Share/Bookmark

निफ्टी पी/ई


एखादा शेअर स्वस्त आहे कि महाग हे ठरवण्याची जी साधने आहेत त्यात प्रमुख गणले जाणारे एक साधन आहे प्राईस/अर्निंग रेशो.म्हणजेच त्या शेअरची बाजारातील किंमत आणि त्याची प्रति-शेअर कमाई याचे गुणोत्तर- ही माहिती तर आपल्याला असेलच.

यावरून साधारण अंदाज बांधता आला तरी यात शंकेला जागा राहते ती ही कि एखादा शेअर दुप्पट-चौपट असा वाढताना आपल्याला दिसतो तसा त्याचा पी/ई रेशोही साहजिकच वाढतो (आणि बाजारातल्या प्रमुख कंपन्यांचा तो नेहमीच जास्त असतो) मग अशा वाढलेल्या किंमतीत खरेदी करायची कि नाही? याउलट - खुप कमी पी/ई रेशो असेल तर त्याचा अर्थ बाजारात त्या शेअरला मागणी नाही असाही होतो.तेव्हा त्या कंपनीच्या फायदा मिळविण्याच्या क्षमतेबरोबरच बाजारातील किंमतीत होणार्या चढ-उतारांचाही या रेशोवर परिणाम होत असतोच.शोर्ट टर्म ट्रेडर्सना याचे काही देणेघेणे नसते उलट या चढ-उतारांवरच ते कमवत असतात.मात्र मिडीयम व लोंगटर्म गुंतवणूकदारांनी खरेदीची योग्य वेळ कशी ठरवायची?


आतापर्यंतच्या इतिहासावरून असे आढळले आहे कि "निफ्टी पी/ई" हा २० ते २५ या ’रेंज’ मध्ये पोचला कि बाजार जोरात कोसळलेला आहे आणि तो जेव्हा जेव्हा १० ते १३ या पातळीपर्यंत खाली आला त्यानंतर बाजाराने उसळी मारलेली आहे.


गेल्या मार्चपासून आलेल्या तेजीपूर्वी आपण मोठी खरेदी केली आहात का? फार थोड्या जणांनी त्याआधी खरेदी केली असेल,पण ज्यांना ज्यांना ही माहिती असेल आणि CNBC वरील तथाकथित एक्सपर्टच्या मतांविरुद्ध जायचे ज्यांनी धाडस दाखविले असेल त्यांनी त्यावेळी खरेदी करून सुवर्णसंधी नक्की साधली असेल.आता खालील आलेखाकृतीवर नजर टाका.यामध्ये जानेवारी १९९९ ते मे २००९ म्हणजे सुमारे दहा वर्षांचा काळ दाखविला आहे.




वरील आलेखावरून हे लक्षांत येते कि ११ ते १३ यामध्ये निफ्टी पी/ई (निळ्या रंगाने दाखविलेला)आला कि खरेदीची (लोंगटर्म)तयारी करायला हवी एवढे नक्की.त्यानंतरही बाजार म्हणजेच निर्देशांक(हिरव्या रंगात) काही काळ खाली जाईल आणि सगळे एक्सपर्ट आणखी खालची TARGETS देतील तरीही थोड्याच अवधीत बाजार नव्या तेजीला आरंभ करेल.मात्र खरेदी किती करायची हे ज्याच्या त्याच्या धोका झेलण्याच्या क्षमतेवर ठरेल हे मात्र आपण ध्यानात ठेवायला हवे.


याच्या उलट जेव्हा निफ्टी पी/ई २० च्या वर जातो तेव्हा बाजारात तेजीचा फुगवटा येण्यास सुरूवात होते तेव्हा या पातळीवर हळूहळू पैसा काढून घ्यायला हरकत नसावी.त्याहीपूढे जर २५ पर्यंत पी/ई वाढला (जानेवारी २००८ मध्ये तो चक्क २८ झाला होता यावरून कल्पना येते कि त्यावेळी खरेदी करणे ही किती मोठी घोडचूक होती ते!- बेटर लक नेक्स्ट टाईम!) तर आपला पूर्ण पैसा शेअरबाजारातून अन्य सुरक्षीत ठिकाणी गुंतवणे (व बाजार पडल्यावर पुन्हा- -कळले ना?) श्रेयस्कर!


आता निफ्टी पी/ई कुठे पहायचा हा प्रश्न मला तुम्ही विचारणारच असाल -मग आता खालील लिंकवर जा आणि सध्या निफ्टी पी/ई किती चालला आहे ते पहा बरं-
http://www.nseindia.com/products/content/equities/indices/historical_pepb.htm