Share/Bookmark

९ सप्टें, २०१२

स्टॉपलॉस लावणे आवडत नाही ? स्टॉप ऍन्ड रिवर्स (SAR) ट्रेडींग -


मित्रांनो,
मराठीमध्ये एक म्हण आहे- ' सरशी तिकडे पारशी ! '
समाजात अशा प्रवृत्तीला  नैतिक समजले जात नाही. ही एक प्रकारची लबाडी मानली जाते.  राजकारणातही सतत पक्ष बदलणारा नेता -' आयाराम गयाराम ' -हा टीकेचे लक्ष्य होत असतो.
सामान्यतः आपण मराठी लोक अशा प्रकारच्या बदलत्या भूमिकेला पसंत करत नाही. मात्र -
शेअरबाजारात अशा प्रकारच्या मनोवृत्तीचीच गरज असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बाजार हा सतत आपला मूड बदलत असतो आणि त्याच्यावर आपले काहीही नियंत्रण नाही , हे एकदा उमजले कि  बाजाराप्रमाणे आपलीही दिशा बदलत रहाणे हा ट्रेडर्ससाठी आवश्यक  असा ' गुण ' कसा ठरतो हे लक्षांत येईल.
      पण थांबा -बाजारावर आपले नियंत्रण नाही हे जरी खरे असले तरी आपल्या संभाव्य तोट्यावर आपण  नियंत्रण मिळवू शकतो. आणि असे नियंत्रण करणे जमले कि फायदा होइपर्यंत बाजारात टिकाव धरणे शक्य होते. आणि मग मात्र 'सरशी तिकडे पारशी ' या म्हणीप्रमाणे वागून बाजारात फायदा मिळवणे शक्य होते ते 'स्टॉप ऍन्ड रिवर्स (SAR) ट्रेडींग सिस्टीम च्या मदतीने. कसे तेच आता बघुया -
'  स्टोप ऍन्ड रिवर्स ट्रेडींग ' ( SAR) हे मुख्यत्वे शोर्टटर्म ट्रेडींगसाठी वापरले जाते, मात्र इन्ट्राडे ट्रेडींगसाठीही त्याचा उपयोग होवू शकतो. येथे ' स्टॉप ' म्हणजे स्टॉपलॉस असून जेथे स्टॉपलॉस लागतो तेथे उलट पोझिशन घ्यायची (लॉन्ग वा शॉर्ट) असा याचा सोपा अर्थ आहे.
उदा. निफ्टी डे-ट्रेड करताना  आपल्याला वाटले कि बाजार उत्तम असून त्याप्रमाणे वा इतर कोणत्याही टेक्निकल इंडीकेटर्स वा स्ट्रॅटेजीनुसार आपण निफ्टी १ लॉट BUY केला आहे. निफ्टी खरेदी केल्यावर आपण स्टॉपलॉस तर लावलेला असेलच. तो २० पॉइन्ट खाली असेल वा EMA क्रॉसओवर वर आधारीत असेल किंवा  अन्य कशाही प्रकारचा असेल-ते काहीही असले तरी तो स्टॉपलॉस एकदा का हिट झाला कि (आपला खरेदीचा