Share/Bookmark

४ जून, २०१०

Breakthrough in OIL-SPILL!... "फेट" वादळाचा धोका टळला...!

एकदा चांगल्या बातम्या येऊ लागल्या कि येतच रहातात-जसे कि युरोपियन अमेरीकन बाजार सावरले-आपल्या बाजाराने काल चांगली वाढ दाखवली-आणि  मेक्सिकन आखातातील तेलगळतीवर गेले काही दिवस चालू असलेल्या अनेक प्रयत्नांना कालच यश मिळून, गळती होणारा समुद्रातील पाईप कापण्यात यश आले असून आता तेथे एक अन्य पाईप जोडून गळती होउन सर्वत्र पसरणारे CRUDE OIL आता जहाजामध्ये साठवण्याच्या योजनेतील एक मोठे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.आसपासच्या प्रदेशाला  प्रदूषणापासून वाचवून नैसर्गिक संपत्तीचा अधिक विनाश टाळणे त्यामुळे शक्य होणार आहे.
गुजरातला व पर्यायाने जामनगरसारख्या मोठ्या प्रकल्पाला असलेला वादळाचा धोका आता टळला असून बरेच नुकसान टळले आहे.
  काल DOW JONES मध्ये विक्री झाली पण बंद होताना तो पुन्हा हिरवा झाला आहे.आशियाई बाजार मिश्र रंगात सुरू झाले आहेत. आज शुक्रवार असल्याने आणि थोडे PROFIT BOOKING होणारच असल्याने आपलाही बाजार आज FLAT रहाण्याचीच शक्यता आहे.
  आपल्या अंदाजाप्रमाणे टाटा स्टीलमध्ये काल विक्री दिसली आणि टेलीकोम व वाहन क्षेत्रात तेजी दिसून आली.त्याचबरोबर बेंका व रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये वाढ झालेली असून एकंदर पूढील आठवड्याच्या दृष्टीने चांगली पार्श्वभूमी तयार होत आहे.
तेजीमध्ये रिलायन्स,इन्फोसिस,टाटा मोटर्स,बेंका, ऒएनजीसी,लारसन अशा सर्वच दिग्गजांनी भाग घेतल्याने सदर कंपन्या तसेच संबधित क्षेत्रांतील अन्य चांगल्या कंपन्या जसे कि हिन्दाल्को,येस बेंक, AXIS BANK,भेल इ. यात चांगली वाढ दिसावी. 
WISH YOU ALL A  HAPPY WEEKEND!

Read more »

२७ मे, २०१०

Greece and World Economy -ग्रीस आणि जागतिक अर्थव्यवस्था-

           
गेले काही दिवस आपण ज्याची चर्चा सतत ऐकत आहोत त्या "ग्रीस" देशामध्ये नेमके घडले आहे तरी काय? याबद्दल माझे स्नेही आणि अर्थक्षेत्रातील अभ्यासक श्री.प्रसाद भागवत यांनी पुरविलेली माहिती खास माझ्या वाचकांसाठी येथे देत आहे-
गेल्या काही दिवसात युरोपातील ज्या आर्थिक पेचप्रसंगामुळे सर्व जागतिक बाजारांवर परिणाम झाला आहे त्या सर्व घटनांच्या मध्यभागी ग्रीस असल्याचे दिसून येते.पण ग्रीस या एका छोट्याशा देशामध्ये असे काय घडले आहे कि ज्याची GDP भारताच्या केवळ १/३ आहे आणि युरोपीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्याचा वाटा फक्त २% आहे?
    हा काही एकट्या ग्रीसचा प्रश्न नाही तर त्याबरोबर पोर्तुगाल,इटली,आयर्लंड आणि स्पेन हे सुद्धा कर्जामध्ये बुडत आहेत.या सर्व देशांनी पूर्वी बरे दिवस असताना घेतलेली कर्जे फेडण्याची ही वेळ आहे, मात्र दुर्दैवाने २००८ सालच्या मंदीतून या अर्थव्य्वस्था वर येण्यात अपयशी ठरल्या आहेत आणि त्यातील काही तर प्रचंड आर्थिक तूट दाखवित आहेत- म्हणजेच जमा होणार्या महसूलापेक्षा त्यांचा खर्च अधिक झाल्यामुळे ते कर्ज फेडण्याच्या परिस्थितीत नाहीत.
    हे सर्व कसे घडते?-


आपला खर्च वा पायाभूत सोयीं उभारण्यासाठी जी भांडवली गुंतवणूक लागते त्यासाठी या देशाच्या सरकारांनी काही कर्जे घेतली-(अर्थातच त्यांच्या बर्या दिवसांत). ही कर्जे अल्पमुदतीच्या ट्रेजरी बिलांच्या आणि दीर्घमुदतीच्या कर्जरोख्यांच्या स्वरूपात होती.
 अशा कर्जावरील व्याजदर हा सहसा कमी असतो कारण एखाद्या "देशाचे सरकार" हे,त्याला कर वाढविण्याचे आणि खर्चात कपात करण्याचे अधिकार वा क्षमता असल्याने, साहजिकच आपले बजेट समतोल राखून म्हणजेच खर्चापेक्षा महसूल जास्त मिळवून कर्जाची सहज परतफेड करू शकेल अशा विश्वासामुळे गुंतवणूकीसाठी अतिशय सुरक्षीत मानले जाते.
    असे कर्ज देणार्यांत प्रामुख्याने बेंका,पेन्शन फंड, विमा कंपन्या आणि "सरकारी" सुरक्षेच्या हमीवर विश्वासून असलेला सामान्य गुंतवणूकदाही असतो.
   मात्र अशा सर्व विश्वासाला कधीकधी तडा जातो-जेव्हा ग्रीससारखे राष्ट्र आपल्या महसूलापेक्षा अवाच्यासवा खर्च करून बसते आणि मग यावर तोडगा म्हणून मोठी कर्जे उचलली जातात आणि परिणामी आणखी खोल गर्तेत जाते.कर्ज देणारे मात्र "हा सर्व तात्पुरता प्रश्न असून लवकरच ते आपली महसूलातील तूट भरून काढून आपली कर्जे फेडतील" अशा भ्रमात असतात.
  हळूहळू असा काळ येतो जेव्हा कर्जदारांना खर्या परिस्थितीची जाणिव होवू लागते-महसूलातील तूट अधिकच वाढू लागते आणि कर्जे फेडणे अशक्य असल्याचे दिसू लागते.मग अशा वेळेला कर्जदार नव्या कर्जांना वाढीव व्याजदर आकारू लागतात आणि परिस्थिती अधिकच बिकट होते.
ग्रीसने अशी कर्जे ही "युरो" या चलनात घेतलेली असल्याने नवीन चलन छापून ते फेडण्याची सोयही राहिलेली नसते.भारत आणि अमेरिकेसारखी राष्ट्रे कर्जे आपापल्या चलनात घेत असल्याने तशी वाईट वेळ आलीच तर त्यांना ती नवीन चलन छापून फेडणे शक्य असते-(अर्थात यामुळेही देशांतर्गत महागाईमध्ये होणारी वाढ अटळ असतेच). ग्रीसला मात्र हा पर्याय उपलब्ध नाही.
 अशा परिस्थितीत ग्रीससारख्या देशापुढे दोन पर्याय असतात-
 १)आपल्या महसूलामध्ये प्रचंड वाढ घडवून आणणे आणि त्याचवेळी आपला खर्च आवाक्यात आणून वा कपात करून कशाही प्रकारे तूट आवाक्यात आणणे वा कमी करणे-आणि त्याद्वारे आपल्या कर्जदारांचा/गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवणे-जेणेकरून ते कमी दरात कर्जे देण्यासाठी मान्यता देतील.
२)आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी जो काळ लागतो त्याकरिता तात्पुरती मदत म्हणून कमी व्याजदराने मोठ्या प्रमाणात देशाला तातडीने पैसा पुरविला जाणे- दुष्टचक्र भेदण्यासाठी.
  हे सर्व जर शक्य झाले नाही तर ग्रीसला -"स्वत:चे दिवाळे(Default) निघाले असून कर्जदारांना त्यांच्या पैशाचा फक्त काही भागच परत मिळेल आणि तेसुद्धा काही काळानंतर" अशी घोषणा करावी लागेल.
