Share/Bookmark

२५ सप्टें, २०१२

फ्री टीप्स विषयी...

या ब्लॉगवर फ्री टीप्सविषयी नुकताच मी एक छोटा सर्व्हे केला. त्याद्वारे माझ्या वाचकांना काय वाटते, याबरोबरच ते कशाप्रकारे ट्रेड करू इच्छितात हे ही जाणून घेण्याचा माझा प्रयत्न होता. सर्वच वाचकांनी आपले मत नोंदवले असेल असे नाही, तरीही ब-याच जणांनी आपले मत मांडून उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
या सर्व्हेच्या निकालानुसार ७३% लोकांना टीप्स हव्या आहेत तर ६% लोकांनी स्पष्टपणे 'नको' असल्याचे सांगितलेय. या ६% पैकी अनेकजण स्वतःच अभ्यास करून आपले ट्रेडींग करत असतील तर ती खरंच चांगली बाब असून मी त्यांना सुयश चिंततो. मात्र अनेक लोकांना टीप्सची मदत भासते असेही दिसते. वरील दोन्ही आकड्यांमधील फरक मोठा असल्याने सर्वसाधारण मत 'टीप्स हव्यात' असे दिसत आहे. 
याशिवाय इन्ट्राडे टीप्स हव्यात असे  ४२% , डिलीव्हरी टीप्स ३३%  व फ्युचर्स/ऑप्शन्स टीप्स हव्यात असे ३६%  लोकांना वाटते. या तीनही टक्केवारीत मात्र फार फरक दिसत नाही. पण त्यातही 'इन्ट्राडे टीप्स' ला थोडी अधिक मागणी आहे असे म्हणावे लागेल.
वरील बाबींचा विचार करून या  ब्लॉगवर 'टीप्स' सुरू करण्याचा माझा विचार असला तरी त्यांचे स्वरूप नक्की करून मगच  त्याबाबत कळवेन. दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार !

Read more »

२१ सप्टें, २०१२

७० वर्षांपूर्वीचे बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज......

 ब्रोकर्स इन ऍक्शन....
काय इनसाईडर न्युज असेल बरं ?

त्याकाळचे ब्रोकर असे दिसत....!
बद्दो सारो नफोssssssssss
यांच्यावर मात्र ज्योतीषशास्त्राचा आधार घेण्याची वेळ आलेली दिसते....! 
कशी वाटली गतकाळची सफर ? 
......
.....
 आणि आता जमाना किती बदलला पहा....!!
 

...आवडलं असेल तर जरूर शेअर/लाईक  करा !!

Read more »

१८ सप्टें, २०१२

ट्रेडींगपूर्वी रिस्क मॅनेजमेन्ट कसे करावे ?


माझ्या एका CA मित्राने त्याच्या व्यवसायातील एक किस्सा नुकताच मला सांगितला. माझ्या मित्राच्या ऑफिसमध्ये एक उच्चशिक्षीत अधिकारी गृहस्थ कामानिमित्ताने आले होते. त्यांच्याशी बोलताना मध्येच जरूरी वाटले म्हणून माझ्या मित्राने त्याच्या असिस्टंटला फोनवरून काही शॉर्ट पोझिशन्स पटकन कव्हर करण्यास सांगितले- “ अमुक शेअर्स घेवून टाक पटकन...” असे काहीसे ते वाक्य होते. त्यानंतर त्या गृहस्थांचे बोलणे झाले व ते निघून गेले. मात्र काही दिवसांनी ते परत आले ते तक्रार घेवूनच- कि तुम्ही सुचविलेल्या शेअर्समध्ये मी मोठी रक्कम गुंतवली पण त्यात फार मोठा तोटा झाला म्ह्णून....!! 
आता बोला. एका उच्चशिक्षीत अधिकारपदावर असलेल्याची ही कथा, तर....? फक्त फोनवरचे बोलणे ऐकून, काही पार्श्वभूमी न जाणून घेता, न विचारता परस्पर गुंतवणूकीचा निर्णय त्या गृहस्थांनी घेतला होता आणि वर तक्रारीचा सूर ? हा किस्सा ऐकला त्याच क्षणी मी आजची ही ब्लॉगपोस्ट लिहिण्याचा निर्णय घेतला !
गेल्या काही पोस्ट्स मधून मी इन्ट्राडे ट्रेडींगविषयी लिहितोय खरा, पण इन्ट्राडेच करा अथवा तशा अर्थाचा कुठलाही आग्रह मी केलेला नाही. याउलट आधी पेपर ट्रेडींग करा, छोट्या रकमेचे सौदे करा आणि स्टॉपलॉसचा वापर आवर्जून करा असे मी पुन्हा पुन्हा सांगत असतो हे माझ्या नियमीत वाचकांना माहीत असेलच. जगभरातले ट्रेडर्स काय करतात, कशा पद्धतीने विचार करतात याचा परामर्श घेत टेक्निकल्स, निफ्टी फ्युचर्स, इन्ट्राडे ट्रेडींग,शॉर्टटर्म ट्रेडींग, हेजींग, ऑप्शन्स असे पायरीपायरीने शिकत (जसा मी शिकलो व अजूनही शिकतोय) वाचकांसोबत मी पुढे जाणार आहे. यानिमित्ताने वाचकही विचारप्रवृत्त होतील, त्यांची एक स्वतःची अशी स्ट्रॅटेजी बनेल, शेअरबाजार हा पोरखेळ नसला तरी तो मृत्युगोलही नाही हे त्यांना पटेल, तो एक पद्धतशीरपणे करण्याचा (उप)व्यवसाय आहे या मतापर्यंत ते येतील असे मला वाटते. मात्र वरील किस्सा ऐकल्यावर आधी ट्रेडींगमधील “मनी मॅनेजमेन्ट” आणि “रिस्क रिवॉर्ड रेशो” अशा  विषयांना स्पर्श करून मगच पुढे जायचे असे ठरवले आहे.
ट्रेडींगच्या संदर्भात मनी मॅनेजमेन्ट म्हणजे मुख्यत्वे रिस्क मॅनेजमेन्ट होय. प्रत्येक ट्रेडमध्ये किती फायदा होवू शकेल यापेक्षा किती नुकसान होवू शकेल याचा अंदाज घेणे आणि आपल्या भांडवलाच्या तुलनेत त्याला कसे मर्यादित ठेवायचे हे प्रत्येक ट्रेडरने ठरवणे आवश्यक आहे.
एकाच ट्रेडमध्ये मोठे नुकसान करून घेवून बाजाराला रामराम ठोकणा-या ट्रेडरपेक्षा अनेक ट्रेडमध्ये किंचित नुकसान घेणारा ट्रेडर बाजारात अधिक काळ टिकून राहू शकतो. मोठ्या फायद्याची संधी त्यालाच मिळत असते. साधारणपणे डे-ट्रेडच्या बाबतीत जास्तीत जास्त १% ते २% नुकसान ही मर्यादा पाळण्याची पद्धत आहे. एक उदाहरण बघुया.
समजा माझ्याकडे एक लाख एवढे भांडवल आहे. समजा एका १०० रु. किंमतीच्या शेअरमध्ये मी ट्रेड करण्याचे
ठरवले. उपलब्ध भांडवलात मी एकूण १००० शेअर्सचे ट्रेडींग किंवा प्रत्येकी १०० शेअर्सचा एक ट्रेड याप्रमाणे मी १० ट्रेड करू शकतो. ( येथे मार्जिनवर ट्रेडींगचा विचार त्यातील धोक्यामुळे मुद्दामच केलेला नाही )
१% नुकसानाच्या नियमाप्रमाणे मी प्रत्येक ट्रेडसाठी ९९ रु.चा स्टॉपलॉस लावला. तर काय होइल ? हा छोटासा स्टॉपलॉस बरेचदा हिट  होइल आणि माझे जवळ जवळ सगळेच ट्रेड नुकसान दाखवतील. मग मी काय करायला हवे ?
मग मी १% ऐवजी २%चा म्हणजेच (९८ रु.ला) स्टॉपलॉस लावण्याचे ठरवले, पण माझी एकूण नुकसान झेलण्याची क्षमता १% एवढीच ठेवून हे कसे साध्य केले ? यावेळी हिशेब थोडा वेगळ्या पद्धतीने केला.-  
माझ्या १ लाख भांडवलाच्या १% नुकसान क्षमता म्हणजे १००० रु. जास्तीतजास्त नुकसान होय. म्हणून प्रत्येक शेअरमागील २ रु. नुकसानाची मर्यादा लक्षांत घेऊन मी किती शेअर्सचे ट्रेड करु शकतो ते ठरवण्यासाठी १०००/२ = ५०० असा हिशेब केला. म्हणजे माझ्याजवळ १लाख रु. भांडवल असताना आणि २% स्टॉपलॉससह मी जास्तीत जास्त ५०० शेअर्स चे ट्रेड करावे, त्यापेक्षा जास्त नाही. अशा पद्धतीने विचार केल्यास माझे नुकसान मर्यादित राखूनही स्टॉपलॉस हिट होण्याचे प्रमाणही लक्षणीयरित्या कमी होइल. परिणामी मी बाजारात अधिक काळ टिकून राहू शकेन. या उदाहरणात ब्रोकरेजचा विचार केलेला नाही. प्रत्यक्ष ट्रेड करताना ब्रोकरेज विचारात घेवूनच स्टॉपलॉसचे पर्सेन्टेज ठरवावे. वरील उदाहरणात समजा प्रतिट्रेड फिक्स २५ रु.एवढे ब्रोकरेज असेल तर १०० शेअर्सच्या एका ट्रेडसाठी स्टॉपलॉस हा ९८.२५ येथे लावावा लागेल. ब्रोकरनुसार जे पर्सेन्टेज असेल त्याचा विचार करून प्रतिशेअर ब्रोकरेज काढावे.
 हे उदाहरण डे-ट्रेडींगच्या संदर्भातले आहे. शोर्टटर्म ट्रेडींगसाठी स्टॉपलॉस हा साहजिकच थोडा मोठा असणार आहे आणि फायद्याचे प्रमाणही अधिक असणार आहे. शिवाय शोर्टटर्म ट्रेडींगसाठीचा स्टॉपलॉस हा नेहमीच पर्सेन्टेजमध्ये ठरवला जात नाही तर अन्य निरनिराळ्या पद्धतीने कसा लावला जातो हे बघण्यासाठी येथे क्लिक करा.
 फायद्याचे प्रमाण आणि स्टॉपलॉसचा आकार यांचा एकमेकाशी संबंध असतो. त्यालाच “रिस्क रिवॉर्ड रेशो” असे म्हणतात.
वरील उदाहरणात आपण १% किंवा २% असा स्टॉपलॉस लावलेला बघितला. त्याप्रमाणे प्रत्येकी १०० शेअर्सचे ५ ट्रेड केले असता त्यातील किती ट्रेड फायद्यात जातील आणि तो फायदा किती असला तर स्टॉपलॉस हिट झालेल्या ट्रेडमधील तोटा भरून निघून अखेरीला काही फायदा शिल्लक राहील? या बाबींचा अभ्यास म्हणजेच “रिस्क रिवॉर्ड रेशो” होय. त्याविषयी पुढील पोस्टमध्ये !

Read more »

९ सप्टें, २०१२

स्टॉपलॉस लावणे आवडत नाही ? स्टॉप ऍन्ड रिवर्स (SAR) ट्रेडींग -


मित्रांनो,
मराठीमध्ये एक म्हण आहे- ' सरशी तिकडे पारशी ! '
समाजात अशा प्रवृत्तीला  नैतिक समजले जात नाही. ही एक प्रकारची लबाडी मानली जाते.  राजकारणातही सतत पक्ष बदलणारा नेता -' आयाराम गयाराम ' -हा टीकेचे लक्ष्य होत असतो.
सामान्यतः आपण मराठी लोक अशा प्रकारच्या बदलत्या भूमिकेला पसंत करत नाही. मात्र -
शेअरबाजारात अशा प्रकारच्या मनोवृत्तीचीच गरज असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बाजार हा सतत आपला मूड बदलत असतो आणि त्याच्यावर आपले काहीही नियंत्रण नाही , हे एकदा उमजले कि  बाजाराप्रमाणे आपलीही दिशा बदलत रहाणे हा ट्रेडर्ससाठी आवश्यक  असा ' गुण ' कसा ठरतो हे लक्षांत येईल.
      पण थांबा -बाजारावर आपले नियंत्रण नाही हे जरी खरे असले तरी आपल्या संभाव्य तोट्यावर आपण  नियंत्रण मिळवू शकतो. आणि असे नियंत्रण करणे जमले कि फायदा होइपर्यंत बाजारात टिकाव धरणे शक्य होते. आणि मग मात्र 'सरशी तिकडे पारशी ' या म्हणीप्रमाणे वागून बाजारात फायदा मिळवणे शक्य होते ते 'स्टॉप ऍन्ड रिवर्स (SAR) ट्रेडींग सिस्टीम च्या मदतीने. कसे तेच आता बघुया -
'  स्टोप ऍन्ड रिवर्स ट्रेडींग ' ( SAR) हे मुख्यत्वे शोर्टटर्म ट्रेडींगसाठी वापरले जाते, मात्र इन्ट्राडे ट्रेडींगसाठीही त्याचा उपयोग होवू शकतो. येथे ' स्टॉप ' म्हणजे स्टॉपलॉस असून जेथे स्टॉपलॉस लागतो तेथे उलट पोझिशन घ्यायची (लॉन्ग वा शॉर्ट) असा याचा सोपा अर्थ आहे.
उदा. निफ्टी डे-ट्रेड करताना  आपल्याला वाटले कि बाजार उत्तम असून त्याप्रमाणे वा इतर कोणत्याही टेक्निकल इंडीकेटर्स वा स्ट्रॅटेजीनुसार आपण निफ्टी १ लॉट BUY केला आहे. निफ्टी खरेदी केल्यावर आपण स्टॉपलॉस तर लावलेला असेलच. तो २० पॉइन्ट खाली असेल वा EMA क्रॉसओवर वर आधारीत असेल किंवा  अन्य कशाही प्रकारचा असेल-ते काहीही असले तरी तो स्टॉपलॉस एकदा का हिट झाला कि (आपला खरेदीचा