निर्णय चूकीचा होता आणि बाजाराचीच सरशी आहे ,हे मान्य करून) आपणही बाजाराची दिशा स्वीकारायची  आणि खरेदी केलेला लॉट विकून तेथेच आणखी १ लॉट विकायचा . म्हणजे आपला स्टॉपलॉस हिट होताच २ लॉट विकायचे. एका प्रकारे आपण बुलीश पक्षामधून बेअरीश पक्षात उडी मारायची- हेच 'सरशी तिकडे पारशी' हे  धोरण आणि ' स्टॉप ऍन्ड रिवर्स (SAR ) ' ट्रेडींग सिस्टीमचे ढोबळ स्वरूप !
ढोबळ म्हणायचे कारण कि या कल्पनेवर आधारीत एखादी बंदीस्त आणि परिपूर्ण सिस्टीम बनवताना स्टॉपलॉस नेमका कसा ठरवायचा  या महत्वाच्या मुद्द्या व्यतिरिक्त अन्य नियम बारकावे अभ्यासाने ठरवावे लागतात. EMA किती पिरीअडची वापरावी , अन्य इंडीकेटर्स वापरावे का, आणि ब्रोकरेजचा विचार करता कितीवेळा व किती प्रमाणात ट्रेड करावे, निफ्टी च्या बाबतीत जे नियम लागू होतील ते बॅंकनिफ्टीच्या वा स्टॉक्स च्या बाबतीत लागू होतीलच असे नाही, अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून  जगभरचे ट्रेडर्स ही सिस्टीम निरनिराळ्या स्वरूपात राबवतात.
या SAR ट्रेडींगचे काही फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे -
फायदे -
१) ज्यांना स्टॉपलॉस लावायला आवडत नाही त्यांना ही सिस्टीम उपयोगी आहे.
२) बाजार कसाही असो, आपण कायम ट्रेड पोझिशनमध्ये असतो.
३) कायम ट्रेडमध्ये असल्याने अचानक होणा-या बाजाराच्या मोठ्या उसळीचा पूर्ण फायदा मिळू शकतो.
४) पिवोट वा अन्य टेक्निकल लेवल्स बघाव्या लागत नाहीत.-सोपी सिस्टीम.
५) ट्रेन्डींग मार्केट च्या बाबतीत अधिक यशस्वी मात्र रेंजबाऊंड मार्केटमध्येही संधी आहे. 
तोटे -
१) बाजार खूपच नॅरो रेन्जमध्ये राहीला तर उदा. निफ्टी २० पोइण्टमध्येच फिरत राहीला तर सिस्टमचा उपयोग होत नाही.
२) नॅरो रेन्जच्या दिवशी सतत बदलणा-या पोझिशनमुळे वाढत जाणारे ब्रोकरेज.
(वरील तोटे हे अन्य उपायांनी कमी करता येतात)
अधिक स्पष्टीकरणासाठी  येथे आपण (फक्त इन्ट्राडे साठी) एक सोपी म्हणजे कमीतकमी इंडीकेटर्स असणारी सिस्टीम बनवूया.

