. मुळ स्ट्रॅटेजीमध्ये थोडा फरक करून, ज्या स्ट्राईक प्राइजचा प्रिमियम ७० च्या आसपास असेल त्यांचे कॉल व पुट आपण घेता असे दिसते. म्हणजे २७ ता. च्या आसपास टोटल प्रिमियम एका लॉटचे ट्रेडींगमागे सुमारे ७००० होत असेल ( बरोबर आहे का ?) आपल्याकडे पुरा महिना मुदत असते. हे सर्व ठीकच आहे. मात्र यानुसार साधारणपणे कॉल व पुटच्या स्ट्राईक प्राईजमध्ये किमान २०० चे अंतर रहात असेल. हे अंतर पार करून कुठल्यातरी एका दिशेला निफ्टीला पहिल्या दोन आठवड्यात जावे लागेल, नाहीतर टाईम डिके आपला प्रिमियम खाऊन टाकेल. म्हणजेच शेवटच्या आठवड्यापर्यंत जर आपल्याला वाट पाहावी लागली तर आपला टोटल प्रिमियम ५० रुच्या खाली येवू शकतो म्हणजेच आपले भांडवल निम्म्यापेक्षा कमी होण्याची शक्यता असते,आणि शेवटी तर प्रिमियम जवळजवळ नाहीसा होऊ पहातो. अशा वेळी आपण काय करता ?स्टॉपलॉस लावता का ? कधी आणि कुठे ? अनेकदा थोडा फायदा दिसू लागतो आणि निफ्टीची दिशा उलट फिरते. नुसताच कालावधी कमी होतो.इ. अनुभव आले आहेत. अशा अनेक स्ट्रॅटेजीज ची चर्चा आपण यापुढे करणारच आहोत मात्र ऑप्शन्सची ओळख करून घेतल्यावरच ! आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ब्लॉगवरील कॉमेन्ट्स मधूनही बरेच शिकायला मिळते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे सर्व वाचकांनी कॉमेन्ट्सही वाचणे गरजेचे आहे असे वाटते. आपल्या ट्रेडींसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!
कमीत कमी ५०० रुपये फायदा तरी एका lot पाठीमागे होतोच.....
संदीप,
मुळात निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग हे मार्केट मधील सीझन्ड प्लेयर साठी उपलब्ध असलेले हत्यार आहे असे माझेवैयक्तिक स्पष्ट मत आहे.झाला तर झटका नाही तर फटका हे सर्व सामान्य गुंतवणूकदारांना न परवडणारे नि मानवणारे असते.ज्या ट्रेडर्स चा मार्केटचा वैयक्तिक अभ्यास आहे अशा ट्रेडर्सना नजीकच्या भविष्य काळात मार्केटची दिशा त्यांच्या अंदाज नुसार काय असू शकेल ,ह्याची जास्तीत जास्त चांगली अटकळ बांधता येऊन योग्य वेळी ऑप्शन मध्ये खरेदी करून संधी साधता येते अशा ट्रेडर्स साठी ते फायद्याचे ठरू शकते,तथापि अशी संधी मार्केट मध्ये नियमित उपलब्ध नसते.त्या मुळे "टाईम डिके" हा ह्या ट्रेडिंग प्रकारातील मुख्य फॅक्टर ट्रेडर चे भांडवलच धुऊन नेतो.हा ऑप्शन ट्रेडिंग मधील सर्वात मोठा धोका आहे.
निफ्टी हि आवरली,किंवा डेली बेसिस मध्ये जेव्हा-जेव्हा हायली ओव्हर बॉट कंडीशन मध्ये येते नि तिच्या आवरली किंवा डेली 5HEMA च्या वर टिकणे तिला अवघड होऊन बसते,त्या-त्या वेळी त्या वेळच्या निफ्टी प्राईस नुसार जवळचा किंवा -१०० असा पुट खरेदी केल्यास त्यात भांडवल गायब होण्याची शक्यता फार म्हणजे फार कमी असते असे माझे निरीक्षण आहे.उलटपक्षी लॉन्गर टर्म चार्ट वर सुद्धा (विकली/मंथली) ती जर हायली ओव्हर बॉट झोन च्या जवळ असेल व वर म्हटल्या प्रमाणे short टर्म चार्ट नुसार HEMA आणि LEMA मधील फरक हा साधारण ५० ते ७० points च्या आसपासच झाला असेल तर मूळ भांडवलाच्या १५% पासून अगदी २००-५०० % पर्यंत नफा होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात...आणि अशी संधी साधता येणे नि त्या साठी टपून बसणे हे ट्रेडर्स साठी आवश्यक असते...
Dear Mynac जी,
आपण व्यक्त केलेले मत अनुभवातून आले आहे आणि म्हणूनच महत्वाचे आहे.झटक्याच्या संदर्भात मात्र मला असे वाटते कि फ्युचर्सच्या तुलनेत ऑप्शन्स मध्ये अधिक पर्याय उपलब्ध आहेत.तसेच धोका कमी आहे. चांगली अटकळ बांधणे कधीही उत्तम पण तेच तर सर्वात कठीण!टाईम डिके ही समस्या आहे असे मानले तर त्यावर उपाय नाही, मात्र या समस्येला मित्र करून घेता येण्याची सोय फक्त ऑप्शन्स मधेच मिळू शकते, नाही का ? आपण म्हणता तशी कोणतीही ओवरबॉट स्थिती जर खरोखरच नीट (अट)कळली तर पुट खरेदी करण्यापेक्षा मी थोडा लांबचा(२००+ वा ३००+) कॉल विकणे पसंत करेन. यात भांडवल अधिक ब्लॉक होते पण भविष्य ब्लॉक होत नाही.अर्थात येथेही मिळणारे यश हे अटकळ किती अचूक यावरच ठरते मात्र मार्केट कुठून रिवर्स करणार हे ठरवण्यापेक्षा ते कुठे थकले आहे हे ठरवणे काहीसे सोपे वाटते मला. शिवाय २००-३०० पॉइन्टने माझा अंदाज चुकला तरच मला धोका! याविषयीचे व कव्हर्ड कॉल वगैरे लेखन स्टेप बाय स्टेप येणारच आहे. आपल्या प्रतिक्रियेने चर्चेला चालना मिळते! अशा प्रतिक्रिया most welcome आहेत या ब्लॉगवर!
he HEMA ani LEMA mhanaje kay? ani google finance madhe kuthe pahayche