Share/Bookmark

२ नोव्हें, २०१०

RBI क्रेडिट पोलिसी रिव्ह्यु - व्याज दर वाढणार का ?

याआधी मी टेक्निकली बाजार वीक असल्याचे जरूर लिहिले होते, मात्र खाली आलेल्या चांगल्या शेअर्समध्ये खरेदी करायचेही सुचवले होते, आणि आशियाई बाजार आठवड्याची सुरुवात कसे करतात हेही बघायला सांगितले होते. सकाळी हेन्गसेन्ग इंडॆक्सने मजबूत ओपनिंग दिले तेव्हाच
आपलाही बाजार उसळणार हे जाणवले होते, मी फेसबूक वर Sharebazar Daily (--येथे क्लिक करा ) या पेजवर तशी पोस्टही दिली होती. वेळेअभावी या ब्लोगवर नेहमीच वेळेवर लिहिणे जमत नसल्याने अचानक काही थोडक्यात लिहिण्यासाठी सदर पेज निर्माण केले आहे. असो.
   मला एवढेच सांगायचे आहे कि एकाच वेळी निरनिराळे घटक बाजारावर परिणाम करत असतात आणि त्या सर्वांचा विचार करणे गरजेचे आहे.
  तूर्त या आठवड्यात कोल इंडिया मधून रिफंड होणारा पैसा परत मार्केटमध्ये येण्याची शक्यता, तसेच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मंगळवारी रिजर्व बेंक, क्रेडिट पोलिसी रिव्ह्युद्वारे व्याजदरात वाढ करण्याची, व त्यामुळे मार्केट उतरण्याची शक्यता, अमेरिकन फेडरलची पावले, RNRL चे RPOWER मध्ये विलीनीकरण आणि त्यामुळे १० ता. पासून बाजारात RNRL चे व्यवहार होणार नाहीत अशा काही प्रमुख घटना आहेत.
   निफ्टीला ६१४० च्या जवळ विरोध रहाणार आहे, आणि बाजाराचा वाढता कल राहिला तर ६१९० आणि ६२४० येथे विरोध राहील.
   निफ्टीने अचानक वाढून चकित केले असेल, परंतु ५९५० येथे असलेला सपोर्ट या ब्लोगवर अनेक वेळा लिहीला होता आणि तेथूनच निफ्टीने परत उसळी मारल्याचे आपण पाहिले असेल. अशा प्रकारे अनपेक्षीत हालचाली करणारा बाजारही तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने काहीसा काबूत येतो, यात काही शंका नाही.
जर उद्या निफ्टीने ६१५० ची पातळी निर्णायकरीत्या ओलांडली तर आपली सर्वांची दिवाळी दणक्यात साजरी होण्याची शक्यता दिसते आहे.