निर्णय चूकीचा होता आणि बाजाराचीच सरशी आहे ,हे मान्य करून) आपणही बाजाराची दिशा स्वीकारायची  आणि खरेदी केलेला लॉट विकून तेथेच आणखी १ लॉट विकायचा . म्हणजे आपला स्टॉपलॉस हिट होताच २ लॉट विकायचे. एका प्रकारे आपण बुलीश पक्षामधून बेअरीश पक्षात उडी मारायची- हेच 'सरशी तिकडे पारशी' हे  धोरण आणि ' स्टॉप ऍन्ड रिवर्स (SAR ) ' ट्रेडींग सिस्टीमचे ढोबळ स्वरूप !
ढोबळ म्हणायचे कारण कि या कल्पनेवर आधारीत एखादी बंदीस्त आणि परिपूर्ण सिस्टीम बनवताना स्टॉपलॉस नेमका कसा ठरवायचा  या महत्वाच्या मुद्द्या व्यतिरिक्त अन्य नियम बारकावे अभ्यासाने ठरवावे लागतात. EMA किती पिरीअडची वापरावी , अन्य इंडीकेटर्स वापरावे का, आणि ब्रोकरेजचा विचार करता कितीवेळा व किती प्रमाणात ट्रेड करावे, निफ्टी च्या बाबतीत जे नियम लागू होतील ते बॅंकनिफ्टीच्या वा स्टॉक्स च्या बाबतीत लागू होतीलच असे नाही, अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून  जगभरचे ट्रेडर्स ही सिस्टीम निरनिराळ्या स्वरूपात राबवतात.
या SAR ट्रेडींगचे काही फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे -
फायदे -
१) ज्यांना स्टॉपलॉस लावायला आवडत नाही त्यांना ही सिस्टीम उपयोगी आहे.
२) बाजार कसाही असो, आपण कायम ट्रेड पोझिशनमध्ये असतो.
३) कायम ट्रेडमध्ये असल्याने अचानक होणा-या बाजाराच्या मोठ्या उसळीचा पूर्ण फायदा मिळू शकतो.
४) पिवोट वा अन्य टेक्निकल लेवल्स बघाव्या लागत नाहीत.-सोपी सिस्टीम.
५) ट्रेन्डींग मार्केट च्या बाबतीत अधिक यशस्वी मात्र रेंजबाऊंड मार्केटमध्येही संधी आहे. 
तोटे -
१) बाजार खूपच नॅरो रेन्जमध्ये राहीला तर उदा. निफ्टी २० पोइण्टमध्येच फिरत राहीला तर सिस्टमचा उपयोग होत नाही.
२) नॅरो रेन्जच्या दिवशी सतत बदलणा-या पोझिशनमुळे वाढत जाणारे ब्रोकरेज.
(वरील तोटे हे अन्य उपायांनी कमी करता येतात)
अधिक स्पष्टीकरणासाठी  येथे आपण (फक्त इन्ट्राडे साठी) एक सोपी म्हणजे कमीतकमी इंडीकेटर्स असणारी सिस्टीम बनवूया.

