Share/Bookmark

२८ ऑग, २०१०

Reliance Industries Ltd. - रिलायन्सचे काय होणार?गेले काही महिने १००० ते ११०० (म्हणजेच बोनसपूर्वीचे २००० ते २२०० ) या रेंजमध्ये फिरणारा रिलायन्स इंड. चा शेअर जुलाई’१० च्या सुरुवातीपासून सतत खाली येत आहे.या आठवड्यात तर त्याने ९५० ची पातळीही तोडलेली दिसत आहे.यामुळे साहजिकच अनेक शेअरहोल्डर चिंतेत आहेत. रिलायन्समध्ये घडते आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी प्रथम आपण थोडासा घटनाक्रम पाहूया.-

* ९ जून ’१० ची बातमी - रिलायन्सने ५.५ बिलिअन रुपये उभारले. ही रक्कम कशासाठी वापरली जाणार याचा खुलासा झाला नाही.
*९ जून ’१० -रिलायन्स टेलीकोम सेक्टरमध्ये प्रवेश करणार अशी बातमी. स्पेक्ट्रमच्या लिलावातील "विनर" कंपनीचे अधिग्रहण करण्याचा विचार. 
*१० जून ची बातमी- पायोनीअर नेचरल रिसोर्सेस या अमेरिकन कं. ची युनिट्स खरेदी करण्याची रिलायन्सची योजना.
* ११ जून -रिलायन्सची इन्फोटेल ब्रोडबेंड कं. खरेदी करण्याची योजना.
*१४ जून - रिलायन्स येत्या दोन वर्षात ब्रोडबेंड सेवाक्षेत्रात १ बिलिअन डोलर गुंतविणार.
* १४ जून - रिलायन्स गुजरातमधील आपल्या पेट्रोकेमीकल उद्योगाच्या विस्तारावर ३ बिलिअन  डोलर्स खर्च करणार.

या काही ठळक योजना आहेत ज्यामध्ये रिलायन्स रस घेत आहे. या योजनांना अंतिम स्वरूप देणे हे फार मोठे आव्हान असून जर रिलायन्सची स्थिती कमकुवत असती तर त्यांनी हे आव्हान स्वीकारले नसते असे मला वाटते. रिलायन्सच्या एकूण शेअरकेपिटल पैकी ४४% हिस्सा हा प्रमोटर्स कडे, पर्यायाने मालकांकडे असून शेअरच्या भावामध्ये झालेली घसरण त्यांनी नक्कीच नजरेआड केलेली नसणार, आणि भविष्यात ती किंमत वर कशी आणायची या विषयात तर रिलायन्स ग्रूप कुशल समजला जातो. 


दि.२३ ओगस्ट रोजीच्या शेअरखानच्या रिपोर्टनुसार पुढील तीन क्वार्टर्स पर्यंत रिलायन्सच्या केजी बेसीन मधील उत्पादन स्थिर रहाणार असून त्यामुळे २०११ पर्यंत तरी रिलायन्सच्या अर्निंगमध्ये भरघोस वाढीची शक्यता नाही, आणि त्याचेच चित्र बाजारातील शेअरच्या किंमतीमध्ये सध्या दिसत आहे.


मात्र शेअरखानने हे ही नमूद केले आहे कि अमेरिकन मार्केटमधील रिलायन्सचा प्रवेश ही भविष्यातील मोठी झेप ठरणार असून दीर्घ कालावधीसाठी त्यांनी रिलायन्सचा शेअर accumulate करणे सुचवले आहे. शेअरखानच्या रिपोर्टनुसार रिलायन्सची अलिकडील व भविष्यातील (संभाव्य) कामगिरी  खालीलप्रमाणे आहे- आणि ती नक्कीच आश्वासक आहे.आणि आपण त्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास हरकत नाही असे दिसते.

आता रिलायन्सचा शेअर accumulate करण्याआधी आपण रिलायन्सच्या एका वर्षाच्या चार्टवर नजर टाकू या.
 
एका वर्षाच्या चार्टनुसार तांत्रिकदृष्ट्या रिलायन्सने सर्व महत्वाचे सपोर्ट तोडले असून नोव्हेंबरच्या सुरुवातीस असणारी ९१० ही पातळी आता खूप महत्वाची ठरणार आहे. त्यापातळीपर्यंत तो पडेल किंवा नाही हे नक्की नसले तरी ती एक शक्यता आहेच, म्हणून ती पातळी गाठेपर्यंत आपली गुंतवणूक खालचे बजूस अधिक असेल अशा प्रकारे विभाजित करून टप्प्याटप्प्याने आपली खरेदी करणे योग्य ठरेल असे मला वाटते,

Read more »

१६ ऑग, २०१०

कन्सोलिडेशन कि करेक्शन?

सोमवार दि. १६ ओगस्ट -
आज सकाळपासून ५४५० च्या आसपास ठराविक चाकोरीत फिरणारा बाजार दुपारी सुमारे एकनंतर अचानक खाली येणे सुरू झाले- साधारण त्याच वेळेपर्यंत सकाळपासून जोरात असलेला  रिलायन्स इंडस्ट्रीज ९९० ची विरोध पातळी तोडण्यात असफल झाला होता. ( काल याचा अंदाज येथे व्यक्त केला होता) अखेर त्यात विक्री झाली आणि बाजारातील  किरकोळ  वाढही अखेर दिसेनाशी झाली. गेल्या काही दिवसातील घटीनंतर रिलायन्स आता ९७० ते ९९० मध्ये कन्सोलिडेट होईल असा एक अर्थ यातून निघतो. 
निफ्टीने ५४४० ची लेवल तोडल्यावर लंडन बाजारातही विक्री झाली आणि मग निफ्टी थेट ५४०० या सपोर्ट लेवलवर येवून मगच सावरला. मी हे लिहीत असताना लंडन बाजार घट दाखवत असला तरी FTSE  निर्देशांक ५२२० च्या खाली येत नाही तोपर्यंत चिंतेचे कारण वाटत नाही.
आपल्या बाजारासाठी अर्थातच ५४०० व ५३८० या आधार पातळी महत्वाच्या आहेत, तर आता ५४४० व ५४७० येथे विरोध राहील.
सध्या आपल्या बाजाराला वाढण्यासाठी विशेष "ट्रिगर" नाही, तसेच मोठ्या करेक्शनचीही शक्यता वाटत नाही. अशा परिस्थितीत विदेशी बाजार परिणामकारक ठरू शकतात.
आज अचानक  झालेल्या विक्रीची कल्पना आधी येणे कठीण होते. अशा प्रकारे बाजार आपल्याला कधी ना कधी फसवतच असतो. मात्र हीच वेळ असते शांत रहाण्याची ,आणि ज्यांनी विशेष  खरेदी वा विक्री केलेली असेल त्यांनी STOPLOSS लावण्याची !  या क्षेत्रातील दिग्गजांचे एक वाक्य मला खूप भावते -

 "STOPLOSS  IS  THE  SPICE  OF  THE  TRADE ! "  

Read more »

१४ ऑग, २०१०

सदस्यांसाठी न्युजलेटर, आणि वाचकांच्या प्रतिक्रियांबद्दल ...

या ब्लोगचे सर्व नवीन वाचक व सदस्य यांच्या माहितीसाठी येथे पुन्हा नमूद करत आहे कि सर्व सदस्यांना "तांत्रिक विश्लेषण" विषयक माहिती देणारे पत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात येते. ज्या सदस्यांना सदस्यता घेण्यापूर्वीची, म्हणजेच प्रथमपासूनची माहितीपत्रके हवी असतील त्यांनी आपल्या ईमेल पत्त्यासह प्रतिक्रिया /COMMENT दिल्यास त्यांना त्वरीत पाठविली जातील.
  गेले काही दिवस वाचकांना काही तांत्रिक अडचणीमुळे या ब्लोगवर आपल्या प्रतिक्रिया देता येत नव्हत्या.  यावर उपाय शोधून प्रतिक्रिया सहजपणे देता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही काही प्रश्न असल्यास  sandipyanbu@yahoo.in या पत्त्यावर वाचक संपर्क साधू शकतात.
आपल्या सर्वांना साप्ताहिक सुट्टी व स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Read more »

२ ऑग, २०१०

Read more »