आणि येथेच तर खरी समस्या निर्माण होते-हा एका देशाचा प्रश्न न रहाता सार्या जगालाच भेडसावणारी मोठी समस्या बनते.ग्रीसचे बहूतेक कर्जदार हे ग्रीसचे नागरिक नसून परदेशी उदा. फ्रेंच वा जर्मन बेंका वा गुंतवणूकदार आहेत.जर ग्रीसने दिवाळे जाहीर केलेच तर या देशांच्या अर्थव्यवस्थांनाही त्याचा मोठा फटका बसणार हे उघड आहे.त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे ग्रीस हा युरोपीयन युनियनचा सदस्य आहे,त्यामुळे ज्यांनी युरोमध्ये कर्जे दिलेली आहेत किंवा गुंतवणूक केली आहे,अशा सर्वच घटकांना चिंता उत्पन्न होऊन ते इतर देशांनाही कर्ज देतांना वाढीव दराची मागणी करतील.
  २००८ सालच्या मंदीमुळे सर्वच देश GDP मध्ये तूट दाखवित आहेत.ही तुट इतर युरोपीय देश व अमेरिकेची सुद्धा १०% पेक्षा कमी नाही.अशा परिस्थितीत ग्रीसला कमी दरात कर्ज मिळणे अधिकच कठीण बनले आहे.
अशा सर्व वातावरणात ग्रीसला मदत देण्यास जर्मनी व युरोझोन ने सुरुवातीस विरोध केला असला तरी ग्रीसला वाचविणे म्हणजे एका प्रकारे सर्व युरोपीयन देश आणि अमेरिकेलाही वाचविण्यासारखे आहे अन्यथा हे आर्थिक वादळ सार्यांनाच घेऊन बुडेल हे लक्षांत आल्यावर मदत Package जाहीर झाले आहे.
    पण अशी मदत दिल्यावर आणखी काही देश आपली तूट निर्धास्तपणे वाढ्वतील आणि त्यांनाही मदत देण्याची वेळ येइल अशीही रास्त भिती व्यक्त होत आहे.
  युरोपीयन सेंट्रल बेंकेने दिलेले १२० बिलियन डोलरचे Package ग्रीसकडून आपला महसूल वाढविण्याची आणि खर्चात कपात करून तूट भरून काढण्याची अपेक्षा तर करतेय पण ग्रीसची अशा बाबतीतली क्षमता शंकास्पदच वाट्ते आहे.
 याउलट समजा ग्रीसने आपल्या खर्चात कपात केली व कर वाढवून महसूल वाढविलाच तरी त्यामुळे थोड्या काळासाठी का होइना GDP कमीच होणार आहे.आणि तूट ही GDP च्या टक्केवारीत मोजली जात असल्याने GDP कमी झाल्याने GDP तील तूट आणखी वाढीव दिसणार आहे.ग्रीसला पुरेशा वेगाने आपली तूट ही GDP च्या ३% एवढी कमी करावी लागणार आहे आणि एक प्रकारे ही सर्वच देशांना वेळीच एकत्रित प्रयत्न करण्यासाठीची वार्निंग आहे.
युरोपीयन द्शांनी एकंदर एक ट्रिलियन डोलरची मदत करण्याचे ठरविले आहे आणि याचाच अर्थ काही बेंका व गुंतवणूकदारांची असलेली "RISK" ही  देशांच्या सरकारांकडे सुपूर्द करण्यासारखे आहे.हा सारा पैसा युरोपीयन सेंट्रल बेंक छापणार आहे तो युरोझोन मधील सरकारच्या वतीनेच-म्हणजेच युरोपमधील करदात्यांचाच तो पैसा असणार आहे-जो धोक्यात आहे.
  अशा प्रकारे कर्ज चुकविण्यासाठी अधिक कर्ज काढणे ही "योजना" काही काळपर्यंत हा प्रश्न सोडविल्यासारखा दाखवेलही मात्र आपल्या पिढीची ही समस्या आपण आपल्या मुलाबाळांच्या माथी मारत आहोत-एवढाच त्याचा खरा अर्थ आहे.


  




Read more »

२५ मे, २०१०

जागतिक बाजारांच्या चिंतेचे विषय -Europe,Hang Seng, Nikkei,Korea and Oil Spill in Mexican Gulf-

आज सकाळी आशियाई (Hang Seng, Nikkei) बाजारांनी जो लाल रंग दाखविला तो आपल्यासह जगभर पसरला. FTSE  ने आज ५००० ची महत्वाची सपोर्ट लेवल तोडली आहे.पडणार्या बाजाराला सपोर्ट लेवल नसते -तसेच जोराने वाढणार्या बाजाराला विरोध पातळी (Resistance level )  नसते असे म्हणण्याचा प्रघात आहे-  :)

  आता आपल्या बाजारासाठी (NIFTY )४७०० ची पातळी महत्वाची आहे याची दोन कारणे आहेत-
  १) फेब्रुवारी २०१० मध्ये गाठलेली ही नीचतम पातळी आहे-याचाच अर्थ ही पातळी जर तुटली तर बाजार तेव्हापेक्षा आणखी बराच खाली जाण्याची शक्यता आहे.
  २) ४७०० या पातळीवर निफ्टीचा पी/ई पुन्हा एकदा २० होईल-जो कालच्या DATA नुसार २०.६३ आहे.
या परिस्थितीत आपण ही पातळी तुटते किंवा नाही ( DOW JONES FUTURES ने १०,००० ची पातळी आज तोडली आहे तसेच उ. कोरियाच्या सैन्याला द. कोरियाविरुद्ध कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश मिळाल्याने व -मेक्सिकन आखातात चालू असलेल्या ब्रिटीश पेट्रोलिअमच्या तेलगळतीमुळे चिंतेत भरच पडली आहे (तेथील छायाचित्रे खास आपल्यासाठी-)

  -तेव्हा आता  बहूधा ४७०० ची पातळीही तुटेल) हे बघून F&O सेटलमेंट पर्यंत वाट बघणे ठीक राहील.आज बाजारात आघाडीच्या शेअरमध्ये जोरात विक्री झाल्याने चांगले शेअर कमी किंमतीत मिळणार आहेत मात्र दुसर्या टप्प्याची खरेदी नेमकी कधी करावी हे सांगण्याचा माझा जरूर प्रयत्न राहील, त्यासाठी या ब्लोगला Subscribe  / Bookmark करायला विसरू नका, आणि फायदा झाला तर येथे अवश्य Comment द्या. 


Read more »

२३ मे, २०१०

शेअरबाजारात हास्यलकेरी....ENJOY THE WEEK-END !

मित्रांनो ,
या वीकएन्ड मध्ये, नेहमीच्या "पैसा-पैसा "  करण्याच्या  माहौलमधून जरा विरंगुळा म्हणून  येथे जरा वेगळ्या प्रकारचे लेखन करावेसे वाटले आणि ते उजव्या बाजूला दिसणार्या  "विशेष काही.." या सदरात "शेअरबाजारात हास्यलकेरी "या
ठिकाणी आपण वाचू शकाल. 
                                                       
                                                   ENJOY THE WEEK-END!

Read more »

२० एप्रि, २०१०

WISH YOU ALL .HAPPY TRADING !

य़ा ब्लोगला मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद पाहून मी लिखाण थांबविण्याचा निर्णय घेत आहे.असे वाटले होते कि टीका झाली तरी चालेल, पण दखल घेतली जावी.मात्र ही अपेक्षा फोल ठरत आहे. चूका दाखवाव्यात एवढेही माझे लिखाण अपीलींग नसेल तर ते थांबविणे बरे. ज्या कोणी अपवादाने दखल घेतली आहे त्यांचे आभार.
WISH YOU ALL .HAPPY TRADING !
            

Read more »

४ मार्च, २०१०

फायदयाचे टाईमिंग करणे महत्वाचे !

गुरुवार दि. ४ मार्च-
कालच्या माझ्या अंदाजाप्रमाणे बाजारात आज नफारुपी विक्री झाली आणि दिवसभर बाजार तांबडा राहिला, मात्र असे असले तरी फार पडझड न होता बंद होताना बाजार सावरत गेला त्यामुळे दोन गोष्टी लक्षांत आल्या त्या म्हणजे हे करेक्शन नसून एकप्रकारे कन्सोलिडेशन म्हणता येईल; आणि हे कन्सोलिडेशन १७५००च्या बरेच आधी म्हणजे १७०००च्याही खाली होत आहे, तेव्हा एक अंदाज असा करता येतो कि पुढील काळात बाजार १७५०० च्या आसपास जास्त न रेंगाळता पुढे जाण्याची शक्यता दिसत आहे. मात्र उद्या शुक्रवार असल्याने खरेदी टाळा आणि जागतिक बाजार काय करतात तेही पहा, नाहीतर पैसा अडकून पडेल आणि वेळही ! 
आपले फेवरीट शेअर वाढत जाताना दिसत आहेतच, आज DLF ने हालचाल करणे सुरू केले आहे, SBI वाढेल असे दिसत आहे, पण फायदयाचे टाईमिंग करणे महत्वाचे आहे.

