Share/Bookmark

२९ नोव्हें, २०१०

शेअर्स खरेदी करण्य़ाची योग्य वेळ ..?

 दिवाळी मुहुर्ताच्या दिवशी दिसलेल्या तेजीनंतर गेले दोन आठवडे बाजार सातत्याने पडत आहे. याला ग्लोबल घटना कारणीभूत होत्या, तसेच देशांतर्गत घोटाळेही ! पण सर्वात महत्वाचे कारण म्हणजे
"प्रत्येक मोठ्या तेजीनंतर विक्री होवून करेक्शन येणे हे नैसर्गिकच आहे-" हे होय!
अशा प्रकारे येवू घातलेल्या करेक्शनसाठी वाईट बातम्या शोधल्या व पसरविल्या जातात, त्यांना खूप महत्वही दिले जाते, अन्यथा तेजीच्या वातावरणात मात्र अनेक वाईट बातम्या दुर्लक्षिल्या जातात असे माझे निरीक्षण आहे.
 गेले दोन करेक्शनच्या प्रमाणे हे ही करेक्शन सुमारे १० टक्के असेल तर आता ते झालेले आहे.
 दि १३ ओक्टो. आणि ५ नोव्हें. रोजी निफ्टी पी/ई हा २६ च्या जवळपास पोचला होता, आणि गेल्या दोन आठव्ड्यानंतर तो २३ च्या जवळ घसरला असून शुक्रवारी २३च्या खाली आला आहे.हे माझ्या मते बर्यापैकी करेक्शन झाल्याचे लक्षण आहे. आता याच्याही पुढे बाजार घसरल्यास निफ्टी पी/ई २० पर्यंत खाली येवू शकतो. टेक्निकली ५६१० जवळ निफ्टीला चांगला सपोर्ट दिसत आहे.त्या दरम्यान अधिक खरेदीला हरकत नसावी.
निफ्टीचा ट्रेन्ड निश्चितपणे उतरता आहे मात्र या आठवड्यात "रिवर्सल" बघायला मिळते का काय होते ते प्रत्यक्षच पाहूया.

3 comments:

  • ABHIPRERNA says:
    २८ जुलै, २०१२

    आपण उत्तम लेख देत आहात त्याबाबत आपले अभिनंदन.आपणास आणखी सांगावेसे वाटते आपण put/call या बाबत लेख लिहावा .
    अभय (abhiprerna32@gmail.com)

  • संदीप says:
    ११ ऑगस्ट, २०१२

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. फ्युचर्स नंतर ऑप्शन्स येणारच आहेत.

  • santoshgire@gmail.com says:
    १८ ऑक्टोबर, २०१३

    thank you sir...