दि. ८ नोव्हेंबर रोजी मी येथे ५% करेक्शनबद्दल लिहिले होते.एकंदर ग्लोबल सेलींगचा परिणाम म्हणून का होइना पण समजा ५% करेक्शन झाले- म्हणजे साधारणपणे ६३०० हा TOP समजला तर तेथून निफ्टी ३०० ते ३५० पोइंट खाली येवू शकतो आणि नेमके टेक्निकली
आता ६१५० आणि ६१०० तसेच ५९५० येथे सपोर्ट आहेत.
गेल्या वर्षभरातील फेब्रुवारी आणि मे महिन्यातील करेक्शन्स ही मात्र ८ ते १० टक्के एवढी होती. त्या हिशेबाने ५६०० ही पातळीही येवू शकते, पण ही निव्वळ आकडॆवारी झाली. तेव्हाची आपल्या बाजाराची फंडामेन्टल्स आणि आताची, यामध्ये नक्कीच फरक आहे, तेव्हा ती शक्यता अतिशय कमी राहील.
मात्र नक्की काय होइल ते शेअरबाजारात कधीच आधी कळत नसते. मग अशा परिस्थितीत काय करायचे ?
जे लोक LONG TERM साठी गुंतवणूक करतात, त्यांना सतत बाजार बघण्याची गरज नसते, मात्र हा ब्लोग सुरु केल्यापासून, तो शोर्टटर्म ट्रेडींग करणार्यांसाठी आहे, हे मी अनेक वेळेला सांगितले आहे, आणि शोर्टटर्म ट्रेडींग करूनसुद्धा एव्हरग्रीन किंवा ब्ल्युचिप शेअर्समध्ये लोंगटर्म कसे रहायचे याचीही चर्चा केली आहे.
बाजार कुठे जाईल याचा अंदाज करणे चूकीचे नसते, मात्र एक कुठलातरी अंदाज करून त्यावर आपले सर्व धोरण अवलंबून ठेवणे चूकीचे असते. गेल्या ३ महिन्यात मी दोनतीन वेळेला तरी बाजार धोक्याच्या पातळीवर वाटल्यामुळे विक्रीचा सल्ला दिला होता,(आणि स्वत:ही विक्री केली होती) मात्र तो बाजाराने खोटा ठरविला.पण त्याने माझे काही बिघडले नाहीच उलट तेव्हा तेव्हा विक्री करून पैसा बाजूला काढला असेल तर तोच पैसा आता कितीही बाजार पडला तरी उपयोगी येणार आहे. तेव्हा बाजारातले होल्डींग आणि रोख पैसा यांचा परिस्थितीप्रमाणे तोल राखला तर बाजाराच्या प्रत्येक हेलकाव्यावर थोडे थोडे कमविणे कठीण नसते.मात्र सतत बाजारावर लक्ष ठेवणे मात्र गरजेचे ठरते.
बाजार वर गेला तर कुठले शेअर किती फायदा मिळताच विकायचे, तसेच खाली आला तर आधी विकलेले कुठले उत्तम शेअर्स परत घ्यायचे या दोन्ही बाबींचे प्लानिंग आणि त्यासाठी रोख रक्कम तयार असली, तर बाजार जेवढा हेलकावे खाईल तेवढे आपण कमवाल हे नक्की. अशा प्रकारचे निर्णय घेताना त्यात अधिक अचूकता येण्यासाठी टेक्निकल लेवल्सचा अभ्यास नक्कीच फायद्याचा ठरतो.
सध्या बाजार पडत असला तरी अगोदरच कमी झालेले ओएनजीसी, इन्फोसिस, टाटास्टील तसेच कमी वाढलेला रिलायन्स यामध्ये अर्थातच धोका कमी आहे.टाटा मोटर्स, स्टेट बेंक इ.खूप वाढलेले शेअर्स खाली आले तर प्रत्येक सपोर्ट लेवलवर थोड्या प्रमाणात खरेदी करून जास्त खाली येण्याची अपेक्षा करावी-,म्हणजे आपली अपेक्षा शेअरबाजार चुकवेलच, आणि त्यामुळे आपला फायदाच होइल. अत्यंत अनिश्चित वातावरणातही ही स्ट्रेटेजी काम करते असा माझा अनुभव आहे.बघा पटतय का ते !
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा