Share/Bookmark

२१ जून, २०१०

काही झाले तरी फायदाच !

मजबूत जागतिक पार्श्वभूमीवर आपल्या निफ्टीने आज ५३०० च्या पूढे दिमाखात मजल मारली आहे. या आठवड्याची सुरुवात जोरात झाली आहे. गुंतवणूकदारांना फायदा झालेला दिसत आहे.
अशा प्रकारे तेजीच्या वातावरणातही, या आधीच्या लिखाणात मी नवीन गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला होता, तो मात्र मी आजही कायम ठेवत आहे. असे का ?

Read more »

१९ जून, २०१०

"तांत्रिक विश्लेषण" विषयक माहितीपत्र ...

सर्व वाचकांना माहीतच असेल कि "शेअरबाजार-साधा सोपा" कडून सर्व सदस्य किंवा अनुयायांना पाठविले जाणारे "तांत्रिक विश्लेषण" विषयक माहितीपत्र हे गूगल फ्रेंड कनेक्ट या गूगल सेवेतर्फे पाठविले जाते. या माहितीपत्रामध्ये अर्थातच आलेखाकृतींचा समावेश आहे. काही कारणाने गूगलच्या या सेवेमध्ये इमेज अपलोड सध्या शक्य होत नसल्याने, सदस्यांची गैरसोय टाळण्यासाठी , सदर माहितीपत्र (भाग-३)  फ्रेंड कनेक्ट तर्फे न पाठविता ते यावेळी येथेच प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. सदर अडचण दूर झाल्यावर सर्व सदस्यांना ते पूर्वीप्रमाणेच पाठविले जाईल.

मात्र यामुळे सदस्यता न घेतलेल्यांना येथे त्याचा अनायासेच लाभ होणार आहे, तेव्हा ज्या कुणाला पुढील सर्व भाग हवे असतील त्यांनी या ब्लोगची सदस्यता घेउन दर आठवड्याला मराठीतून प्रसिद्ध होणार्या या माहितीपत्राचा लाभ घ्यावा. ही सेवा अर्थातच पूर्णपणे मोफत आहे.
ज्या सदस्यांना हे माहितीपत्र काही कारणाने मिळाले नसेल त्यांनी येथेच Comment मध्ये आपल्या इमेल पत्त्यासह तसे कळवल्यास त्यांना ते त्वरीत पाठवले जाईल.

   ***************************************************************************

                              तांत्रिक विश्लेषण-भाग ३


                  विविध ट्रेंड्स आणि त्यांची उपयुक्तता-
तांत्रिक विश्लेषणातील सर्वात महत्वाचा गणला जाणारा घटक म्हणजे "ट्रेंड".-म्हणजेच अशी दिशा किंवा साधारण कल ज्यानुसार बाजाराची अथवा एखाद्या शेअरची किंमत बदलत जाते.आता खालील आलेख
किंवा चार्ट पहा.


वरील चार्टमधील चढत जाणारा कल अगदी सहजच लक्षांत येतो, मात्र नेहमीच असा स्पष्ट कल ओळखता येतोच असे नाही.खालील चार्टमध्ये इतके चढ-उतार आहेत कि त्याची नेमकी दिशा ठरवणे कठीण आहे.


आपल्याला हे माहीत असेलच कि एखाद्या शेअरची किंवा निर्देशांकाची किंमत अगदी सरळ रेषेत कधीच वाढत वा कमी होत नाही तर छोट्या छोट्या चढ-उतारांची किंवा TOP & BOTTOMS ची ती एक मालिकाच असते. आणि याच छोट्या चढ-उतारांचा तांत्रिक विश्लेषणामध्ये ट्रेंड ठरवण्यासाठी वापर केला जातो. आता खालील आलेख पहा-हे अपट्रेंड किंवा चढत्या कलाचे उदाहरण आहे.  क्र.२ हा पहिला TOP किंवा HIGH POINT आहे.यानंतर किंमत कमी झाली असून क्र.३ येथे ती पहिला तळ किंवा BOTTOM बनवत आहे. त्यानंतर आलेला क्र.४ चा TOP हा आधीच्या म्हणजेच क्र.२ च्या TOP पेक्षा उच्च पातळीवर आहे आणि नंतर आलेला क्र.५ चा BOTTOM हा त्याआधीच्या म्हणजेच क्र.३ च्या BOTTOM च्या वरच्या पातळीवर आहे. तसेच क्र.६ हा क्र. ४ पेक्षा उच्च पातळीवर आहे.अशा चढत जाणार्या TOPS & BOTTOMS ना Higher Tops/Higher Bottoms असे संबोधले जाते.आणि याप्रकारे सदर चार्टमधील अपट्रेंड निश्चित केला जातो. याउलट एखाद्या वेळी आधीच्या TOP पेक्षा नंतरचा TOP (किंवा आधीच्या BOTTOM पेक्षा नंतरचा BOTTOM ) हा खाली आला तर ट्रेंड रिवर्सलची म्हणजेच डाउनट्रेंड (उतरता कल) सुरू होण्याची शक्यता असते.
आता ट्रेंडचे दोन प्रकार-अपट्रेंड आणि डाउनट्रेंड हे आपल्या चांगले लक्षांत आले असतील.

