Share/Bookmark

१३ मार्च, २०११

मूव्हींग एवरेजेसचा ट्रेडींगमध्ये कसा वापर कराल..?

मित्रहो, 
वेळेच्या कमतरतेमुळे बर्याच दिवसांनी येथे लिखाण करत असलो तरी सर्वांना उपयोगी पडेल असे काहीतरी मराठीतून व सोप्या भाषेत उपलब्ध करताना नेहमीइतकेच समाधान होत आहे. हा माझा प्रयत्न वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
आजची ही पोस्ट , "तांत्रिक विश्लेषणाची ओळख" या लेखमालेचा पूढचा भाग म्हणूनही लिहीत आहे.
तांत्रिक विश्लेषणाची ओळख :भाग १३
मूव्हींग एवरेजेसचा ट्रेडींगमध्ये वापर-
टेक्निकल चार्ट पहाताना मूव्हींग एवरेजची किंमत कशी काढतात ते आपण यापूर्वी पाहिले आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचे त्याचा प्रत्यक्ष ट्रेडींगमध्ये कसा वापर करतात हे जाणून घेणे आहे.
मूव्हींग एवरेजचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे एखाद्या शेअरची वा कमोडिटीची एखाद्या ठराविक काळापूरती सरासरी किंमत होय. हा ठराविक काळ किती असावा हे अर्थातच आपण ठरवायचे आहे.
गूगल वा याहू फायनान्स या साईटवर गेल्यास असे इन्टरएक्टीव्ह चार्ट्स उपलब्ध असतात.त्यामध्ये आपण इन्ट्राडे, ५ दिवस, महिना, ३महिने, ६ महिने, वर्ष, ५ वर्षे इ. विविध कालावधी निवडू शकतो.एकदा का आपला कालावधी नक्की झाला कि मग त्या चार्ट मध्ये किती पिरीअडची मूव्हींग एवरेजची रेषा काढायची हे ठरवावे लागते.
खालील आकृती पहा-

यामध्ये १० पिरीअड SMA आणि ३० पिरीअड EMA अशा दोन मूव्हींग एवरेजेस काढल्या आहेत.अर्थातच यातील १०SMA ही वेगात हालचाल करणारी आहे आणि ३०EMA  ही त्यामानाने कमी हालचाल दाखवते किंवा फारसे चढ-उतार दाखवत नाही. अशा प्रकारे दोन वेगळ्या प्रकारे वागणार्या लाईन्स घेतल्याने नक्की ट्रेन्ड काय आहे, तसेच तो रिव्हर्स होतो आहे का हे ओळखता येते.
सातत्याने वरखाली होणार्या शेअरच्या भावातील तात्पुरत्या चढ-उतारामुळे होणार्या दिशाभूलीवर उपाय म्हणून मूव्हींग एवरेज या कल्पनेचा जन्म झाला. थोडक्यात मूळ किंमतीच्या ग्राफमधील विचित्र वळणे टाळून त्याचेच एका गुळगुळीत (Smooth) रेषेमध्ये रुपांतर करण्यात आले.
आता अशा दोन वेगवेगळ्या मूव्हींग एवरेजेस पैकी वेगवान असलेली म्हणजेच १०SMA ही जेव्हा ३०EMA या रेषेला छेद देते तेव्हा ट्रेन्ड रिव्हर्स झाला असे ढोबळमानाने समजले जाते.
आकृतीत दाखवल्याप्रमाणे जेव्हा १०SMA ने ३०EMA ला खालून वरच्या दिशेस छेद दिला तेव्हा डाऊनट्रेन्ड संपून अपट्रेन्ड सुरू झाला असे समजतात.त्यानंतर मात्र जोपर्यंत पुन्हा वरून खालच्या दिशेस छेदले जात नाही तोपर्यंत अपट्रेन्ड कायम आहे असे समजण्यात येते.
म्हणजेच अपट्रेन्ड सुरू झाल्यावर खरेदी करून पुन्हा ट्रेन्ड रिव्हर्सल होईपर्यंत होणारा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो.
जोपर्यंत १०SMA ही ३०EMA च्यावर राहिली आहे, तोपर्यंत Long position (खरेदी) चा विचार करावा आणि जर १०SMA ही ३०EMA च्या खाली असेल तर Short positions (विक्री अथवा शोर्टसेलींग) चा विचार करावा.
या पद्धतीने आपले निर्णय योग्य ठरण्याची शक्यता वाढते.
यापेक्षा अधिक सोपे काही असेल का ?
मात्र म्हणूनच कोणतीही पद्धत शेअरबाजारात १०० टक्के कधीच बरोबर नसते याचीही जाणीव ठेवायला हवी. मात्र अधिक अचूक निदान करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पिरीअडच्या SMA व EMA चा वापर करून बघा. कुठले कोम्बिनेशन अधिक अचूक परिणाम देते तसेच आपल्या स्वत:च्या ट्रेडींग-स्टाईल ला चपखल बसते ते प्रत्येकाने पडताळून पहाणे गरजेचे आहे. तसेच डे-ट्रेड साठी इन्ट्राडे चार्ट वापरावा आणि शोर्ट टर्म साठी ५ दिवस,१ महिना, ३ महिने तसेच ६ महिने कालावधीचे चार्ट निवडून त्यावर विविध पिरीअडच्या मूव्हींग एवरेजेस कशा काम करतात हे पहायला हवे. कुठल्या पद्धतीने कमीतकमी चूकीचे सिग्नल (WHIPSAW) निर्माण होतात ते पडताळून ती पद्धत सातत्याने स्टोपलोस सहीत वापरल्याने फायद्याचे प्रमाण नक्कीच वाढेल.
१० व २६SMA , ८ व ३४EMA तसेच, २० व ५०SMA अशी विविध कोम्बिनेशन्स ट्रेडर्समध्ये लोकप्रिय आहेत.
यात खालील गोष्टी नियम म्हणून पाळाव्यात-
१) छोट्या पिरीअडची लाईन ही मोठ्या पिरीअडच्या लाईनपेक्षा वर असेल तरच खरेदीचा विचार.
२) दोन्ही एवरेजेस एकमेकांच्या फार जवळ नसाव्यात.
३) दोन्ही एवरेजेस या वरचे बाजूस जाणार्या म्हणजे चढत जाणार्या असाव्यात.

याव्यतिरिक्त आणखी एक सोपी व परिणामकारक पद्धत म्हणजे २१ किंवा ३४ या पिरीअडची एकच EMA लाईन काढून जेव्हा शेअरची किंमत ही EMA लाईनला खालून वरच्या दिशेस छेद देइल तेव्हा खरेदी व याउलट वरून खालच्या दिशेस छेद देइल तेव्हा शोर्टसेल करतात.
अशा प्रकारच्या ट्रेडींग मध्ये निर्णयाला अधिक बळकटी यावी म्हणून २०० SMA चा खालील प्रमाणे प्रभावी वापर करता येतो.-
२०० SMA ही लाईन काढून बुलीश विभाग आणि बेअरीश विभाग असे दोन भागांची कल्पना केली जाते. २००SMA ही मोठ्या पिरीअडची असल्याने ही फार चढ-उतार दाखवत नाही, या लाईनच्या खाली बेअरीश विभाग समजून जोपर्यंत शेअरची किंमत या विभागात आहे, तोपर्यंत वरील मूव्हींग एवरेजेस च्या कोम्बिनेशनने दिलेले विक्रीचे सिग्नल फक्त विचारात घेतले जातात.
याउलट २००SMA च्या वरच्या बाजूस म्हणजे बुलीश विभागात जर शेअरची किंमत असेल तर फक्त खरेदी सिग्नलच विचारात घेतले जातात.
२०० SMA रेषा ही कोणत्याही चार्टचे अविभाज्य अंग असावी असे महत्व तीला आहे.सातत्याने निरीक्षण कराल तर असे दिसून येइल कि शेअरची किंमत ही अनेक वेळेला या महत्वाच्या रेषेला स्पर्श करून परत फिरते.
 सर्व वाचकांना ही माहिती सोप्या भाषेत देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तरीही काही शंका असेल तर जरूर COMMENT द्यावी.
WISH YOU ALL HAPPY TRADING....!


Read more »

३ जाने, २०११

तांत्रिक विश्लेषणाची ओळख- मागील सर्व भाग येथे उपलब्ध झाले आहेत.!

मित्रांनो,
गेले बरेच दिवस वेळेच्या कमतरतेमुळे लिखाण करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व !
मात्र याअगोदर ठरविल्याप्रमाणे आतापर्यंत फक्त या ब्लोगच्या सदस्यांनाच उपलब्ध असलेल्या "तांत्रिक विश्लेषणाची ओळख" चे आतापर्यंतचे सर्व भाग एकत्ररित्या तसेच सर्व वाचकांसाठी ब्लोगवरच उपलब्ध केले आहेत. ते मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा ब्लोगच्या वरील भागात हेडींगच्या खाली असलेल्या TAB वर क्लिक करा.
तसेच यापूढील भागही तेथेच जोडले जातील.
आता गेल्या काही दिवसातल्या बाजाराविषयी...
गेल्या आठवड्यापर्यंत कन्सोलिडेट होत असलेल्या बाजाराने ५९५०, ६०५०, ६१२० अशा सर्व विरोध पातळ्या तोडत आगेकूच केली आहे. या अलिकडच्या तेजीत ओएनजीसी तसेच लारसनने भाग घेतलेला दिसत नाही, मात्र आयटी, बेंका च्या शेअरनी चांगली वाढ दाखवली आहे. भारती मध्येही हालचाल होत आहे. आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बाजाराने उत्तम संकेत दिले आहेत. आता  निफ्टी ६३०० नजिक असलेली दिवाळी मुहुर्ताच्या वेळेस असलेली उच्च पातळी ओलांडतो कि तेथून परत फिरतो ते पाहूया. अर्थातच काही झाले तरी त्या पातळीच्या जवळपास (किंवा त्या आधीच) बाजारात विक्री होणार हे नक्की आहे, आणि आपणही तेव्हा काही विक्री करून फायदा घेणे आवश्यक आहे.

