Share/Bookmark

२८ ऑग, २०१०

Reliance Industries Ltd. - रिलायन्सचे काय होणार?



गेले काही महिने १००० ते ११०० (म्हणजेच बोनसपूर्वीचे २००० ते २२०० ) या रेंजमध्ये फिरणारा रिलायन्स इंड. चा शेअर जुलाई’१० च्या सुरुवातीपासून सतत खाली येत आहे.या आठवड्यात तर त्याने ९५० ची पातळीही तोडलेली दिसत आहे.यामुळे साहजिकच अनेक शेअरहोल्डर चिंतेत आहेत. रिलायन्समध्ये घडते आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी प्रथम आपण थोडासा घटनाक्रम पाहूया.-

* ९ जून ’१० ची बातमी - रिलायन्सने ५.५ बिलिअन रुपये उभारले. ही रक्कम कशासाठी वापरली जाणार याचा खुलासा झाला नाही.
*९ जून ’१० -रिलायन्स टेलीकोम सेक्टरमध्ये प्रवेश करणार अशी बातमी. स्पेक्ट्रमच्या लिलावातील "विनर" कंपनीचे अधिग्रहण करण्याचा विचार. 
*१० जून ची बातमी- पायोनीअर नेचरल रिसोर्सेस या अमेरिकन कं. ची युनिट्स खरेदी करण्याची रिलायन्सची योजना.
* ११ जून -रिलायन्सची इन्फोटेल ब्रोडबेंड कं. खरेदी करण्याची योजना.
*१४ जून - रिलायन्स येत्या दोन वर्षात ब्रोडबेंड सेवाक्षेत्रात १ बिलिअन डोलर गुंतविणार.
* १४ जून - रिलायन्स गुजरातमधील आपल्या पेट्रोकेमीकल उद्योगाच्या विस्तारावर ३ बिलिअन  डोलर्स खर्च करणार.

या काही ठळक योजना आहेत ज्यामध्ये रिलायन्स रस घेत आहे. या योजनांना अंतिम स्वरूप देणे हे फार मोठे आव्हान असून जर रिलायन्सची स्थिती कमकुवत असती तर त्यांनी हे आव्हान स्वीकारले नसते असे मला वाटते. रिलायन्सच्या एकूण शेअरकेपिटल पैकी ४४% हिस्सा हा प्रमोटर्स कडे, पर्यायाने मालकांकडे असून शेअरच्या भावामध्ये झालेली घसरण त्यांनी नक्कीच नजरेआड केलेली नसणार, आणि भविष्यात ती किंमत वर कशी आणायची या विषयात तर रिलायन्स ग्रूप कुशल समजला जातो. 


दि.२३ ओगस्ट रोजीच्या शेअरखानच्या रिपोर्टनुसार पुढील तीन क्वार्टर्स पर्यंत रिलायन्सच्या केजी बेसीन मधील उत्पादन स्थिर रहाणार असून त्यामुळे २०११ पर्यंत तरी रिलायन्सच्या अर्निंगमध्ये भरघोस वाढीची शक्यता नाही, आणि त्याचेच चित्र बाजारातील शेअरच्या किंमतीमध्ये सध्या दिसत आहे.


मात्र शेअरखानने हे ही नमूद केले आहे कि अमेरिकन मार्केटमधील रिलायन्सचा प्रवेश ही भविष्यातील मोठी झेप ठरणार असून दीर्घ कालावधीसाठी त्यांनी रिलायन्सचा शेअर accumulate करणे सुचवले आहे. शेअरखानच्या रिपोर्टनुसार रिलायन्सची अलिकडील व भविष्यातील (संभाव्य) कामगिरी  खालीलप्रमाणे आहे- आणि ती नक्कीच आश्वासक आहे.आणि आपण त्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास हरकत नाही असे दिसते.

आता रिलायन्सचा शेअर accumulate करण्याआधी आपण रिलायन्सच्या एका वर्षाच्या चार्टवर नजर टाकू या.
 
एका वर्षाच्या चार्टनुसार तांत्रिकदृष्ट्या रिलायन्सने सर्व महत्वाचे सपोर्ट तोडले असून नोव्हेंबरच्या सुरुवातीस असणारी ९१० ही पातळी आता खूप महत्वाची ठरणार आहे. त्यापातळीपर्यंत तो पडेल किंवा नाही हे नक्की नसले तरी ती एक शक्यता आहेच, म्हणून ती पातळी गाठेपर्यंत आपली गुंतवणूक खालचे बजूस अधिक असेल अशा प्रकारे विभाजित करून टप्प्याटप्प्याने आपली खरेदी करणे योग्य ठरेल असे मला वाटते,