         या व्यतिरिक्त कधी कधी बाजार आणखी एका प्रकारे हालचाल करतो- ज्यात बाजार रेंगाळलेला असतो- विशेष चढ-उतारच नसतात, त्याला SADEWAYS TREND म्हणतात. तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टीने हा खरे म्हणजे ट्रेंड नसतोच तर दिशाहीनता असते.


     हॆ झाले ट्रेंडच्या दिशेवरून ठरणारे प्रकार. आता ट्रेंडची लांबी म्हणजेच मुदतीवरून तीन प्रकार पडतात-

* SHORT TERM TREND (अल्पावधीसाठीचा कल)- महिना वा त्यापेक्षा कमी काळ चालणारा.

* INTERMEDIATE  TREND (मध्यम अवधी कल -एक ते तीन महिन्याचा काळ चालणारा.


* LONG TERM TREND (दीर्घ अवधी कल)- एक वर्षापेक्षा मोठा काळ चालणारा.

एका लोंगटर्म ट्रेंडच्या दरम्यान काही इंटरमिजिएट ट्रेंड असू शकतात कि जे मूळ ट्रेंडच्या विरुद्ध दिशेचे असतात. म्हणजेच एका दीर्घ अपट्रेंडमध्ये काही छोटे मध्यावधीचे वा अल्पावधीचे डाउनट्रेंड असू शकतात, त्याचप्रमाणे एका दीर्घ डाउनट्रेंड मध्ये काही मध्यावधीचे वा अल्पावधीचे अपट्रेंड असू शकतात. खालील चार्ट पहा-येथे मूळच्या लोन्गटर्म अपट्रेंडमध्ये मध्य वा अल्पावधीचे डाउनट्रेंड सामावलेले दिसतात.
ट्रेंड चा अनालिसिस करताना चार्टची निवड योग्य प्रकारे करावी लागते म्हणजेच दीर्घावधीच्या ट्रेंडचा अभ्यास करण्यासाठी पांच वर्षे कालावधीचा डॆली किंवा वीकली डाटा (रोजच्या अथवा आठवड्याच्या किंमतींची नोंद असलेला) चार्ट वापरतात. मात्र मध्यावधी वा अल्पावधीसाठी फक्त डॆली डाटा चार्ट वापरावा लागतो. ट्रेंड जेवढा मोठया अवधीचा तेवढा तो साहजिकच ठळकपणे जाणवणारा असतो.

ट्रेंडलाईन्स-

ट्रेंडलाईन म्हणजे एखादा ट्रेंड दाखविणारी चार्टमध्ये काढलेली एक काल्पनिक सरळ रेषा.या रेषांचा वापर ट्रेंड आणि त्याचा रिवर्सल म्हणजे ट्रेंड बदलण्याची क्रिया दर्शवण्यासाठीही करतात. खालील चार्टमध्ये एक अपट्रेंड दिसत असून प्रत्येक LOW किंवा खालच्या बाजूच्या बिंदूंस जोडणारी एक सरळ रेषा काढलेली आहे.ही ट्रेंडलाईन, त्या विशिष्ट शेअरच्या किंमतीत होणारी घट जेव्हा जेव्हा थांबते त्या सर्व बिंदूंस जोडणारी आहे.म्हणजेच ही ट्रेंडलाईन सपोर्ट (आधार पातळी) दाखविणारी रेषा आहे. दुसर्या शब्दात सांगायचे तर या ट्रेंडलाईनमुळे किंमत घटण्याची प्रक्रिया थांबून ती परत वाढणे नेमके कधी सुरू होइल हे ठरवणे शक्य होते.

याचप्रकारे डाउनट्रेंड मध्ये अशी सरळ रेषा ही सर्व HIGH POINTS ना जोडणारी काढली जाते आणि ती रेषा, जेथे किंमत वाढणे थांबून कमी व्हायला सुरुवात होते ते सर्व बिंदू जोडणारी असते- म्हणजेच ती असते रेसिस्टन्स लेवल (विरोध पातळी) दाखविणारी रेषा.