गूगल फायनान्स वर निफ्टीचा ' इन्ट्राडे ' चार्ट उघडा.





टेक्निकल्स मध्ये 'EMA 50 (2m) सिलेक्ट करा.-याचा अर्थ दर दोन मिनिटांनी घेतल्या जाणा-या गेल्या ५० रिडींगची म्हणजेच एकूण १०० मिनिटांसाठीची ही  EMA असेल. (EMA विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
तांबड्या रंगाची ही EMA - यावरच आपला स्टॉपलॉस  आधारित आहे आणि  त्यानुसार पोझिशन रिवर्स करायची आहे.
मार्केट ओपन झाल्यावर कमीतकमी पाऊण तास (दहा वाजेपर्यंत) पोझिशन घेवू नये)
दिवसाच्या सुरुवातीला निफ्टी हा EMA पासून सुमारे दोन्ही बाजूला ७-८ पोइन्ट (नॅरो रेन्ज) मध्येच फिरत राहीला तर कुठलीच पोझिशन न घेता वाट बघावी.
दहा वाजता जर निफ्टी (spot) हा 50 EMA च्या कमीतकमी ७-८ पॉइन्ट वर असेल व त्याचवेळी EMA हीसुद्धा  चढती दिशा दाखवत असेल तर निफ्टी(वा मिनिनिफ्टी) मद्ये १ लॉट खरेदी (लॉन्ग पोझिशन) करावा. ( निफ्टी हा 50 EMA च्या खाली ७-८ पॉइन्ट असेल व EMA सुद्धा उतरती असेल तर १ लॉट शॉर्ट करावा)
जर फायदा वाढत गेला तर १५ पोइन्ट फायद्यानंतर कधीही आपल्या सोयीने प्रॉफिट बूक करावा. अधिक वेळ न थांबणे श्रेयस्कर.  एकावेळी दोन लॉट खरेदी करून १ लॉट विकून दुस-यासाठी अधिक प्रॉफिटची वाट बघता येइल -मात्र पोझिशन रिवर्स करतानाही दोन ऐवजी ४ लॉट विकावे लागतील-तेव्हा  हे आपण आपल्या कुवतीनुसार ठरवायचे आहे. (सुरुवातीला तरी असे करणे टाळावे- मिनिनिफ्टीचा १ लॉट उत्तम)
खरेदी केल्यावर जर निफ्टीने दिशा बदलली आणि  EMA ला छेदून तो खाली  आला आणि शिवाय  EMA ची दिशाही बदलून ती उतरती झाली तर लगेच पोझिशन रिवर्स करावी म्हणजे दोन लॉट विकावे. म्हणजेच पहिला खरेदी केलेला लॉट स्क्वेअर-अप होवून प्रत्यक्षात एक लॉट शोर्ट पोझिशन राहील.  (सुरुवातीला निफ्टी शॉर्ट केला असेल तर या ऊलट करावे)
एकदा प्रॉफिट मिळाल्यावर डे ट्रेडरने त्यावर समाधान मानून त्या दिवशी Excess Trading टाळावे.
दुपारी १.३० पर्यंत पोझिशन घेण्यायोग्य स्थिती आली नाही तर त्या दिवशी ट्रेड करू नये. दुपारी २.३० नंतर नवी पोझिशन घेवू नये तसेच त्यानंतर अधिक फायद्याच्या अपेक्षेने ट्रेडमध्ये रहाणे टाळावे. 
 २-३ वेळेला पोझिशन रिवर्स होवूनही फायदा झाला नाही-म्हणजेच निफ्टी नॅरो रेन्जमध्ये राहीला तर त्या दिवशीचे ट्रेड थांबवावे.
निफ्टीऐवजी मिनिनिफ्टी ट्रेड केल्याने  ब्रोकरेज नियंत्रणात राहते.( अर्थात फायदा व तोटाही त्याप्रमाणात कमी होतो.)
ही 'SAR सिस्टीम' गेल्या काही दिवसांच्या निरीक्षणावर आधारित आहे, मात्र एक नमुना म्हणूनच याकडे बघा, वाटलेच तर काही बदल, सुधारणा करून पेपर ट्रेडींग करायला हरकत नाहीच.
Don't follow me blindly!  :-)  उलट काही त्रुटी,सुचना शंका असतील तर अवश्य कॉमेन्ट्स द्या. आणि हो FB वर share वा Like करायला विसरू नका !

2 comments:

  • अनामित says:
    १० सप्टेंबर, २०१२

    स्टॉप ऍन्ड रिवर्स (SAR) ट्रेडींग सिस्टीम वरील तुझा लेख नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण आहे. मात्र या विषयाचा साकल्याने विचार व्हावा या उद्देशाने चार ओळी लिहित्तो.

    मुळात शेअर बाजाराचे केले जाणारे तांत्रिक विष्लेषण हे अर्थशास्र्तातले सुप्रसिद्ध ’मागणी-पुरवठा’ हे मुलभूत तत्व व या धटकांचा किंमतीवर होणारा परिणाम यावर आधारित आहे. आणि अर्थशास्त्राने निश्चित केलेली पुर्ण स्पर्धाजन्य परिस्थिती हे या प्रकारच्या विष्लेषणचे एक प्रमुख गॄहितक आहे. बाजारांतील मागणी/पुरवठ्याचे स्त्रोत हे नियमितपणाने अफवा, गैरसमज, भावनांचा उद्रेक अशा अवैध घटकांमुळॆ अल्पावधीसाठी बाधित होतात आणि तांत्रिक विष्लेषणाचा हा मुळ पायाच अनेकदा डळ्मळीत होतो. सहाजिकच अशा वेळी आपण ’इंट्रा-डे ट्रेडिंग’ करताना वापरित असलेली कोणतीही शास्त्रीय वा तांत्रिक पद्धत ही अशा (चुकीच्या) माहितीचा आधार धेउन चुकीचे निष्कर्ष काढ्ते.