Read more »

१ फेब्रु, २०१०

इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला सरकारचे झुकते माप

बराक ओबामांच्या विधानांमुळे आपल्या आय.टी. कंपन्यांवर थोडाफार परिणाम होईल या भितीने शेअरच्या किंमती खाली आल्या तरी इन्फोसिस, विप्रोसारख्या दर्जेदार कंपन्यांवर कायमस्वरूपी परिणाम होईल असे वाटत नाही. तेव्हा इन्फोसिस स्वस्त झाला तर संधी शोधा.
बर्याच चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्त झाले असले तरी बाजार आणखी तुटला तर ? हा प्रश्न असतोच. सोमवारपासून या आठवड्याचे चित्र स्पष्ट व्हायला सुरूवात होईल.तेव्हा निदान सुरुवातीस तरी वाट बघण्याचे धोरण अवलंबावे. संध्याकाळी  युरोपीय व अमेरीकन बाजार पाहूनच बाजाराच्या पुढील वाटचालीचा अंदाज बांधणे योग्य ठरेल.
गेल्या आठवड्यात माझ्या सल्ल्याप्रमाणे खरेदी केली असेल तर त्याची चिंता नको - फक्त आणखी खरेदी करण्यापूर्वी अंदाज घ्या एवढाच याचा अर्थ !
वाहन उद्योगासाठी आगामी काळ चांगला असेल मात्र खरेदीची वेळ संभाळा.
"RBI च्या दरवाढीमुळे सर्वच व्याजदर वाढणार नाहीत" या निर्णयामुळे बाजाराने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे, मात्र जागतिक घटक अजूनही परिणाम दाखवू शकतात.
इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला सरकार झुकते माप ( व निधी) देईल असे स्पष्ट संकेत आहेत.-आता असा निर्णय सरकारला घेता येणे हीच माझ्या दृष्टीने अर्थव्यवस्थेसाठी व बाजारासाठी चांगली घटना आहे.

Read more »

२७ जाने, २०१०

बाजारात जेवढे PANIC जास्त तेवढ्या खरेदी संधी अधिक !

काल २६ जाने.ची सुटी असल्याने, कालच्या आशियाई बाजारांच्या घसरणीचा परिणाम आज बघायला मिळाला.त्यामानाने आज आशियाई बाजार कमी घसरले.उद्या सेटलमेंट व परवा RBI चे जाहीर होणारे धोरण यामुळे बाजारात चिंता आहे.यादरम्यान मी केलेली काही निरीक्षणे याप्रमाणे-
  • आज SBI,DLF,Tata Motor Tata Steel, यात विशेष घट दिसली. 
  • सेन्सेक्स व इतर शेअरच्या मानाने RIL गेले काही दिवसात खूप कमी प्रमाणात म्हणजे फक्त ७ ते ८ टक्के पडला, त्या तुलनेत टाटा स्टील, SBI इ.शेअर जवळ जवळ १५ टक्क्याने पडले आहेत.
  • भारती एअरटेल अजिबात पडला नाही, सोमवारी तर त्यात चक्क वाढ दिसली.
  • सेन्सेक्सच्या मानाने जे शेअर जास्त पडतात  -वा वाढतात- ( म्हणजेच ज्यांचा "बीटा फेक्टर " जास्त आहे ) त्यांचा शोर्ट टर्म ट्रेडींगसाठी विचार अवश्य करा. 
  • बाजारात PANIC निर्माण होत आहे.२९ ता. नंतर पडझड तीव्र झाली तर बरेच चांगले शेअर "OVERSOLD" होतील- याचाच आपण फायदा उठवायचा आहे. बाजारात जेवढे PANIC जास्त तेवढ्या खरेदी संधी अधिक !
  • बाजार अगदी तळाला येण्याची वाट बघितल्यास एका दिवशी अचानक तो ४०० ते ५०० अंशांनी वरतीच उघडेल अशी शक्यता. तेव्हा सावकाश खरेदी चालू ठेवा.(मी तशी ठेवली आहे.) 
  • सत्यममध्ये  ऐन PANIC  होते तेव्हा म्हणजे तो १५ ते २० रु.ना मिळत असताना खरेदी केलेले किती जण आहेत ? अगदी थोडके ! पण सध्याच्या वातावरणातही ते भाग्यवान पांचपट फायद्यावर बसले आहेत हे ध्यानात घ्या.आपल्या एकूण बाजाराची स्थिती त्यावेळच्या सत्यमसारखी वाईट नक्कीच नाही, मग भिती कसली ?
  • माझ्या आधीच्या अंदाजाप्रमाणे साखर ( व एकूणच जीवनावश्यक वस्तू ) महागाईवरून उठलेले वादळ शमले नसताना बजाज हिंद मात्र सोमवारी व आज जोरात होता. बाजार आणखी पडला तर तो खाली येइलही पण वातावरण सुधारल्यावर तो बघा कसा उड्या मारेल ते ! 
  • तसेच रोल्टा बाजाराला न जुमानता झेप घेण्याचा प्रयत्न करतो आहे- हेरून ठेवा !  
  • इंडीया सिमेंट OVERSOLD  वाटतो आहे. 

Read more »