CHANNELS ( चाकोरी )-

वरील विवेचनाप्रमाणे जर आधार आणि विरोध अशा दोन पातळी दाखविणार्या दोन समांतर रेषा जर चार्टमध्ये काढल्या तर त्याने बनतो तो चानेल. खालील आकृती पहा-या चार्ट मध्ये उतरता म्हणजेच डाउनट्रेंड चानेल दाखविला आहे. अशा प्रकारे वरील बाजूस उच्चबिंदू व खालील बाजूस नीचबिंदूंना जोडणार्या दोन सरळ रेषांनी बनलेला हा चानेल अपट्रेंड,  डाउनट्रेंड वा साईडवेज असा कुठलाही कल दाखवू शकतो. कल कोणताही असला तरी मूळ गृहीतक असे कि सदर शेअरची किंमत या दोन पातळ्यांमध्येच बरेच वेळा वरखाली होत रहाते. अशी चाकोरीबद्ध प्रक्रिया काही महिनेसुद्धा चालू शकते. जोपर्यंत किंमत खालील वा वरील बाजूची ट्रेंडलाईन तोडून त्याबाहेर जात नाही तोपर्यंत आहे हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता असते. जर एखाद्या वेळी किंमतीने दोन्हीपैकी कोणतीही पातळी तोडली तर त्या दिशेने किंमत आणखी पूढे जाण्याची शक्यता असते.यालाच ब्रेकआउट (वरील बाजूस तोडण्याची क्रिया) व ब्रेकडाऊन (खालील बाजूस तोडण्याची क्रिया) असे म्हणतात. अशा प्रकारे चानेल्स हे कल दाखविण्याबरोबरच आधार व विरोध अशा महत्वाच्या पातळ्या दर्शविण्याचे काम करतात.


वरील विवेचनातून आपण जर ट्रेंड ओळखणे शिकलो तर त्याविरुद्ध जाऊन आपण चूकीची खरेदी वा विक्री करणार नाही. तांत्रिक विश्लेषणामध्ये "TREND IS YOUR FRIEND" असे म्हटले जाते, एवढे "ट्रेंड" या संकल्पनेला महत्व आहे.या मित्राचा हात धरून ठेवा-तो आपल्याला कधी दगा देणार नाही!

पूढील भागात- आधार व विरोध पातळी विषयी विवेचन.

Read more »

१२ जून, २०१०

TECHNICAL ANALYSIS - तांत्रिक विश्लेषणाविषयी माहिती देणारे पत्रक-

सर्व  वाचकांनी नोंद घ्यावी कि तांत्रिक विश्लेषणाविषयी माहिती देणारे पत्रक (भाग -२) आजच या ब्लोगच्या सदस्यांना ( गूगल फ्रेंड कनेक्ट मेंबर्स) पाठविण्यात आले आहे.
अजूनही ज्यांनी सदस्यता घेतली नाही त्यांनी त्वरित सदस्यता घेऊन सदर मराठी भाषेतील माहितीपूर्ण सेवा  मिळवावी- अर्थातच पूर्णपणे मोफत !

नवीन सदस्यांनी विनंती केल्यास यापूर्वीची प्रत इ-मेल द्वारे पाठविण्यात येईल.

ENJOY THE WEEKEND!

Read more »

९ जून, २०१०

या आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे आज जेव्हा जेव्हा बाजारात तीव्र विक्रीमुळे SHARP DEEP आली,तेव्हा खरेदी करणार्यांना फायदा झाला आहे.मात्र असे  डे ट्रेडींग करणे धोक्याचे असून स्टोपलोस लावणे अतिशय जरूरीचे असते, आणि आपल्या पोझिशन त्याच दिवशी स्क्वेअर करणे (बाहेर पडणे) चांगले.
 आजही आपल्या बाजाराने  आशियाई बाजारांच्या तुलनेत सुरुवात चांगली केली होती. आणि दिवसभरात चढ-उतार झाले तरी आपली मुळ तेजीची धारणा सोडली नाही.
दुपारी FTSE मध्ये मध्येच विक्री झाल्याने आपला बाजार बंद होताना  परत खाली आला.त्यांनंतर आता पुन्हा FTSE सुधारलेला दिसत आहे.
  अशा अस्थिर वातावरणात जराही धोका न पत्करण्याच्या प्रवृतीमुळे अचानक विक्री होते आणि बाजार (VOLATILE) होतात-वरखाली झोके घेतात-नक्की दिशा शोधत रहातात.
   आता आपण जरा वेगळ्या अंगाने या सगळ्या प्रकाराकडे पाहून काही निष्कर्ष निघतो का ते बघुया.त्यासाठी खालील दुव्यावर टिचकी द्या.

सदर आलेखात वरील बाजूस असलेले १ वर्षाच्या  (1y) काळाचे सिलेक्शन करा म्हणजे एका वर्षातील निफ्टीचा आलेख बघता येईल.

सदर गेल्या वर्षातील निफ्टीच्या आलेखावरून असे दिसते कि बाजाराने १३ जुलै २००९ रोजी एक तळ वा नीचांक गाठला होता ३९७४ चा. त्यानंतर जेव्हा जेव्हा काही कारणाने बाजारात विक्री झाली आणि PANIC आले तेव्हा बाजाराने जे तळ गाठले ते पुढीलप्रमाणे-
१९ ओगस्ट’०९  --- ४३९४
०३ नोव्हेंबर’०९ --- ४५६३
०५ फेब्रुवारी’१० --- ४७१८
२५ मे ’१०   ------- ४८०६
  आता आपल्याला सहजच अंदाज बांधता येईल कि बाजाराची खरी दिशा कोणती आहे ते!
गेल्या काही दिवसात मी फेब्रुवारी च्या नीचांकाचा आणि UPPER BOTTOMS चा सातत्याने का उल्लेख करतो आहे ते आपणास आता चांगलेच लक्षांत आले असेल.
  तेव्हा चांगल्या वाईट बातम्या येतच असतात त्याचा परिणाम बाजारावर होणारच.आपण परिस्थिती पाहून खरेदी-विक्री केली वा तटस्थ राहिलो तर फायदा कमवणे मुळीच कठीण नाही.
 भारतात मान्सूनची प्रगती चांगली होत असल्याने बाजाराला आणखी प्रोत्साहन मिळेल असे दिसत आहे.
 येथे गेल्या आठवड्यात म्हटल्याप्रमाणे टेलीकोम शेअरमध्ये चांगल्या बातम्या येऊ लागल्या आहेत.लारसन,भेल, बेंका, आणि अजूनही दबा धरून बसलेला रिलायन्स इंड. यावर भरवसा ठेवा.

Read more »

४ जून, २०१०

Breakthrough in OIL-SPILL!... "फेट" वादळाचा धोका टळला...!

एकदा चांगल्या बातम्या येऊ लागल्या कि येतच रहातात-जसे कि युरोपियन अमेरीकन बाजार सावरले-आपल्या बाजाराने काल चांगली वाढ दाखवली-आणि  मेक्सिकन आखातातील तेलगळतीवर गेले काही दिवस चालू असलेल्या अनेक प्रयत्नांना कालच यश मिळून, गळती होणारा समुद्रातील पाईप कापण्यात यश आले असून आता तेथे एक अन्य पाईप जोडून गळती होउन सर्वत्र पसरणारे CRUDE OIL आता जहाजामध्ये साठवण्याच्या योजनेतील एक मोठे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.आसपासच्या प्रदेशाला  प्रदूषणापासून वाचवून नैसर्गिक संपत्तीचा अधिक विनाश टाळणे त्यामुळे शक्य होणार आहे.
गुजरातला व पर्यायाने जामनगरसारख्या मोठ्या प्रकल्पाला असलेला वादळाचा धोका आता टळला असून बरेच नुकसान टळले आहे.
  काल DOW JONES मध्ये विक्री झाली पण बंद होताना तो पुन्हा हिरवा झाला आहे.आशियाई बाजार मिश्र रंगात सुरू झाले आहेत. आज शुक्रवार असल्याने आणि थोडे PROFIT BOOKING होणारच असल्याने आपलाही बाजार आज FLAT रहाण्याचीच शक्यता आहे.
  आपल्या अंदाजाप्रमाणे टाटा स्टीलमध्ये काल विक्री दिसली आणि टेलीकोम व वाहन क्षेत्रात तेजी दिसून आली.त्याचबरोबर बेंका व रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये वाढ झालेली असून एकंदर पूढील आठवड्याच्या दृष्टीने चांगली पार्श्वभूमी तयार होत आहे.
तेजीमध्ये रिलायन्स,इन्फोसिस,टाटा मोटर्स,बेंका, ऒएनजीसी,लारसन अशा सर्वच दिग्गजांनी भाग घेतल्याने सदर कंपन्या तसेच संबधित क्षेत्रांतील अन्य चांगल्या कंपन्या जसे कि हिन्दाल्को,येस बेंक, AXIS BANK,भेल इ. यात चांगली वाढ दिसावी. 
WISH YOU ALL A  HAPPY WEEKEND!

Read more »