Read more »

११ डिसें, २०१०

तांत्रिक विश्लेषणाची ओळख- मागील सर्व भाग लवकरच ब्लोगवरच उपलब्ध !

या ब्लोगचे सदस्य आणि सर्व वाचक मित्रहो,
आतापर्यंत या ब्लोगचे सदस्य झालेल्या वाचकांनाच  "तांत्रिक विश्लेषणाची ओळख" क्रमश: करून देणे चालू होते, मात्र नव्याने सदस्य झालेल्या मित्रांना मागील भाग वाचायला मिळत नव्हते, आणि त्यासाठी त्यांनी मुद्दाम विनंती केल्यावर त्यांना ते योग्य फोर्मेटमध्ये रुपांतरीत करून व्यक्तिगत मेल द्वारे पाठवणे वेळेअभावी नीट जमत नव्हते. तेव्हा आता लवकरच मागील सर्व भाग या ब्लोगवरच थेट उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. म्हणजेच सर्व ( सदस्यत्व नसलेल्याही) वाचकांना आता कुठलाही भाग कधीही बघता येवू शकेल, तसेच आता गूगल फ्रेन्ड कनेक्टद्वारे हे भाग पाठवणे थांबवत आहे.
वेळेअभावी काही वेळेला पुढील भाग प्रसिद्ध करण्यास विलंब होतो, मात्र सर्व वाचक मित्र मला समजून घेतील ही खात्री आहे.
या ब्लोगचे सदस्यत्व घेतलेल्यांना एक नवीन व वेगळे न्युजलेटर नियमीतपणे देण्याचेही योजत आहे, मात्र त्यासाठी थोडीशी प्रतिक्षा करण्याची विनंती.

Read more »

२९ नोव्हें, २०१०

शेअर्स खरेदी करण्य़ाची योग्य वेळ ..?

 दिवाळी मुहुर्ताच्या दिवशी दिसलेल्या तेजीनंतर गेले दोन आठवडे बाजार सातत्याने पडत आहे. याला ग्लोबल घटना कारणीभूत होत्या, तसेच देशांतर्गत घोटाळेही ! पण सर्वात महत्वाचे कारण म्हणजे

Read more »

२६ नोव्हें, २०१०

सेन्सेक्स परत १५००० होणार कि १०००० ?

२००९ मध्ये मार्केट चढायला लागल्यावर मला बरेच जण विचारायचे- सेन्सेक्स परत २१००० वर केव्हा जाईल ? त्या प्रश्नाचे मला हसू येत असे, आणि आता काही जण विचारतात -

Read more »

२५ नोव्हें, २०१०

एलआयसी हाऊसिंग व बेंकांचा घोटाळा-कि लाचखोरी....

नुकतीच सध्याच्या घोटाळा प्रकरणांवर येथे टिप्पणी केली होती, आणि काल आणखी एक प्रकरण बाहेर आले,(अर्थात परवाच छापे टाकले होते अशीही बातमी आहे). पडत्या मार्केटला आणखी एक कारण मिळाले. पण जेव्हा मार्केट चढत होते तेव्हा

Read more »

२१ नोव्हें, २०१०

2G स्पेक्ट्रम चे बाजारातील पडसाद...

शुक्रवारी सकाळ्पासून हेन्गसेन्ग कोसळतच होता, मात्र दुपारी साडेबारा (तेथील वेळेनुसार) नंतर त्याने अचानक ३०० पेक्षा जास्त पोइन्टची सरळ उभी मुसंडी मारली, तेव्हाच जागतिक बाजार सावरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते, आणि

Read more »

१५ नोव्हें, २०१०

कुठल्या शेअर्समधे बोटम फिशिंग करावे ?

नव्या आठवड्याची सुरुवात बाजार कशी करतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.गेल्या आठवड्यातला डाऊनट्रेन्ड, आणि आयर्लंडच्या कर्जबाजारी होण्याची नव्याने होत असलेली चर्चा या बाबी बाजारासाठी प्रतिकूल आहेत, मात्र जपानमध्ये GDP मध्ये झालेली वाढ

Read more »