Share/Bookmark

शेअरबाजारात हास्यलकेरी...


इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे शेअरबाजारातही विनोदाने शिरकाव केलेला आहे आणि येथे (मंदीमध्येही)स्मितहास्य फुलवून ताण कमी करण्याचे काम तो चोख बजावत आहे-
  येथे ऐकू आलेले काही विनोद-एका पाहूण्याला मुंबई दाखवताना शेअरबाजारात कारकून असणार्या त्याच्या मित्राने BSE ची भव्य इमारत दाखविली आणि तीच्या वरच्या मजल्यावरून दिसणारे गेट वे चे दृश्यही दाखविले.तेथून दिसणार्या समुद्रातील बोटी दा्खवून तो अभिमानाने म्हणाला- आणि त्या पहा येथल्या ब्रोकर आणि एनालिस्ट लोकांच्या मालकीच्या बोटी....-आणि मग गुंतवणूकदारांच्या बोटी कुठल्या?-पाहूण्याने Bomb टाकला. 
 काय दोस्त, बाजारात म्हणे तुला खूप तोटा झालाय असे ऐकले? कोण बैल होतास कि अस्वल? 
 - नाही रे,कसला बैल आणि कसले अस्वल- मी तर एक अस्सल गाढव होतो रे!


देवाने या STOCK ANALYST ना जन्मालाच का घातले असावे?                  
     -हवामानखात्याच्या लोकांना जगात सन्मान मिळावा म्हणून!
शेअरबाजारात एक कोटी रुपये मिळवण्यासाठी सुरुवातीला किती रक्कम गुंतवावी लागेल? - अंदाजे दोन कोटी ! 


ब्रोकरच्या ओफिसमधला जळलेला लाईट बल्ब बदलायला किती माणसे लागतात?  -दोन माणसे- एक तो बल्ब काढून जमिनीवर टाकून द्यायला -आणि दुसरा तो बल्ब(जळलेला आहे हे माहित असूनही)आपटून फुटण्याआधी विकून टाकायला....


आज खूप थंडी पडली आहे वाटते-  
-कशावरून?
ते बघ-त्या Stock Broker ने स्वत:च्याच खिशात हात घातलेत!


एका ब्रोकरकडे त्याचा नवीन शेजारी ओळख करून घ्यायला आला होता. चहापाणी झाल्यावर शेजार्याने विचारले-मग आपला व्यवसाय काय आहे?
तेवढ्यात तेथे आलेल्या ब्रोकरच्या मुलाने नाक खुपसले-माझे बाबा ना मासेमारी करतात!
त्यावर त्याची आई खेकसली-काहीतरी काय म्हणतोस? तुझे बाबा Stock Broker आहेत-कळलं?
-मुळीच नाही, मुलगा उत्तरला-मी जेव्हा जेव्हा बाबांच्या ओफिसमध्ये जातो तेव्हा फोन ठेवल्यावर बाबा म्हणतात-आणखी एक मासा गळाला लागला!  


एक ब्रोकर आणि एक एनालिस्ट एकदा रेसकोर्सवर गेले.ब्रोकरने सुचविले कि त्या ९ नंबरच्या घोड्यावर दहाहजार रुपये लावूयात-
-पण मला त्याचे सर्व रेकोर्ड तपासावे लागेल आधी! एनालिस्ट चश्मा पुसत उत्तरला.
तु म्हणजे- नको तेवढा थिअरटिकल आहेस-ते काही नाही -मी ९ नंबरवरच पैसा लावणार!
एनालिस्टने पैसा लावलाच नाही.अखेर रेस सुरू झाली आणि नेमका ९ नंबरचाच घोडा जिंकला!
थक्क झालेल्या एनालिस्टने न राहवून विचारले-तु कसे ओळखलेस कोणता घोडा जिंकणार ते?
-त्यात काय?सोप्पे आहे-ब्रोकर उत्तरला-मी माझ्या दोन्ही मुलांच्या वयाची बेरीज केली-५ अधिक ३,आणि बेशक त्या घोड्यावर पैसा लावला!
पण ५ अधिक ३ तर ८ होतात रे गाढवा-चिडून एनालिस्ट म्हणाला. 
अरे तेच तर चुकतय तुझं-तु नको तेवढा थिअरीटिकल आहेस-मी आताच माझं म्हणणं प्रेक्टिकली सिद्ध केलय ना!


आज मार्केटमध्ये भलतेच चढ उतार होते-साफ बुडालेल्या एका ब्रोकरने दहाव्या मजल्यावरून उडी मारली-आणि सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून त्याला स्क्रीन दिसला म्हणे आणि त्याने चक्क U टर्न घेतला म्हणे तिथूनच! 


शेअरबाजार ही अशी जागा आहे कि एकजण शेअर घेतो त्याच किमतीला दुसरा विकतो-आणि त्या दोघाही गाढवांना वाटत असतं कि आपणच स्मार्ट आहोत म्हणून! 


लोटरी खरेदी करणे आणि शेअर खरेदी करणे यात नेमका काय फरक आहे बरं?
 - लोटरीच्या पैशातून एखादा सार्वजनिक तलाव बांधून होऊ शकतो, आणि -
        -  - शेअरमधील पैशातून ब्रोकरच्या घरातला स्विमींग पूल!


फसलेल्या डे ट्रेडिंग मुळे एका शोर्टटर्म इन्वेस्टर चा जन्म होतो आणि कालांतराने त्याचे लोन्गटर्म इन्वेस्टर मध्ये रुपांतर होते.


एका माणसाने त्याच्या ब्रोकरला फोन लावला आणि सगळे शेअर ताबडतोब विकून टाकायला सांगितले.
-का काय वाईट बातमी आली आहे का? बाजार कोसळणार म्हणून? ब्रोकरने चमकून विचारले.
-नाही नाही, त्याचे काय आहे कि - माझ्या बायकोच्या माहेरी तीन पिढ्यांपूर्वी शेअरबाजारात प्रचंड नुकसान झाले म्हणून ते आजतागायत शेअरबाजारात पैसा न टाकता  गालिच्याखाली ठेवतात.
    -बरे मग? ब्रोकरला अजूनही काही समजेना.
मग काय? आमच्या घरीही तसेच चालू होते इतके दिवस...पण बायकोने ओर्डर दिलेल्या नव्या गालिच्याची डिलीवरी दोन दिवसात होणार आहे ना!