Share/Bookmark

२५ नोव्हें, २०१०

एलआयसी हाऊसिंग व बेंकांचा घोटाळा-कि लाचखोरी....

नुकतीच सध्याच्या घोटाळा प्रकरणांवर येथे टिप्पणी केली होती, आणि काल आणखी एक प्रकरण बाहेर आले,(अर्थात परवाच छापे टाकले होते अशीही बातमी आहे). पडत्या मार्केटला आणखी एक कारण मिळाले. पण जेव्हा मार्केट चढत होते तेव्हा
त्याबाबत आपण तक्रारीचा सुर लावला होता का ? शेअरबाजारात जे चढते ते पडणारच असते, आणि म्हणूनच जे पडते ते परत चढणारच असते असा विश्वासही ठेवा.
सरकारच्या म्हणण्याप्रमाणे हा फक्त लाचखोरीचा प्रकार असेल, तर त्यात नवीन आणि बाजाराच्या दृष्टीने गंभीर फारसे काही नाही असेच वाटते.
  पडत्या बाजाराला सपोर्ट नसतात आणि चढत्या बाजाराला रझिस्टन्स नसतात असेही म्हटले जाते, मात्र माझ्या मते ते असतात, पण पाळले जात नाहीत :-)
 काल लंडन व अमेरिकेने रिकव्हरी दाखवली आहे, आणि आज नोव्हें.सिरीज एक्सपायरी असल्याने आपल्याकडेही थोडीफार रिकव्हरी अपेक्षीत आहे. तसेच काल निफ्टीने परवाचा म्हणजे दि.२३ चा बोटम तोडला नाही ही थोडीशी जमेची बाजू म्हणता येइल.
  एकंदर आपल्या ५६०० वा ५७०० च्या अंदाजाकडेच बाजार वाटचाल करत आहे असे दिसते.बाजार आणखी पडला तरी शुक्रवारी किंवा सोमवारी उत्तम कंपन्यांमध्ये थोडी खरेदी करायला हरकत नाही.