Share/Bookmark

१८ ऑक्टो, २०१०

आजपासून ९.१५ वा.पासून बाजारात प्रत्यक्ष व्यवहार होणार...

शुक्रवारी जोरात कोसळलेला आपला बाजार कोल इंडीयाच्या IPO मुळे कोसळला कि आता करेक्शन चालू झाले आहे हाच प्रश्न सर्वांच्या मनात गेले दोन दिवस ठाण मांडून असणार हे नक्की. त्यात आणखी एक महत्वाची बातमी अशी कि आजपासून सकाळी ९.१५ वा. बाजार प्रत्यक्ष व्यवहार सुरू करणार आहे. त्याआधीची पहिली १५ मिनिटे फक्त ओर्डर स्वीकारल्या जातील, मात्र
सौदे होणार नाहीत.बाजारात सुरुवातीला होणार्या भारी चढ-उतारांना आळा घालण्यासाठी आणि बाजार उघडण्याआधी संस्थागत निवेशकांनी काय पोझिशन घेतल्या आहेत, त्याचा अंदाज सामान्य गुंतवणूकदारांना यावा आणि त्यानुसार आपले धोरण ठरवायला वाव आणि वेळ मिळावा याकरता हा बदल करण्यात आला आहे. आजच्या संभाव्य GAP-DOWN ओपनिंग मुळे बघुयाच याचा नक्की कसा परिणाम होतो ते.
आजपासून कोल इंडीयाचा IPO ओपन झाला आहे.त्याचा प्राईस बेंड २२५-२४५ आहे, आणि ही अतिशय वाजवी किंमत असून यात गुंतवणूक करण्याचा सल्ला अनेकजण देत आहेत. सध्या आणि प्रत्यक्ष लिस्टींगच्या वेळी असलेल्या बाजाराच्या स्थितीविषयी मी साशंक आहे. मात्र दीर्घावधीसाठी ठीकच वाटत आहे.
शुक्रवारी आपल्या बाजारात झालेली विक्री ही सातत्यपूर्ण होती, आणि मध्येच खरेदीचा आधार मिळत नव्हता असे चार्टवरून दिसत आहे आणि आज आशियाई बाजारातही त्याचा परिणाम दिसत आहे.- तेव्हा सावधान ! बाजारात खरेदी पूर्णपणे टाळण्याचाच सल्ला मी देइन.
निफ्टीला ५९५० जवळ आधार आहे तर ६०९० जवळ विरोध राहील. मात्र मॊठ्या करेक्शन मध्ये कुठलीही सपोर्ट लेवल पाळली जाण्याची शक्यता कमीच असते आणि त्याचीच मला काळजी आहे.