गूगल फायनान्स वर निफ्टीचा ' इन्ट्राडे ' चार्ट उघडा.





टेक्निकल्स मध्ये 'EMA 50 (2m) सिलेक्ट करा.-याचा अर्थ दर दोन मिनिटांनी घेतल्या जाणा-या गेल्या ५० रिडींगची म्हणजेच एकूण १०० मिनिटांसाठीची ही  EMA असेल. (EMA विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
तांबड्या रंगाची ही EMA - यावरच आपला स्टॉपलॉस  आधारित आहे आणि  त्यानुसार पोझिशन रिवर्स करायची आहे.
मार्केट ओपन झाल्यावर कमीतकमी पाऊण तास (दहा वाजेपर्यंत) पोझिशन घेवू नये)
दिवसाच्या सुरुवातीला निफ्टी हा EMA पासून सुमारे दोन्ही बाजूला ७-८ पोइन्ट (नॅरो रेन्ज) मध्येच फिरत राहीला तर कुठलीच पोझिशन न घेता वाट बघावी.
दहा वाजता जर निफ्टी (spot) हा 50 EMA च्या कमीतकमी ७-८ पॉइन्ट वर असेल व त्याचवेळी EMA हीसुद्धा  चढती दिशा दाखवत असेल तर निफ्टी(वा मिनिनिफ्टी) मद्ये १ लॉट खरेदी (लॉन्ग पोझिशन) करावा. ( निफ्टी हा 50 EMA च्या खाली ७-८ पॉइन्ट असेल व EMA सुद्धा उतरती असेल तर १ लॉट शॉर्ट करावा)
जर फायदा वाढत गेला तर १५ पोइन्ट फायद्यानंतर कधीही आपल्या सोयीने प्रॉफिट बूक करावा. अधिक वेळ न थांबणे श्रेयस्कर.  एकावेळी दोन लॉट खरेदी करून १ लॉट विकून दुस-यासाठी अधिक प्रॉफिटची वाट बघता येइल -मात्र पोझिशन रिवर्स करतानाही दोन ऐवजी ४ लॉट विकावे लागतील-तेव्हा  हे आपण आपल्या कुवतीनुसार ठरवायचे आहे. (सुरुवातीला तरी असे करणे टाळावे- मिनिनिफ्टीचा १ लॉट उत्तम)
खरेदी केल्यावर जर निफ्टीने दिशा बदलली आणि  EMA ला छेदून तो खाली  आला आणि शिवाय  EMA ची दिशाही बदलून ती उतरती झाली तर लगेच पोझिशन रिवर्स करावी म्हणजे दोन लॉट विकावे. म्हणजेच पहिला खरेदी केलेला लॉट स्क्वेअर-अप होवून प्रत्यक्षात एक लॉट शोर्ट पोझिशन राहील.  (सुरुवातीला निफ्टी शॉर्ट केला असेल तर या ऊलट करावे)
एकदा प्रॉफिट मिळाल्यावर डे ट्रेडरने त्यावर समाधान मानून त्या दिवशी Excess Trading टाळावे.
दुपारी १.३० पर्यंत पोझिशन घेण्यायोग्य स्थिती आली नाही तर त्या दिवशी ट्रेड करू नये. दुपारी २.३० नंतर नवी पोझिशन घेवू नये तसेच त्यानंतर अधिक फायद्याच्या अपेक्षेने ट्रेडमध्ये रहाणे टाळावे. 
 २-३ वेळेला पोझिशन रिवर्स होवूनही फायदा झाला नाही-म्हणजेच निफ्टी नॅरो रेन्जमध्ये राहीला तर त्या दिवशीचे ट्रेड थांबवावे.
निफ्टीऐवजी मिनिनिफ्टी ट्रेड केल्याने  ब्रोकरेज नियंत्रणात राहते.( अर्थात फायदा व तोटाही त्याप्रमाणात कमी होतो.)
ही 'SAR सिस्टीम' गेल्या काही दिवसांच्या निरीक्षणावर आधारित आहे, मात्र एक नमुना म्हणूनच याकडे बघा, वाटलेच तर काही बदल, सुधारणा करून पेपर ट्रेडींग करायला हरकत नाहीच.
Don't follow me blindly!  :-)  उलट काही त्रुटी,सुचना शंका असतील तर अवश्य कॉमेन्ट्स द्या. आणि हो FB वर share वा Like करायला विसरू नका !

Read more »

४ सप्टें, २०१२

पिवोट कॅलक्युलेटर/ तांत्रिक विश्लेषण ओळख (PDF) मोफत डाऊनलोड-आता अन्ड्रोइडवरही उपलब्ध !!

 ' शेअरबाजार साधा-सोपाच्या ' सर्व वाचकांसाठी-
पिवोट पॉइन्ट कॅलक्युलेटर येथे मोफत डाऊनलोड करा -
http://dl.dropbox.com/u/102611623/pivot%20caculator.xlsx

काही वाचकांनी 'तांत्रिक विश्लेषणाची ओळख' या लेखमालिकेची 'PDF आवृत्ती' मिळेल का अशी विचारणा केली आहे, त्यानुसार सदर PDF FORMAT  मधील file खालील लिंकवरून मोफत डाऊनलोड वा प्रिन्ट करता येइल -
http://dl.dropbox.com/u/102611623/marathishare.blogspot.com-p-blog-page_03.html.pdf

वरील  दोन्ही डोक्युमेन्ट्स अन्ड्रोइड वरही DropBox App. द्वारे उपलब्ध आहेत !

Read more »


Read more »