Share/Bookmark

मराठी माणसाने काबाड कष्ट करूनच पैसा कमवावा का?


मराठी माणसाने शेअरबाजारात कधी पडूच नये का? त्याने कायम काबाड कष्ट करूनच पैसा कमवावा का? की याला काही अन्य पर्याय आहे? हे आणि असे बरेच प्रश्न मला पडले आणि मी त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि सामान्य मराठी माणसाला शेअरबाजारातील धोके सांगण्याबरोबरच त्याच्या मनातील अनावश्यक भीती काढुन त्या जागी आत्मविश्वास जागविण्यासाठी मी हा blog लिहीत आहे.माझ्या मते मराठीतील या विषयाला वाहिलेला हा पहिलाच blog आहे.या माझ्या लिखाणात शेअरबाजाराची तोंडओळख नसून अगोदरच प्राथमिक माहिती व थोडीफार गुंतवणुक असलेल्या पण विशेष फायदा न मिळवलेल्या वा बाजारात नुकसान झालेल्या मराठी मित्रांसाठी चार युक्तीच्या गोष्टी ,काही सोपे आडाखे तसेच किचकट व गुंतागुंतीचे विश्लेषण टाळून सोप्या भाषेतील व सर्वसामान्यांना कळेल अशी माहिती असेल.मी दिलेली माहिती आंधळेपणाने न स्वीकारता वाचकांनी त्यांना योग्य वाटेल त्या ठिकाणी अवश्य पडताळून पहावी ही नम्र विनंती,