    मात्र बाजारांत स्वत: अशा अनर्थांचे हलहल पचवुन अशा बिघडलेल्या यंत्रणा आपोआप स्थिरस्थावर करण्याची अलौकिक क्षमता असते प्रख्यात गुंतवणुक गुरु बेंजमिन ग्रेहम ने म्हटले आहेच की ’In the short run the market is a voting machine. In the long run it's a weighing machine ’ त्यामुळॆ अल्प कालावधीसठी मिळणाया फोल किंवा व्यर्थ ( whipsaw) संकेतांपेक्षा थोड्या अधिक कालावधीवर बेतलेल्या पद्धतीपासुन मिळणारे रिझाल्ट्स अधिक चांगले (अनुकुल नव्हे) असण्याची शक्यता असते त्यामुळे कोणात्याही ट्रेडींग सिस्टीम चे वास्तववादी यशापयश तपासुन बघायचे असल्यास ती अत्यल्प वा अल्प कालावधीसठी न वापरता किमान मध्यम कलावधीसाठी वापरावी असे मी सुचवीन.

    अधिक सोप्या भाषेंत सांगायचे तर ’इंट्रा-डे ट्रेडिंग’ हे टी-20 क्रिकेट सारखे किंवा खरे तर त्यातल्याही सुपर ओव्ह्रर सारखे आहे असे मी मानतो. तंत्रापेक्षाही नशीबाचा भाग जास्त. तेंव्हा नव्या गुंतवणुकदारांना ( मराठी, मध्यमवर्गीय, निवृत्त ई. विषेषणे असतातच) ’इंट्रा-डे ट्रेडिंग’ करिता एखादी ’टेक्नीकल ट्रेडींग सिस्टीम’ सुचवली गेल्याचे वाचले की मी जर्राSSसा हळावा होतो उगाच प्रथम: ग्रासे मक्षिका पात:---- होवुन ’टेक्नीकल्स’ वरचा विश्वास उडायला नको.

    थोडक्यांत, तांत्रिक विष्लेषण ही शेअर बाजारांत यश मिळाविण्याकरिता अत्यंत उपयोगी गोष्ट आहे यात जराही शंका नाही. मात्र त्याचा वापर करुन बनविलेली कोणातीही ट्रेडींग सिस्टीम ती थोड्या अधिक कालावधीवर आधारित असल्यास आणि थोडा अधिक काळ वापरल्यास, (हा मुद्द्दा, ट्रेडींग सिस्टीम ला पुरेशी संधी देण्याचा, फार फार महत्वाचा. ----- मी किमान 08/10 सिग्नल्स मिळेस्तोवर स्विकारलेली पद्ध्ती सोडु नका असे सांगेन) यश मिळ्ण्यची शक्यता खुप वाढ्ते.

    आज मिनी निफ्टी सारख्या सोयी उपलब्ध असतांना ’इंट्रा-डे ट्रेडिंग’ करण्याच्या उद्देशाने बाजारांत उतरावे असे मी सुचविणार नाही पण तरीही कोणास करावयाचे असल्यासच मी (फार पुर्वीच्या) स्वानुभावरुन सांगेन की कोणत्याही शास्त्रीय वा तांत्रिक पद्धतीपेक्षा माझ्या मुंबैकर गुजराथी मित्राने शोधलेली ’कोर्नर सीट थिअरी’ वा पुर्वापार चालत आलेल्या haircut/mosquoto bite थिअया जास्त चांगल्या. आता ह्या थिअया म्हणजे काय असे कोणी विचारेल ----- तर त्याविषयी (तु नाही लिहिलेस तर मग) पुन्हा केंव्हातरी.

  • संदीप says:
    ११ सप्टेंबर, २०१२

    Dear Prasad,अगदी योग्य आणि छान लिहिलेस.त्यानिमित्ताने चर्चा होइल, अधिक वाचक लिहिते होतील. मी वेळोवेळी स्पष्ट करतोय कि जगभरचे ट्रेडर्स काय काय करतात याचा मी just उल्लेख करत आहे. मी कुठल्याही स्ट्र
    ेटेजीची शिफारस करत नाहीये. मी फंडामेन्टल वा टेक्निकलचा अधिकारी मुळीच नाही. मात्र हा ब्लॉग शॉर्टटर्म ट्रेडींगला वाहिलेला असल्याने टेक्निकल्सवर भर राहतो.अगदी सामान्य हौशी ट्रेडर्सना काहीतरी माहितीचे कण सोप्या मराठीतून विनामूल्य मिळत असावेत, त्यानिमित्ताने त्यांचेही काही लॉजिक तयार होत असावे अशी मात्र आशा ठेवून लिहितोय.Thanks for comment. I need such comments from Professionals like you!