गुरुवार दि. ४ मार्च-
कालच्या माझ्या अंदाजाप्रमाणे बाजारात आज नफारुपी विक्री झाली आणि दिवसभर बाजार तांबडा राहिला, मात्र असे असले तरी फार पडझड न होता बंद होताना बाजार सावरत गेला त्यामुळे दोन गोष्टी लक्षांत आल्या त्या म्हणजे हे करेक्शन नसून एकप्रकारे कन्सोलिडेशन म्हणता येईल; आणि हे कन्सोलिडेशन १७५००च्या बरेच आधी म्हणजे १७०००च्याही खाली होत आहे, तेव्हा एक अंदाज असा करता येतो कि पुढील काळात बाजार १७५०० च्या आसपास जास्त न रेंगाळता पुढे जाण्याची शक्यता दिसत आहे. मात्र उद्या शुक्रवार असल्याने खरेदी टाळा आणि जागतिक बाजार काय करतात तेही पहा, नाहीतर पैसा अडकून पडेल आणि वेळही !
आपले फेवरीट शेअर वाढत जाताना दिसत आहेतच, आज DLF ने हालचाल करणे सुरू केले आहे, SBI वाढेल असे दिसत आहे, पण फायदयाचे टाईमिंग करणे महत्वाचे आहे.
follow button ka nahi?
Follow बटण टाकत आहे.Thanks for compliments.
hello
will like to chat
on share bazar and alibag
hello
aban offshre baddal tumche mat kai ?/
ssj
अबान हा शेअर oil price शी निगडीत आहे, मात्र तो बाजाराबरोबर वर न येता थोडा उशीरा येतो.हा, बाजार चांगला राहिला तर १६०० पर्यंत जायला हरकत नाही.मात्र १३०० च्यावर break -out होईपर्यंत थांबावे लागेल.
Sorry,वेळेच्या कमतरतेमुळे chat शक्य नाही,पण आपल्या comments ना उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.