कोल इंडिया चे लिस्टिंग, फेडरल रिजर्वचे ६०० मि.डोलरचे स्टिम्युलस, आणि ओबामाची भारत-भेट अशा महत्वाच्या घटना या आठवड्यात घडत आहेत.रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कालही विक्री झाल्याने बाजार विशेष वाढू शकला नाही.काल येथे म्हटल्याप्रमाणे
रिलायन्सला १०४५ जवळ सपोर्ट आहे, आणि तेथपर्यंत तो घसरण्याची प्रक्रिया चालूच राहील असे दिसते.
आशियाई बाजारांनी फेडरल रिजर्वच्या पेकेजचे स्वागत केलेले दिसत आहे. जपानमधील कंपन्यांचे अर्निन्गचे आकडे चांगले आल्याने बरेच दिवसांनी तेथे तेजी दिसत आहे. हेन्गसेन्गने आपली जोरदार तेजी जारी ठेवलेली आहे.अशा पार्श्वभूमीवर कोल इंडियाचे लिस्टींग होत आहे हे लिस्टींगसाठी अनुकूल आहे.२८० ते ३०० रु.च्या जवळपास लिस्टींग होइल असा एक अंदाज जाणकार वर्तवत आहेत.
आपल्या अंदाजाप्रमानेच निफ्टीने ६१८० चा विरोध काल मोडलेला नाही आणि आज तो मोडला तर ६२२० ची पातळी हे पुढचे लक्ष्य वा विरोध पातळी असेल, तर ६१२० येथे सपोर्ट असेल.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा